३१ डिसेंबर २०२२

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थरी गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ गरीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ गरेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ यनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले

31 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✅ महाराष्ट्र

Q.2) महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले?
✅ चंद्रशेखरन विक्रम लिमये

Q.3) आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ‘बिजली उत्सव’ आयोजित केल्या गेला?
✅ आसाम

Q.4) बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे?
✅ इस्रायल

Q.5) केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ प्रवीण के श्रीवास्तव

Q.6) महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो, ज्यांना पेले म्हटले जाते, त्यांचे नुकतेच वर्षी निधन झाले आहे, ते कोणत्या देशाची खेळाडू होते?
✅ ब्राझील

Q.7) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2022 वर्षांतील सर्वोत्तम पुरुष ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे?
✅ सूर्यकुमार यादव

Q.8) आयसीसी पुरूषांच्या इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीत कोणत्या एका भारतीय गोलंदाजाला स्थान मिळाले आहे?
✅ अर्शदीप सिंग

Q.9) ‘स्टे सेफ ऑनलाइन’ मोहीम आणि ‘G20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स’ कोणी लाँच केले?
✅ अश्विनी वैष्णव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

न्यूटनचे गतीचे नियम

♦️भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत.

♦️हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात.

हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

पहिला नियम

♦️: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने पहिला नियम करत राहाते.

दुसरा नियम: 

बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.

तिसरा नियम:

जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.

महत्त्वाचे

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्ताच्या अणि या नियमांच्या साहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले.

यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नसून सार्वत्रिक आहेत हे स्पष्ट झाले.

तत्त्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत.

तसेच ज्या वस्तूवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते.

पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सूक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.

खारफुटी जंगले


♻️आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️


🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. 


🔸मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती,

🔸इग्रजीत मॅंग्रोव्ह असे म्हणतात.

🔸 तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.


🔷या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.


🔺भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे.



🔶जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत. 

🔹तयापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत. 

🔹पश्चिम किनार पट्टीवर २७,

🔹पर्व किनार पट्टीवर ४०,

🔹अदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.


♻️उपयुक्तता♻️


🔘खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. 


🔘मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते.


🔸कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. 


🔘तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. 

🔸टनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.


🔘निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात. 


🔘चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात. 


🔘खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात.


🔘मेस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.


 🔘Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो.


 🔘तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.


🔴या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा.🔴


✅ गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे. ✅

प्राचीन भारत इतिहास:



* वेद काल


०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.

०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.

०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.

०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.

०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.

०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.


* ऋग्वैदिक काळ


०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.

०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.

०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.

१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.

११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.

१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.

१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.

१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.

१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.

१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.

१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.

१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.

१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.

२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.


* उत्तर वैदिककाळ 


२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.

२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.

२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.

२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.

२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.

२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.

२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.

२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्माचे स्वरूप अधिकच जटील होत गेले. यज्ञात बळींचे तसेच पुरोहितांचे महत्व वाढत गेले. या काळात अनेक प्रकारचे यज्ञ केले जाऊ लागले.

वनस्पतीचे वर्गीकरण :




उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती

विभाग - 1 : थॅलोफायटा

· शरीर साधे , मऊ ,तंतुमय

· मूळ , खोड , पान, नसते.

· पाण्यात आढळतात .

· स्वयंपोषी असतात.

· लैगिक जननांग - युग्माकधानी

वर्ग - 1 : शैवाल

· वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी

· उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा

· प्रकाश स्वयंपोषी

वर्ग - 2 : कवक

· परपोशी पोषण पद्धती

· इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात.

· शरीर तंतुजालरूपी असते.

· तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.

· उदा. पेनिसिलीयम , म्युकर

· जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.

· उदा . अगॅरिकस

· एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .

· उदा . सॅकरोमायसिस

शैवाक -

· शैवाल व कवक एकत्र वाढ

· परस्परपूरक सहजीवन

· उदा . उस्निया (दगडफूल)

जीवाणू -

· एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव.

· निरनिराळ्या पोषण पद्धती.

· प्रजजन साध्या स्वरूपाचे.

विभाग -२ : ब्रायोफायटा

· निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

· बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

· शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ.

· मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

· उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया

विभाग -3 : टेरीडोफायटा

· पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.

· मूळ, खोड, पाने असतात.

· सहसा लहान पर्णिका असतात.

· सावलीत व दमट वातावरणात वाढतात.

· अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.

· 3 उपवर्गात विभाजन होते.

वर्ग -1 : लायाकोपोडीनी

· या वनस्पती नेच्यासारख्या असतात.

· उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला

वर्ग -2 : इक्वीसेटीनी

· नेच्यासारख्याच असतात.

· बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

· उदा. इक्वीसेटम

वर्ग -3 : फिलीसिनी

· वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.

· या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.

· बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.

· उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस

उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती

विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती

· यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात.

· या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.

· काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.

· उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)

· सदाहरित, बहुवार्षिक

· खोडाला फांद्या नसतात.

· नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.

· फळे येत नाहीत.

विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती

· या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.

· फुले हीच प्रजननांगे असतात.

· अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.

· 2 वर्गात विभागणी होते.

वर्ग -1 व्दिबिजपत्री वनस्पती

· बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.

· मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.

· पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.

· उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस

वर्ग -2 एकबिजपत्री वनस्पती :

· बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.

· मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे

· पानांचा शिराविण्यास समांतर असतो.

· फुल त्रीभागी.

· उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड

विज्ञान प्रश्नसंच


🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??*

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...