◆ ऑगस्ट 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ (UNICEF) या संस्थेने The Climate Crisis Is a Child Rights Crisis: Introducing the Children's Climate Risk Index' हा अहवाल प्रकाशित केला.
◆ युनिसेफने हा अहवाल Fridays for Future या संघटनेच्या सहाय्याने तयार केला आहे.
➤ उद्दिष्ट :- हवामान बदलांचा लहान मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेत हा निर्देशांक अहवाल तयार करण्यात आला आहे.
◆ निर्देशांकात सर्वात वरचे स्थान म्हणजेच सर्वात जास्त धोका.
◆ चिल्ड्रन्स क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार भारत 26व्या स्थानावर आहे.
➤ भारताचे शेजारील देश :-
14) पाकिस्तान, 15) बांग्लादेश, 25) अफगाणिस्तान 51) नेपाळ, 61) श्रीलंका, 111) भूतान
➤ सर्वात कमी धोका :-
163) आईसलँड, 162) लक्झम्बर्ग, 161) न्युझीलंड
➤ सर्वाधिक धोका असणारे देश :-
1) सेन्ट्रल आफ्रिकन रिपब्लिक
2) चाड
3) नायजेरिया
━━━━━━━━━━━━━
No comments:
Post a Comment