Saturday, 1 April 2023

लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये शंभरावा गोल करत इतिहास रचला :-


◆ जागतिक चॅम्पियन फुटबॉल संघ अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात कोराकाओचा 7-0 असा धुव्वा उडवला. 


◆ कर्णधार लिओनेल मेस्सीने या सामन्यात तीन गोल करत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 गोल पूर्ण केले. 


◆ आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल पूर्ण करणारा मेस्सी हा तिसरा फुटबॉलपटू आहे, त्याने 174 सामन्यात 102 गोल पूर्ण  केले आहेत.


◆ पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे, त्याने 198 सामन्यात 122 गोल केले असून, इराणचा अली दाई (109) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.


◆ मेस्सीने 100 गोल पूर्ण करताच एक विशेष कामगिरी केली, विश्वचषक जिंकणारा तसेच 100 गोल पूर्ण करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू आहे.


◆ रोनाल्डो आणि अली दाई यांनी 100 हून अधिक गोल केले आहेत,परंतु दोघांनाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.


◆ मिस्सीने 20व्या 33व्या आणि 37व्या मिनिटाला गोल करत 37 मिनिटात हॅट्ट्रिक पूर्ण केली.


◆ मेस्सीच्या कारकिर्दीतील ही 57वी हॅटट्रिक आहे, अर्जेंटिनाकडून खेळताना त्याने नवव्यांदा हॅटट्रिक गोल केला.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...