सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे तीन विषय सोडले तर बाकी विषयांचा अभ्यास हा जवळपास सर्वांचाच सारखा झालेला असतो. म्हणजे या उर्वरित विषयांमध्ये जे मार्क्स येणार आहेत हे जवळपास सर्वांनाच सारखे येतील.त्यामुळे जे मार्क्स आपल्याला लीड मिळवून देतील ते आपल्याला या वरील तीन विषयांमध्ये मिळवायचे असतात.
म्हणजे आता आपल्याला फक्त या कंटेम्पररी विषयाचाच अभ्यास न करता वरील उल्लेखित तीन विषयांवर सुद्धा विशेष लक्ष द्यायचे आहे. कारण इतरांपेक्षा सरस किंवा जास्त मार्क्स हे आपल्याला वरील तीन विषय मिळवून देतील.ज्याला या तीन विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळतील तो मात्र नक्कीच जास्तीत जास्त पदांना पात्र होणार आहे.
यामधील सामान्य विज्ञान हा विषय सोडला तर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी मध्ये मात्र अपेक्षित यश मिळू शकते. म्हणजेच यांचा इनपुट आउटपुट Ratio हा खूप चांगला आहे. या कालावधीमध्ये आपण या दोन विषयांकडे विशेष लक्ष देऊ शकतो.
सामान्य विज्ञान मात्र अभ्यासताना खूप जास्त न वाचता एकच सोर्स मधून त्याचे वाचन करावे कारण कितीही वाचन केले तरी हा विषय मात्र अनिच्छित स्वरूपाचा आहे,त्यामुळे आयोगाच्या मागील प्रश्नांवरून उत्तरापर्यंत जाण्याचा मार्ग शोधावा.
30 एप्रिल च्या परीक्षेला आता जवळपास 1 महिना बाकी आहे.आता सर्वांनी त्यांचा अभ्यासाचा वेळ वाढवला असेल.काहींनी तर झोप कमी केली असेल.जास्तीत जास्त वाचन चालू असेल.
पण महत्वाचं आहे ते या 1 महिन्यात आपली मानसिकता व्यवस्थित ठेवणे.या काळात आपल्यावर खूप जास्त pressure येते व आपसूकच आपण कुठे तरी नकारात्मक होतो.
लक्षात ठेवा, खूप जास्त अभ्यासाने Result येत नसतो.Result येतो तो फक्त आपल्या मानसिकतेने.आपण या कालावधीत जितके सकारात्मक असू,जितके आनंदी असू,तिकाच आपला हा प्रवास सुकर होतो आणि मग त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला रिझल्ट येतांना दिसतो.
मानसिकता चांगली ठेवण्यासाठी सर्व्यात महत्वाचं म्हणजे झोप नीट घ्यावी.मेंदू ला आराम दिला,त्याला वेळ दिला तर तो तुम्हाला Result देईल.
या काळात एकांतवासात जाऊ नका.आपले मित्र,मैत्रीण,आपले कुटुंब यांच्यासोबत बोलत चला.थोड्या संभाषण व विनोदाने आपला दिवस चांगला जातो आणि मग अभ्यास करण्यात पण मजा येते.मात्र यात Negative लोकांपासून दूर रहा.
शरीराला व मेंदूला व्यायामाने, ध्यानधारणाने उत्साही ठेवा.याचा नक्कीच फायदा होतो.एक वेळेस अभ्यास कमी झाला तरी चालेल पण या गोष्टी चुकता कामा नये.
या काही परीक्षा पास होण्याच्या अभ्यासापलीकडील गोष्टी आहेत.ज्या अत्यावश्यक आहेत.
No comments:
Post a Comment