तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारी सकाळी नऊ वाजतापासून सुरू झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.
नागपूर : तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारी सकाळी नऊ वाजतापासून सुरू झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या होतकरू उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.
राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. यासाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवार १७ ऑगस्टपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता पहिल्या पाळीतील परीक्षा होती. याचवेळी नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवार गैरप्रकार करत असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूर येथील परीक्षा केंद्रावरूनही प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
No comments:
Post a Comment