Sunday 5 March 2023

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती



०१) 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (NDA) कुठे आहे ?

- खडकवासला.(पुणे)


०२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय  आहे ?

- मुरलीधर देविदास आमटे. 


०३) जगातील कोणत्या खंडास बर्फाळ खंड असे म्हणतात ?

- अंटार्क्टिका.


०४) शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती  ?

- यकृत.


०५) गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- पणजी.


०१) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे नाव काय होते ?

- यशवंतराव चव्हाण.


०२) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?

- नागपूर.


०३) अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

- औरंगाबाद.


०४) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

- ३६.


०५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदीचे नाव काय आहे ?

- गोदावरी.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण ?

- किरण बेदी.


०२) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

- पुरंदर किल्ला.


०३) नेपाळची राजधानी कोणती आहे ?

- काठमांडू.


०४) रेबिजची लस कोणी शोधली ?

- लुईस पाश्चर.


०५) सुशीलकुमार हा खेळाडू कोणता खेळ खेळतो ?

- कुस्ती.


०१) १ ते ९ अंकाची बेरीज किती होते ?

- ४५.


०२) इटली या देशाची राजधानी कोणती ?

- रोम.


०३) 'कऱ्हेचे पाणी' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

- प्र.के.अत्रे.


०४) ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

- उस्मानाबाद.


०५) इराक या देशाची राजधानी कोणती ?

- बगदाद.


१) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन आणि शिवराई.


०२) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?

- डॉ.होमी भाभा.


०३) अंधासाठीच्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?

- लुईस ब्रेल.


०४) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय ?

- डेंबुजी झिंगराजी जानोरकर.


०५) 'स्कर्व्ही' हा रोग कोणत्या जीवनसत्वाभावी होतो ?

- सी जिवनसत्व.


०१) 'इस्रो' (ISRO)चे मुख्यालय भारतात कोठे आहे ?

- बंगळुरू. 


०२) राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १४ सप्टेंबर.


०३) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

- कुलाबा.


०४) 'विश्वनाथन आनंद' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बुद्धिबळ.


०५) मराठवाड्याच्या राजधानीचा जिल्हा कोणता ?

- औरंगाबाद.


०१) ज्वारीच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो ? 

- महाराष्ट्र.


०२) प्रसिद्ध 'शनिवारवाडा ' कोठे आहे ?

- पुणे.


०३) सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?

- क्रांतिसिंह नाना पाटील.


०४) गरीबाचे 'बदाम'असे कशास म्हटले जाते ?

- शेंगदाणे.


०५) पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

- परिवलन.


०१) 'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

- बीड.


०२) ऑक्सीजन चा शोध कोणी लावला ?

- जोसेफ प्रिस्टले. 


०३) बांगलादेशची राजधानी कोणती आहे ?

- ढाका.


०४) भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यास किती कालावधी लागला ?

- २ वर्ष ११ महिने १७ दिवस.


०५) 'श्रीमान योगी' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- रणजित देसाई.



०१) जपान या देशाची राजधानी कोणती ?

- टोकियो.


०२) कोणाचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०३) महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरु ग्रंथसाहेब' या शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज.


०४) 'क्ष'(X-ray) किरणांचा शोध कोणी लावला ?

- रॉंन्टजेन.


०५) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

- पॅरिस.


०१) 'विवेकसिंधू' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

- मुकुंदराज.


०२) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- कर्नाटक.


०३) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?

- त्यागाचे.


०४) मिठाचे रासायनिक नाव काय आहे ?

- सोडियम क्लोराइड.


०५) 'धवलक्रांती' म्हणजे  कशाच्या उत्पादनात वाढ ?

- दूध उत्पादन.


०१) सरदार सरोवर' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०२) 'आग्रा' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

- यमुना.


०३) शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

- कोयना.


०४) 'संजय गांधी' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

- बोरिवली.(मुंबई)


०५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- चंद्रपूर.


०१) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

- ७२० कि.मी.


०२) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- पुणे.


०३) 'भंडारदरा' धरण कोणत्या नदीवर आहे ?

- प्रवरा.


०४) पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

- सातपाटी.


०५) 'बिहू' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- आसाम.


१) भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

- दादासाहेब फाळके.


०२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

- रूडाल्फ डिझेल.


०३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

- अनंत भवानीबाबा घोलप.


०४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

- २७० ते २८० ग्रॅम.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

- ४ सप्टेंबर १९२७.


०१) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

- पुणे.


०२) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

- जेम्स वॅट.


०३) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

- प्रल्हाद केशव अत्रे.


०४) ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

- भावार्थ दीपिका.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

- ८ जुलै १९३०.

No comments:

Post a Comment