निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
🔸मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक ➖
👉पंतप्रधान,
👉 विरोधी पक्षनेते आणि
👉 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी,
✅ तसेच विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
✅ निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनविण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच जोपर्यंत हा कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीद्वारे करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा