Wednesday, 8 March 2023

स्त्री जन्माची कहाणी :- ज्ञानेश्वरी गजानन शेळके


मी "स्त्री" आणि ही माझी कहाणी, 

आता तुम्ही म्हणाल काय आहे हीची रडगाणी ..

रडगाणी नाही हो आयुष्य आहे माझं ,

स्त्री जन्माचं लपलं आहे त्यात राजं...


जन्म झाला तेव्हा बाबा म्हणाले "लक्ष्मी आली", 

चांगला सहवास आणि प्रेमाने मी "लाडात वाढली"... 

मोठी झाली तशी "मासिक पाळी" ची "समस्या" जाणवली, आई म्हणाली बाळा हीच तर देते मुलीला "एक ओळख वेगळी" ...


इच्छा होती माझी ही खूप सारं शिकायचं ,

पण; शिकून काय करणार शेवटी "परक्याचं धनंच" म्हणायचं ...

लोकांच्या "वाईट नजरा" नेहमी मला "छळायच्या", 

त्यांना माझ्यात "त्याची बहिणी" नाही का दिसायच्या?...


मुलगी आहे म्हणून नेहमी माझ्यावर "बंधने घातली", शेवटी लग्न होऊन मी माझ्या सासरी आली....

लग्नात माझ्या खूप सारा "हुंडा" दिला, 

तेव्हा वाटलं कोणी हा "मुलगी विकत घेण्याचा" "व्यवसाय" सुरू केला ?


लग्नानंतर झाला माझा खूप सारा "छळ" ,

पण ; "आई -वडिलांच नाव नाही गमवायचं" यातून सहन करण्याचा मिळालं बळ...

मी नाही हो कुठेही कमी ,

पण ;"स्त्री कमजोर हे ठरवलचं तुम्ही" ...


"नवजीवन निर्माण" करायचा एक गुण मला लाभला, म्हणूनच देवाने मला "स्त्रीचा जन्म" दिला...

देवाने घडवलय मला "थोडीशी वेगळी", 

पण; मीही आहे "एक तुमच्यातली"....


"मुलगी ,बहिण ,पत्नी ,आई" एवढीच ओळख नाहीये माझी ,

एक स्त्री म्हणून मला आहे माझी "एक वेगळी सुंदर अस्मिता" जागवायची... 


नाव: ज्ञानेश्वरी गजानन शेळके

पत्ता: द्वारकानगर, छ. संभाजीनगर

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...