Saturday, 23 September 2023

'जी २० 'ची स्थापना


१९९७ ते १९९९ दरम्यान संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते.


याच संकटावर तोडगा काढण्यासाठी १९९९ मध्ये जी२० ची स्थापना झाली.


सुरुवातीला नऊ वर्षे जी २० देशाचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची नियमित बैठक होत होती.


अमेरिकेतील ' सब प्राईम क्रायसिस ' च्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २००८ ला जी २० ची पहिली परिषद भरली.


📌 सदस्य देश: - भारत,अर्जेंटिना,ऑस्ट्रेलिया, ब्राझील,कॅनडा, चीन,फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली,जपान,दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया ,दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन,अमेरिका आणि युरोपियन युनियन.


स्पेन कायमस्वरूपी पाहून आहे.


जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनाही परिषदेचे आमंत्रण असते.


मुख्यालय - जी 20 चे अध्यक्षपद फिरते असते त्यामुळे जो देश संबंधित वर्षी अध्यक्षपद भूषवत आहे तिथे जी २० चे मुख्यालय असते.सध्या भारतात अध्यक्ष पद भूषवत आहे.


📌 जी २०चे महत्व:- जी 20 प्रामुख्याने आर्थिक प्रश्नावर काम करणारा गट आहे.


जी२० चे सदस्य देश एकत्रितपणे जागतिक जीडीपीच्या ८०टक्के, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ७५ टक्के, जागतिक लोकसंख्येच्या ६० टक्क्यांचे प्रतिनिधित्व करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...