Tuesday, 25 July 2023

डोळे या शब्दावरून वाक्प्रचार, म्हणी व अर्थ



१) डोळा लागणे - झोप लागणे


२) डोळा मारणे - इशारा करणे


३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे


४) डोळे येणे - नेत्रविकार होणे


५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे


६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे


७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे


८) डोळे खिळणे - एकटक पाहणे


९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे


१०) डोळे दिपणे - थक्क होणे


११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे


१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे


१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे


१४) डोळे भरून येणे - रडू येणे


१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे


१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे


१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे


१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे


१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे


२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे


२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे


२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे


२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे


२४) डोळ्यात सलणे/खुपणे -  दुसऱ्याचं चांगलं न बघवणे 


२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे


२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे


२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे


२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे 


२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे


३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे. 

No comments:

Post a Comment