Saturday, 23 September 2023

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.



०१) जगात सर्वाधिक वाघ असणारे पहिले तीन देश कोणते ?

- भारत,रशिया,इंडोनेशिया.


०२) कोणत्या संघटनेमार्फत २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?

- संयुक्त राष्ट्र संघ.


०३) 'कोसलाकार' असे कोणाला संबोधले जाते ?

- डॉ.भालचंद्र नेमाडे.


०४) महाराष्ट्रातील सर्वात लहान किल्ला कोणता ?

- तुंग.


०५) राष्ट्रध्वज केव्हा उतरवतात ?

- सूर्यास्ताच्या वेळी.


०१) अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस कोणती भरती म्हणतात ?

- उधाणाची भरती.


०२) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

- निकोटीन.


०३) अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

- आकाशगंगा.


०४) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

- वाघ.


०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

- वड.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

- आशिया.


०२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंगाचे पट्टे आहेत ?

- तीन-केशरी,पांढरा,हिरवा.


०३) राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

- त्याग आणि शौर्याचे प्रतिक.


०४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?

- शांततेचा.


०५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे ?

- समृद्धीचे प्रतिक


०१) हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

- क्रेग फुल्टन,दक्षिण आफ्रिका.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या संताची पदे 'गुरू ग्रंथसाहेब' या शीख धर्मियांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज. 


०३) जागतिक ध्रुवीय अस्वल दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- २७ फेब्रुवारी.(२०११ पासून)


०४) छत्रपती शिवाजी महाराज कोणता किल्ला जिंकू शकले नाही ?

- जंजिरा किल्ला.


०५) नांदेड जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत ?

- एक.


०१) चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०२) कळसुबाई हे नाव कशाशी संबधित आहे ?

- पर्वत शिखर.


०३) ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- प्रथम.


०४) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?

- कर्नाटक.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

- रवींद्रनाथ टागोर.


०२) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- मोर.


०३) शीखांचा मुख्य सण कोणता ?

- बैसाखी.


०४) कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात ?

- सरदार पटेल.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१)भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


०२)भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे ?

- डॉल्फिन.


०३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

 - आंबा.


०४) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे ?

- ३:२


०५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

- हॉकी.


०१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण ?

- राकेश शर्मा.


०२) अवकाशयात्री पहिली महिला कोण ?

- कल्पना चावला.


०३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली ?

- नागपूर.


०४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?

- प्रतिभाताई पाटील.


०५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे ?

- ९.७ %


०१) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?

- जॉन लोगी बेअर्ड.


०२) भारताची पहिली महिला शासिका कोण होती ?

- रजिया सुलताना.


०३) "अग्निपंख" ( Wings of Fire ) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०४) जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते ?

- पृथ्वी.


०५) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?

- कल्ले.


०१) दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात ?

- संयुक्त स्वर.


०२) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ कोणी यांनी लिहिला आहे?

- गागाभट्ट.


०३) महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?

- रायगड.


०४) सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

- अल्बर्ट आईन्स्टाईन.


०५) 'शाकुंतल' हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले ?

- कालिदास.


०१) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो ?

- ८ मिनिटे २० सेकंद.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथात लिहिलेला आहे ?

- ऋग्वेद.


०४) 'पंजाब केसरी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- लाला लजपतराय.


०५) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

- बुध.


०१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कधी असतो ?

- ६ डिसेंबर.


०२) सातही खंडातील सर्वोच्च पर्वत शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण.

- प्रेमलता अग्रवाल.


०३) सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादन करणारा देश कोणता ?

- जर्मनी.


०४)डायनामाइट चा शोध कोण लावला.

 - अल्फ्रेड नोबेल.


०५) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

- छोटा मेंदू.


०१)भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?

- मौलाना अबुल कलाम आझाद.


०२) महाराष्ट्रातील पहिला १००% साक्षर जिल्हा कोणता आहे?

- सिंधुदुर्ग.


०३)भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) जय जवान, जय किसान, जय विज्ञान हा नारा कोणी दिला ?

- अटलबिहारी वाजपेयी.


०५) माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?

- बचेंद्री पाल.


०१) मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) प्रसिद्ध कैलास लेणी कोठे आहे ?

- वेरूळ.


०३) दातांच्या आवरणात सापडणारे क्षार कोणते ?

- फ्लोरिन.


०४) भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

- सिंद्री.


०५) सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ?

- जपान.


०१) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?

- बुध.


०२) दौलताबाद किल्ला एकेकाळी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?

- देवगिरी.


०३) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही संबोधतात.?

- मंगळ.


०४) पृथ्वीवरून चंद्राचा जास्तीत जास्त किती टक्के भाग दिसतो ?

- ५९ टक्के.


०५) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?

- ५० मिनिटे.


०१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०२) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १२ जानेवारी.


०३) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

- टंगस्टन.


०४) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

- न्यूटन.


०५) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

- यकृत.


०१) 'राष्ट्रीय विज्ञान दिन' केव्हा साजरा केला जातो ?

- २८ फेब्रुवारी.


०२) "काव्यफुले" हा ग्रंथ कोणी लिहला ?

- सावित्रीबाई फुले.


०३) संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला ?

- शेंडगाव,जि.अमरावती.


०४) विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली ?

- कर्मवीर भाऊराव पाटील.


०५) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पायगोंडा पाटील.


०१) ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?

- करनाम मल्लेश्वरी.


०२) जय जवान,जय किसान हा नारा कोणी दिला ?

- लालबहादूर शास्त्री.


०३) अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणी केली ?

- पंडित जवाहरलाल नेहरु.


०४) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह कधी सोडण्यात आला ?

- १९७५.


०५) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

- डॉ.होमी भाभा.


०१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?

- २ - १ ने.


०२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?

- एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स.


०३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? 

- कर्नाटक.


०४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

- दुसरा.


०५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

- कोनराड संगमा.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१)भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


०२) पृथ्वी पेक्षा सूर्य किती पटीने मोठा आहे?

- १३.(तेरा)


०३) अंदमान निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रात आहेत ?

- बंगालचा उपसागर.


०४) भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते ?

- हिराकुंड.


०५) मानवाने सर्वप्रथम वापरलेला पहिला धातू कोणता ?

- तांबे.


०१) ' देवी ' या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली ?

- एडविन जेन्नर.


०२) सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

- ७२.


०३) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

- ३७ अंश सेल्सिअस.


०४) कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?

- ओ.( O )


०५) पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली ?

- साॅल्क जोनास एडवर्ड.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१) 'बालकवी' हे कोणाचे टोपण नाव आहे ?

- त्र्यंबक बापूजी ठोंबरे.


०२) हॅलेचा धुमकेतू किती वर्षांनंतर परत दिसतो ?

- ७६ वर्षांनी.


०३) वातावरणातील कोणता वायू अतिनील किरणे शोषून घेतो ?

- ओझोन.


०४) वातावरणातील सर्वांत खालच्या थरास काय म्हणतात ?

- तपांबर.


०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

- वाघ.


०१) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

- आळंदी.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

- मुंबई शहर.


०३) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?

- जायकवाडी.


०४) 'शक्तीस्थळ' हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?

- इंदिरा गांधी.


०५) 'उपरा' ही कोणाची कादंबरी आहे ?

 - लक्ष्मण माने.




No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...