Tuesday, 31 January 2023

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!! MPSCचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. MPSC च्या परीक्षांसंदर्भातील नवे नियम 2025 पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

UPSC प्रमाणे आता MPSC परिक्षेत देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा यासाठी हे विद्यार्थी (MPSC NEWS) आंदोलन करत आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (MPSC NEWS) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...