Wednesday 8 March 2023

शेवटचे 50 दिवस आणि आपण.

आज ही Post लिहिण्याचा उद्देश एकच आहे की Combine पुर्व साठी राहिलेले शेवटचे 50 दिवस तुमच्यासाठी Game Changer ठरू शकतात. त्याच अनुषंगाने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न.

  1. आता तुमची Revision ची phase चालू असेल त्यामुळे नवीन हातात काहीच घेऊ नका. जे आत्तापर्यंत वाचलंय तेच Revise करा.

2. इथून पुढे कमीत कमी 3 Revision व्हायला पाहिजेत असं नियोजन करा. पुढील 50 दिवसाचे 25-15-10  अशा दिवसांमध्ये 3 Revision चे Planning करू शकता.    

3. कमीत कमी 5 विषयांवर आपला जबरदस्त Control असला पाहिजेत. आणि इतर कोणतेही 2 विषय ते सुद्धा above average हवेत तरच 60+ च Target गाठता येऊ शकते.

4. कुठल्याही विषयाला गृहीत धरू नका विशेषतः गणित बुद्धिमत्ता आणि इतिहास. या विषयांकडेसुद्धा Specific लक्ष असू दया. कारण मार्कांची गोळबेरीज ही सर्व विषय मिळूनच होत असते.       

5. Polity चे Imp Articles, Subjects, Schedules,पंचायत राज च्या काही Facts या पाठ असू दया.

6. Combine Prelims चे 2022,2021,2020,2019 या चार वर्षांच्या Papers च बारकाईने विश्लेषण करा. त्यामध्ये आयोग कुठे फसवतो, आयोगाची अपेक्षा, काही Tricks, प्रश्न विचारण्याची पद्धती, विषयानुसार आयोगाचा कल या सर्व बाबींचा आढावा घेणं योग्य राहील.

7. Practice Test papers Solve करायला हवेत. कारण आपल Time Management होत आहे का नाही हे त्यातूनच समजू शकते. किमान 5 Test Papers तरी वेळ लावून सोडवून व्हायला हवेत.       

8.आता Revision करत असताना प्रत्येक विषयाचा प्रत्येक उपघटक, प्रत्येक कोपरा चांगला धुंढाळून घ्यायला हवा.

9. Exam Hall मधील 1 तास-
आपण कितीही अभ्यास केला तरी हा एक तासच बऱ्याच गोष्टी ठरवतो. त्यामुळे त्या 1 तासामध्ये मानसिकता सकारात्मक असायला हवी. इतर गोष्टींचे विचार कमीत कमी यायला हवेत. त्यामुळे आत्ताच Practice करत असताना आयोगाचा Paper Solve करत आहोत असा Approach समोर ठेऊन Solve करा.

 शेवटी Combine हा जरी 20-20 चा खेळ असला तरी त्याच्या पाठीमागे असलेली मेहनतच आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे शेवटचे 50 दिवस शक्य तेवढा जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.      

  सर्वांना शुभेच्छा 💐💐.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...