राज्यसेवा पूर्व परीक्षा अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सर्वांनाच आता एक प्रकारची अनामिक भीती मनामध्ये बसलेली असते ती म्हणजे मी परीक्षा पास होईल का? मी अभ्यास तर केला आहे पण ते सर्व मला exam मध्ये आठवेल का असे विविध प्रश्न मनामध्ये येत असतात.
त्यामुळेच नक्की या शेवटच्या 10-12 दिवसात काय करायला हवं याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात.
❇️ आता Planning कस असावं?
तुम्ही अगोदर ठरवल्याप्रमाणेच schedule follow करा एनवेळी काही बदल नको. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी ती म्हणजे आता सारखं वाचुनही विसरणारे Topics सारखे revise करायला हवेत. उदा. Current Affairs, Eco & Geo मध्ये लोकसंख्या Topic, Polity चे articles, Science मधील formulae इ. असं प्रत्येक विषयातले विसरणारे टॉपिक्स व्यवस्थित करायला हवेत. अजून पण सर्व विषयांचे व्यवस्थित Revision होईल त्यामुळे जर रीड करायचे राहिले असल्यास वाचन पूर्ण करून घ्या.
❇️ आता फक्त Study की Pyq देखील सोडवावेत?
याआधी तुम्ही बऱ्यापैकी Pyq बघितले असतील आणि तुम्हाला प्रश्नांचा चांगला अंदाज आलेला असेल. त्यामुळे जे weak वाटत आहे असे Topics तुम्ही या कालावधीत read करू शकता जिथं तुम्हाला marks जाण्याची भीती वाटते. सोबतच 2017-22 पर्यंतचे राज्यसेवा Prelims चे पेपर दररॊज पाहत राहा. त्यातून एक sense develope होण्यास मदत होईल.आणि तोच तुम्हाला 4 जून साठी फायद्याचा ठरणार आहे.
❇️ Revise होत नाही मग परीक्षेत आठवेल का?
तुमचं Revision complete झाले आहे असं वाटत नसेल तरीही तुम्ही या सर्व गोष्टी अगोदर read केल्या असल्यामुळे समोर आल्यावर तुम्हाला ते आठवणारच आहे. त्यामुळेच या चिंतेत न राहिलेलंच बरं. तसच आपली परीक्षा MCQ असल्यामुळे व्यवस्थित वाचन केले असल्यास परीक्षेत नक्की गोष्टी आठवतात.
❇️ Prelims, साठी अडचण ठरणारे विषय -
बऱ्याच वेळा Prelims मध्ये Current Affairs आणि Science हे दोन विषय अडचणीचे ठरु शकतात . कारण त्यांना Proper revision अत्यावश्यक असते. त्यामुळे Current dailly करा आणि Science साठी छान book refer करून read करून घ्या.
❇️ परीक्षेच्या काळात मानसिकता कशी टिकवून ठेवायची?
या काळात सर्वात धोकादायक ठरणारी गोष्ट म्हणजे मानसिकता. जर आपण कितीही study केला असेल आणि स्वतःवर विश्वास नसेल तर मग मात्र परीक्षा गेलीच म्हणून समजा. या काळात एकच गोष्ट आपल्याला तारू शकते ती म्हणजे अपला स्वतःवरचा विश्वास. तो exam मधील शेवटचा गोल करेपर्यत टिकून राहिला की आपल 70% काम झाले म्हणून समजा..
❇️ झोप आणि अभ्यासातील सातत्य - साधारणतः आपण 6-8 तास एवढी optimum झोप घायलाच हवी. शेवटी आपण खूप Study Centric होतो व आपल झोप,जेवण, regular Schedule विसरून जातो आणि normal असतानांदेखील Abnormal behave करायला लागतो.
❇️ इतर बाबी -
4 जून साठी ज्यावेळी आपण सर्व exam hall मध्ये बसू त्यावेळी सर्वजण एकाच Level ला असणार आहोत फक्त त्या 2 hrs मध्ये जो शांत डोकं ठेऊन सर्व व्यवस्थित manage करेल तोच शेवटचं टोक गाठणार आहे. त्यामुळेच Be Alert.
अशा प्रकारे आपण पुढील 10 दिवसांचे नियोजन केलं आणि व्यवस्थित मानसिकता टिकवून 4 जून ला समोरे गेलो तर विजय आपलाच आहे.
परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा 💐💐
No comments:
Post a Comment