Sunday, 22 January 2023

ग्रहाचे वर्गीकरण



- लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे दोन वर्ग केले आहे: अंतर्ग्रह, बहिर्ग्रह


अंतर्ग्रह : 

- सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा, याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. 

- बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांचे बनले आहे.

- बुध व शुक्र या दोन्ही ग्रहांचे कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत येत असल्याने त्यांना कक्षान्तर्गत ग्रह असेही म्हणतात.


बहिर्ग्रह : 

- लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. 

- यांत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा समावेश होतो. 

- सर्व ग्रहांना खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहेत. 

- या ग्रहांचे आकारमान मोठे आहे व त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...