Saturday, 18 February 2023

Velocity ने लॉन्च केला भारतातील पहिला AI असिस्टंट ‘Lexi’


सध्या जगभरात फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात OpenAI ChatGpt ची चर्चा सुरु आहे. OpenAI ने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विकसित केलेल्या ChatGpt चॅटबॉट आणि त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील आपले Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे. यामध्ये भारतात देखील देशातील पहिला इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे.


भारतीय वित्तीय कंपनी Velocity ने देशातील पहिला ChatGPT इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे. या कंपनीने या चॅटबॉटचे नाव Lexi असे ठेवले आहे. Velocity ने AI चा फायदा घेऊन सध्याच्या अ‍ॅनालिटिक्स टूल व्हेलॉसिटी इनसाइट्ससह ते एकत्रित करण्यात आले आहे. Velocity Insights वापरणारे भारतीय ई-कॉमर्स ब्रँड मेटा मालकीच्या WhatsApp वर दैनंदिन व्यावसायिक रिपोर्ट मिळवू शकतात. हे ई-कॉमर्स साइट्सना त्यांची व्यवसाय कार्ये विकसित करण्यास मदत करणार आहे.


या प्रसंगी बोलताना Velocity चे सीईओ अभिरूप मेढेकर म्हणाले की, चॅटजीपीटी लॉन्च झाल्यापासून त्यांच्या उत्पादन टीम यावर विचार करत आहेत की चॅटजीपीटीचा फायदा कसा घेता येईल. Velocity चे ग्राहक पहिल्यापासूनच दैनंदिन इनसाईट्सचा वापर करतात. म्हणूनच आम्ही त्याच इंटरफेससह ChatGPT समाकलित केले आहे.



No comments:

Post a Comment