Tuesday, 12 March 2024

यशाची त्रिसूत्री

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

'✔️वेळ, 😥नियोजन आणि ✔️अंमलबजावणी'

कुठल्याही कामाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. उगाच घाई-गडबड करून काम लवकर होण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ हा द्यावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी रासायनिक अभिक्रियेचं(chemical reaction) उदाहरण नक्की समोर ठेवलं पाहिजे. आपल्याकडे आवश्यक ती सर्व साधने आहेत, प्रयोगशाळा आहे, आवश्यक ती तज्ज्ञता आहे, सर्व अभिक्रियाकारके (reactants) आणि उत्प्रेरके(catalysts) हे सर्व असलं आणि आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरीही हवा तो product तयार होण्यासाठी आपल्याला आवश्यक तो वेळ हा द्यावाच लागतो. याला म्हणायचं time constant, हा ठरलेला असतोच. आपल्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातही तो असतोच आवश्यक त्या सर्व गोष्टी पुस्तकं, अभ्यासिका, test series हे सर्व उपलब्ध असूनही वेळ द्यावा लागणारच असतो कारण काही गोष्टींमध्ये वेळेनुसारच maturity येत असते. Teachers/Mentors हे Catalysts प्रमाणे काम करून हा वेळ थोडाफार कमी करू शकतात एवढंच परंतू हवं ते product म्हणजे यश मिळवण्यासाठी स्वत:च transform होणं आवश्यक असतं.

दुसरं म्हणजे नियोजन. कितीही वेळ दिला तरीही आपल्याकडे योग्य नियोजन नसेल तरीही आपल्याला यश मिळणं अवघड आहे. कारण क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतो म्हणून काटेकोर नियोजन असणं अत्यावश्यक आहे. यामध्ये long term, short term planning तसेच macro and micro management चं महत्त्व असतं.

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलबजावणी कारण प्रत्यक्ष कृतीविना सर्व संकल्प निरर्थक असतात.
(क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे) ही बऱ्याच जणांची समस्या असते.. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असते.. प्रत्यक्ष कृती करणे आणि त्यात सातत्य आणि सुधारणा राखने हे सर्वात मोठं आव्हान असतं. ह्याच टप्प्यावर out of the control factors आपल्याला सर्वाधिक त्रास देतात म्हणून अंमलबजावणीच्या वेळी मानसिक स्थिरता अत्यंत आवश्यक असते. ही स्थिरता आपण केलेल्या नियोजनावर आणि करत असलेल्या अभ्यासावर आपला पूर्ण विश्वास असल्यास मिळू शकते. अभ्यासिकेत किती वेळ बसतोय किंवा किती pages वाचून काढलेत यापेक्षा किती घटकांचा अभ्यास मी व्यवस्थित पूर्ण केला या गोष्टीला यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून दिखाऊपणा किंवा अवडंबर म्हणून पहाटे चार ला उठून अभ्यासाला बसने किंवा रात्र जागून काढून अभ्यास करणे असं काहीही अचाट न करताही व्यवस्थित, नियोजनपूर्वक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने आपला अभ्यास आपण पूर्ण केला, micro notes काढल्या, multiple revisions केल्या तर यश आपल्याला नक्की मिळेल.

शेवटी पुन्हा एकच  क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतोच तर परिपूर्ण नियोजन आणि कठोर अंमलबजावणीचा तो परीणाम असतो.
म्हणून वेळ द्या, नियोजन करा आणि अंमलात आणा.
स्व.बाबा आमटेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा"

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...