Sunday, 12 February 2023

13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिवस



▪️भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


▪️ भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे.


▪️सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 


▪️12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.


⏭️ जागतिक महिला दिवस :  8 मार्च

No comments:

Post a Comment