Monday, 3 July 2023

तलाठी पदभरतीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी | Talathi Bharti 2023

गडचिरोली | तलाठी संवर्गातील पदे भरताना 2014 च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार 158 पैकी पेसा क्षेत्रातून 151 पदे (Talathi Bharti 2023) भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणून या पदभरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार तलाठी पद भरती प्रक्रिया राबवावी व ओबीसीवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दै. सकाळने याबाबत वृत्त दिले आहे.

तलाठी भरती प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. याकरिता आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी निवेदकांना दिले.
निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, माजी उपसभापती विलास दशमुखे यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार डॉ. होळी यांनी निवेदकांचे म्हणणे ऐकून घेत भरती प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार पद भरतीची प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...