Tuesday, 28 February 2023

जागतिक पुस्तक मेळ्याच्या ३१ व्या आवृत्तीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात.


🔰 जागतिक पुस्तक मेळ्याच्या ३१ व्या आवृत्तीला कालपासून नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरुवात झाली.


🔰 ९ दिवस चालणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन शिक्षण राज्यमंत्री डॉ राजकुमार रंजन सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं.


🔰 'आझादी का अमृत महोत्सव ' या विषयाच्या अनुषंगाने अनेक साहित्यिक सहभागी झाले असून विविध सांस्कृतिक उपक्रम या मेळ्यामध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन हजारांहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून एक हजाराहून अधिक पुस्तक प्रकाशक सहभागी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर अनेक चर्चासत्रे, परिषदा,पुस्तक प्रकाशन,साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


🔰 या मेळयासाठी फ्रान्सची गेस्ट ऑफ ऑनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔰 या मेळाव्यादरम्यान प्रकाशन विभाग ‘आझादी का अमृत महोत्सव’ पुस्तक संग्रह प्रदर्शित करत आह.


🔰 देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकणारा आणि देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण या पुस्तक संग्रहतून करण्यात आलं आहे.


🔰 प्रकाशन विभागाची;योजना, कुरुक्षेत्र, आज - काल आणि बालभारती यांसारखी नियतकालिकेही या मेळयात  उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment