Friday, 17 March 2023

95 व्या ऑस्कर सोहळ्यात,भारताला पहिल्यांदाच 2 पुरस्कार


1.'नाटू-नाटू' सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग.

2.'द एलिफंट व्हिस्पर्स' ठरली 'बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म.


1. नाटू- नाटू song-

Composer-M. M. Keeravani

Language- Telugu

Lyricist- Chandrabose

(यापूर्वी सुद्धा famous golden glob पुरस्कार मिळाला होता)


2.The Elephant Whisperers

भाषा - तेलगू

डायरेक्टर -कार्तिकी गोन्साल्विस.

निर्माती -गुनीत मोंगा 



🏆ऑस्कर पुरस्कार कोण देतं?


1927मध्ये अमेरिकेच्या सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या काही कालाकारांनी Academy of Motion Picture Arts and Sciences ही संस्था सुरू केली. आणि 1928 साली पहिल्यांदा त्यांनी त्यांचे अकादमी पुरस्कार दिले.


🟢आता या अकादमी पुरस्कारांना ऑस्कर्स का म्हटलं जातं?👉 तर जी ट्रॉफी विजेत्यांना दिली जाते, तिला ऑस्कर म्हटलं जातं.


👉ऑस्करच्या नामांकनासाठी पात्र ठरायच्या काही अटी -


1.तो सिनेमा किमान 40 मिनिटांचा असावा.

2.लॉस एंजेलिसमधल्या कुठल्याही थिएटरमध्ये तो किमान सात दिवस दाखवण्यात आलेला असावा.

3.तो जानेवारी 1-डिसेंबर 31 या दरम्यान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला असावा, आणि त्याआधी तो कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला नसावा.


🛑फॉरेन लँग्वेज कॅटेगरीसाठी जाणार सिनेमे, जसं की भारताकडून यापूर्वी गेलेले मदर इंडिया, सलाम बाँबे, लगान हे हिंदी सिनेमे किंवा मराठीतले श्वास, हरिशचंद्राची फॅक्ट्री आणि कोर्ट. या कॅटेगरीसाठी प्रत्येक देश एकच सिनेमा पाठवू शकतो.हे लक्षात असू द्या.


✅अनेकदा अकादमीवर श्वेतवर्णीयांना झुकतं माप देण्याचा आरोप झाला आहे. #Oscars SoWhite हा सोशल मीडियावरचा हॅशटॅग एक चळवळ म्हणून अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्याचा परिणाम म्हणून आज अकादमीतच नव्हे तर नामांकनांमध्येही बरंच वैविध्य पाहायला मिळतंय 


🏆भारताची ऑस्करमधली कामगिरी👉


2009 साली स्लमडॉग करोडपती या सिनेमानं  एकाच वर्षात तब्बल 4 ऑस्कर ट्रॉफी जिंकल्यात.


यापैकी दोन ए आर रहमान यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी, अर्थात जय हो. याच गाण्यासाठी गुलझार यांनाही सहपुरस्कार देण्यात आला.


याशिवाय बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी रसूल पुकुट्टी यांना मिळाला.


✅भानू अथय्या या ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या – 1983 साली आलेल्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या सिनेमासाठी. 


सत्यजित रे यांनाही 1992 साली त्यांच्या सिनेक्षेत्राला योगदानासाठी ऑस्करने सन्मानित करण्यात आलं होतं.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...