⭕️ राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे
✅ मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विभागाच्या सन 2022च्या पुरस्कारांची घोषणा केली.
यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांचा समावेश आहे.
🏆विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या 90 आहे.
🏆श्री. पु. भागवत पुरस्कार पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झाला आहे. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
🏆डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
🏆तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी द. ता. भोसले यांची निवड झाली आहे. रोख 2 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
🏆डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
🏆तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
No comments:
Post a Comment