Sunday 19 March 2023

कम्बाईन पूर्व परीक्षेत 50 पाशी अडकलेला आपला स्कोर 60+ कसा वाढवता येईल??


सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे weak points शोधा, सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचे खालील प्रमाणे weak points असतात व त्याच्यावर solution पुढील प्रमाणे


1. Attempt कमी असणे:-


👉Attempt हा 100 पैकी कमीत कमी 90 ते 95 या रेंजमध्ये असला पाहिजे, मग परीक्षा कितीही अवघड असो. कारण Attempt केल्याशिवाय मार्क्स मिळण्याची  संधीच उपलब्ध होणार नाही.

बरेच विद्यार्थी चार पैकी दोन पर्याय eliminate करतात परंतु राहिलेल्या दोन पर्यायांपैकी उत्तर त्यांना माहीत नसते. असे प्रश्न देखील रिस्क घेऊन सोडवणे गरजेचे असते, कारण निगेटिव्ह मार्किंग फक्त एक चतुर्थांश आहे, यात मार्क्स वाढण्याचीच शक्यता जास्त असते.


2. फक्त GS वर focus, CSAT  कडे दुर्लक्ष:-


👉100 पैकी 15 प्रश्न CSAT वर येतात त्यामुळे नक्कीच या विषयाकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे, जितका importance GS मधील एखाद्या विषयाला देतात तितकाच importance CSAT ला देखील दिला पाहिजे.

ज्यांचा CSAT weak आहे त्यांनी आत्तापासूनच दररोज दोन तास सराव करायला सुरुवात करावी.

CSAT चे 15 प्रश्न सोडवताना देखील अगोदर सोपे आणि तुम्हाला येणारे प्रश्न सोडवून घ्यावेत.


3. अपुऱ्या Revisions:-


👉पूर्ण syllabus ची एक reading आणि किमान दोन revisions तरी झाल्याच पाहिजे तरच आपली प्रश्नपत्रिका सोडवताना accuracy वाढेल.

Revisions करताना देखील महत्त्वाच्या आणि scoring  विषयांची revision priority ने करावी जसे की polity, geography, economy, CSAT


4.Question solving ची  practice न करणे:-


👉Revisions करताना आयोगाचे PYQs आणि कुठलेही एक चांगली test series लावा ज्याच्यामुळे तुम्हाला questions सोडवण्याची skill निर्माण होईल. Test series मुळे effective time management आणि stress management तुम्हाला करता येईल. आयोगाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक confidence तुमच्यामध्ये तयार होईल.


5.Sources निश्चित न करणे:-


👉परीक्षेसाठी आवश्यक असलेले sources निश्चित न केल्यामुळे revisions योग्य प्रकारे होत नाहीत. त्यामुळे रिविजन चांगल्या प्रकारे होण्यासाठी तुमचे sources निश्चित करा. तुम्हाला इतर sources मधील काही माहिती महत्वाची वाटत असेल तर तो पूर्ण source वाचू नका त्यातील जे required मुद्दे आहेत त्याची तुमच्या basis source मध्ये value addition करा.


आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याला positively घ्या.

I mean "These are not my weak points, they are actually my areas of improvement" या दृष्टिकोनातून बघा.😊


All the best for Prelims💐💐.

No comments:

Post a Comment