Tuesday, 13 December 2022

प्रार्थना समाज



🔸दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.


🔸सबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते.


🔸परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाची मिळतेजुळते असले तरी ब्राह्मो समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्‍चित केली होती.


🔸शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणाऱ्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी सन १८७६मध्ये मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली


🔸परार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले


🔸प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे : 

(१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे. 

(२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. (३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना. (४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे. 

(५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.

 (६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.


🔸रानडे-भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, द्वा. गो. वैद्य, विठ्ठल रामजी शिंदे वगैरेंच्या व्याख्यानांचे व प्रवचनांचे जे संग्रह उपलब्ध आहेत, त्यांवरून प्रार्थनासमाजाची ओळख पटते. उपनिषदे, इतर सर्व धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक सिद्धांत प्रार्थनासमाज मानतो. साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय अंतःप्रेरणेतून व स्वानुभवातून सत्याचे ज्ञान होऊ शकते. विवेकबुद्धीने धर्म व नीतितत्त्वे समजू शकतात. आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदनप्रधान असा हा प्रवृत्तिमार्ग आहे. सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सद्धर्म व सदाचरणावर आधारित असावा, यावर प्रार्थनासमाज भर देतो.


पर्यावरण विषयक महत्वाच्या परिषदा


🌀 रामसर परिषद = 1971 रामसर-इराण 

 👉खारफुटीचे  संवर्धन व व्यवस्थापण करण्यासाठी. Effective1975


🌀 सटोकहोम डिक्लेरेशन = 1972 पर्यावरण संवर्धनासाठी 

👉याद्वारे UNEP ची स्थापना करण्यात आली


🌀मॉट्रीयल प्रोटोकॉल=1987 मॉन्ट्रीयल-कॅनडा

👉ओजोन च्या संवर्धनासाठी. Effective 1989


🌀बसल करार= 1989 बेसल-स्वित्झर्लंड

👉 घातक कचरा संबंधी. Effective1992


🌀 CBD जैवविविधता करार= 1992 रिओ

👉 जवविविधता संवर्धन, याअंतर्गत दोन प्रोटोकॉल आहेत 1)कर्ताजिना 2000 2) नागोया 2010. Effective 1993


🌀 कयोटो प्रोटोकॉल = 1997 क्योटो-जपान

👉 जागतिक तापमानवाढ रोखणे त्यासाठी ग्रीनहाऊस कमी करणे. Effective 2005


🌀रॉटरडॅम परिषद= 1998 रॉटरडॅम-नेदरलँड

👉हानिकारक रसायनांबाबत. Effective 2004


🌀कार्टजिना प्रोटोकॉल = 2000 मोन्ट्रीयल-कॅनडा 

👉GM बायोसेफ्टी च्या नियमनासाठी. Effective 2003


🌀सटॉकहोम परिषद = 2001 स्तोमहोम -स्वीडन

👉दिर्घस्तायी जैविक प्रदूषक नियमन बाबत. Effective 2004


🌀 मीनामाटा करार=2013 कुमोमाटा-जपान

👉 मानवी पर्यावरणास मर्क्युरी पासून संरक्षणासाठी. Effective 2017

 

🌀 परिस करार= 2015 पॅरिस- फ्रान्स

👉 जागतिक तापमानवाढ कमी करणे. Effective 04 नोव्हेंबर 2016


भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव



🔰 इद्र : इंडिया - रशिया

🔰 कोंकण : इंडिया - ब्रिटन

🔰 इद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन

🔰 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन

🔰 हरिमाऊ शक्ति : इंडिया - मलेशिया

🔰 गरुड शक्ति : इंडिया - इंडोनेशिया

🔰 समुद्र शक्ति : इंडिया - इंडोनेशिया

🔰 इकुवेरीन : इंडिया - मालदीव

🔰 अल नागाह : इंडिया - ओमान 

🔰 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान

🔰 नसीम-अल-बहार : इंडिया - ओमान 

🔰 धर्मा गार्डीयन : इंडिया - जपान

🔰 सहयोग काजीन : इंडिया - जपान

🔰 शिन्यू मैत्री : इंडिया - जपान

🔰 जिमेक्स : इंडिया - जपान

🔰 परबळ दोस्त्याक : इंडिया - कझाकस्तान

🔰 नोमँडिक एलिफंट : इंडिया - मंगोलिया

🔰 बोल्ड कुरुक्षेत्र : इंडिया - सिंगापूर

🔰 खजर : इंडिया - किरगिस्तान

🔰 डीझर्ट इगल : इंडिया - युएई

🔰 फोर्स : आशियान

🔰 इमबेक्स : इंडिया - म्यानमार

🔰 सिम्बैक्स : इंडिया - सिंगापूर 

🔰 विंबैक्स : इंडिया - वियतनाम

🔰 सियाम इंडिया : इंडिया - थायलँड .

भारतीय राज्यघटना निर्मितीबाबत काही महत्वपूर्ण माहिती

🔸भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते.


★कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.


🔸मळ राज्यघटना छापील नव्हती .

 ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.


🔸परसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.


🔸वदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चित्रित करण्यात आले  आहे.


🔶26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर सदस्यांनी स्वाक्षरी केल्या.


२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या उर्वरित सर्व २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.


ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.


सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच

Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :-  मनीष पांडे

Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22

Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल

Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या ----------- चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी

Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन -------------- म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन

Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया

Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा ------------- म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा

Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण ---------------- आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय

Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम

Q10. नेहरू अहवालाचा मसुदा ----------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता _.
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...