◆ युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी 26 फेब्रुवारी 2023 रोजी हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून रवाना झाली आहे. 6 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 दरम्यान हा युद्धसराव होणार आहे.
◆ कोब्रा वॉरियर हा बहुस्तरीय हवाई युद्धसराव असून यामध्ये फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील रॉयल एयर फोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत सहभागी होणार आहेत.
◆ भारतीय हवाई दल यावेळी या युद्धसरावात पाच मिराज-2000 ही लढाऊ विमाने, दोन सी-17 ग्लोबमास्टर III आणि IL-78 हे हवेत इंधन भरणारे एक विमान यांच्यासह सहभागी होणार आहेत.
➤ या युद्धसरावाचा उद्देश :- हवाई युद्धामधील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये सहभागी होणे व विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धती शिकणे.
No comments:
Post a Comment