Tuesday, 29 August 2023

सामान्य ज्ञान प्रश्न -उत्तर

🌀थोडक्यात महत्वाचे सर्वांनी वाचून घ्या,लिहून काढा ,वाचलेले वाया जातं नाही.🙏

1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
👉 रास बिहारी बोस

2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
👉सर ए. ओ. ह्युम

3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय  महिला अध्यक्ष कोण होती?
👉 सरोजिनी नायडू

4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी

5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
👉 मुंबई

6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
👉 लॉर्ड रिपन

7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 पंडित जवाहरलाल नेहरू

8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
👉 रायगड

9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
👉कागल

11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
👉 महात्मा फुले

13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
👉 महात्मा फुले

14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
👉 बाळशास्त्री जांभेकर

15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
👉 तुकडोजी महाराज

16) पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे?
👉 दर्पण

17) भारत रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत?
👉 महर्षी धोंडो केशव कर्वे

18) भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
👉 26 जानेवारी 1950

19) लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
👉 552

20) राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते?
👉 250

21) राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात?
👉238

22) राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो?
👉 राष्ट्रपती

23) राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते?
👉 सहा वर्षे

24) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
👉 उपराष्ट्रपती

25) महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 48

26) महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 19

27) भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
👉 राष्ट्रपती

28) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
👉 दिल्ली

29) भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत?
👉 25

30) महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते?
👉 288

31) महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते?
👉 78

32) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
👉 स्थायी / कायमस्वरूपी

33) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
👉शेती

34) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

35) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

36) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉वित्त सचिव

37) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉 रिझर्व बँकेचे गव्हर्नर

38) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
👉 राजीव गांधी

39) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
👉 1 मे 1962

40) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
👉 ग्रामसेवक

41) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
👉 7 ते 17

42) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
👉 पंचायत समिती

43) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
👉स्थायी समिती

44) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
👉 तहसीलदार

45) सातबारा उतारा कोण देतो?
👉 तलाठी

46) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
👉 जिल्हाधिकारी

47) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
👉 पोलिस पाटील

48) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
👉 34

49) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
👉 आठ

50) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
👉 एक

51) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
👉 गुरू

52) चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण?
👉 नील आर्मस्ट्रॉंग

53) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
👉 परिवलन

54) रिश्टर स्केल काय आहे?
👉 भूकंप मापक

55) दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे?
👉 अंटार्टिका

56) अ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
👉रातांधळेपणा

57) कुत्रा चावल्यानंतर वापरण्यात येणारी रेबीजची लस कोणी शोधून काढली आहे?
👉लुई पाश्चर

58) डेसीबल हे कशाचे एकक आहे?
👉 आवाजाची तीव्रता मोजण्याचे

59) मानवी शरीराचे सर्व सामान्य तापमान किती असते?
👉 37°c

60) सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात?
👉 पांढऱ्या पेशी

61) उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?
👉 शहनाई

62) बिहू हा लोक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
👉आसाम

63) संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा असतो?
👉 24 ऑक्टोबर

64) केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता?
👉 अर्जुन पुरस्कार

65) भारताच्या अनु विज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात?
👉 डॉ. होमी भाभा

66) मॅक् मोहन ही रेषा कोणत्या दोन देशात दरम्यान आहे?
👉 भारत आणि चीन

67) जगातील सर्वात लांब नदी कोणती?
👉नाईल

68) डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 गडचिरोली

🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...