Sunday, 11 December 2022

'कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा?


💎जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता की त्यांना तो भेट म्हणून देण्यात आला होता. हा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी नेहमीच विचारला जातो. मात्र आता या प्रश्नाचं कोडं लवकरच उलघडणार आहे. भारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्त्व विभागाने केला आहे. नऊ वर्षांच्या महाराजा दुलिप सिंह यांच्यासोबत करण्यात आलेल्या तहानुसार त्यांनी कोहिनूर हिरा हिसकावून नेला असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरातत्त्व विभागाने दिली आहे. 


💎महाराज रणजित सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता, हा सरकारचा दावा पुरातत्व विभागाच्या खुलाशामुळे आता खोटा ठरला आहे. एप्रिल 2016 मध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली होती. लाहोरच्या महाराजांनी कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात दिला होता, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच अँग्लो-शीख युद्धाच्या खर्चाची भरपाई म्हणून रणजित सिंह यांच्या नातलगांनी स्वेच्छेन कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता, असे सरकारने एका जनहित याचिकेला उत्तर देताना सांगितले होते.


💎सामाजिक कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी आरटीआय दाखल करून कोणत्या आधारावर कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता?, असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्तर दिले आहे. कोहिनूर हिऱ्याची माहिती मागवण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा यासंदर्भात मला काहीही माहिती नव्हते. म्हणून मी तो अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो अर्ज एएसआयकडे पाठवला, असे रोहित सबरवाल यांनी सांगितले. रोहित यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नोंदीनुसार लाहोरमध्ये लॉर्ड डलहौसी आणि महाराजा दुलिप सिंह यांच्यात 1849 साली कथित करार झाला असल्याचं सांगितलं. लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीकडे कोहिनूर हिरा सोपवला होता. परंतु दुलिप सिंह यांच्या इच्छेनुसार तो इंग्रजांकडे सोपवला नव्हता, हेच स्पष्ट होत आहे. कारण करार झाला त्यावेळी दुलिप सिंह केवळ 9 वर्षांचे होते, असे एएसआयने रोहित सबरवाल  यांना पाठवलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.

ससदीय प्रणाली व अध्यक्ष प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास.



🔵 ससदीय प्रणालीची वैशिष्ट्ये


▪️या प्रणालीमध्ये धोरणे व कृतींसाठी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.


1. बहुमताच्या पक्षाची सत्ता

2. सामूहिक जबाबदारीचे तत्त्व

5. राजकीय एकजिनसीपणा : एकच राजकीय विचारसरणी

4. दुहेरी सदस्यत्व : संसद सदस्य मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळ व कायदेमंडळ दोहोंचे सदस्यत्व.

5. पंतप्रधानाचे नेतृत्व

6. कनिष्ठ गृहाचे विसर्जन करता येते

7. अधिकारांचे एकत्रीकरण.


🔵 अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये


▪️यथे घटनात्मकदृष्ट्या कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळापासून स्वतंत्र असते.


1. अध्यक्ष आणि सभासद यांची निश्चित

कालावधीसाठी निवड.

2. सामूहिक जबाबदारी नाही.

3. राजकीय एकजिनसीपणा असेलच असे नाही.

4. एकेरी सदस्यत्व

5. अध्यक्षाचे नेतृत्त्व

6. अधिकारांची विभागणी


✅ ससदीय प्रणालीचे फायदे


1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात सामंजस्य.

2. उत्तरदायी सरकार.

3. विस्तृत प्रतिनिधित्व


✅ अध्यक्षीय प्रणालीचे फायदे


1. स्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये निश्चितता.

3. अधिकार विभागणीवर आधारित.

4. तज्ज्ञांचे सरकार.


🔴 ससदीय प्रणालीमधील उणीवा


1. अस्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये सातत्याचा अभाव.

3. अधिकार विभागणीच्या तत्त्वाविरोधी.

4. नवशिक्यांचे सरकार.


👉 उदा.बहुतांशी युरोपीय राष्ट्र, जपान, कॅनडा, भारत, मलेशिया, स्वीडन.


🔴 अध्यक्षीय प्रणालीमधील उणीवा


1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात संघर्ष.

2. उत्तरदायी सरकार नाही.

3. एकाधिकारशाही 

4. संकुचित प्रतिनिधित्व.


👉 उदा :- अमेरिकन राष्ट्रे काही अपवादसह (उदा. कॅनडा), अफगाणिस्तान, ब्राझील, घाना, मालदीव, रशिया, फिलिपिन्स, तुर्की, बेलारुस, सायप्रस, श्रीलंका.

विधानपरिषद ट्रिक 💡


  भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत
त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे
 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा   बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे
   Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी
 विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते
 मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो
 विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत

☘ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘
 T -Telangana ( तेलंगाणा)
 U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)
 B- Bihar ( बिहार)
 M- Maharashtra ( महाराष्ट्र)
 J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)
 A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)
 KAR- Karnatak (कर्नाटक)

लोकसभा

लोकसभा

लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.

■ सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.

■ मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.

■ उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

■ निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.

■ लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.

■ सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.

■ बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

■ गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

■ पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :
लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.

■ कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.
2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.
4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.
5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.
6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.
7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.
8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.
______________________________
आपल्या सर्व मित्राना आपले राज्यशास्त्र चॅनेल जॉईन करून द्या :

पोलीस भरती प्रश्नमंजुषा

 1) . संयुक्त राष्ट्रातर्फे जाहीर मानव विकास निर्देशांकानुसार खालील देशांचा त्यांच्या मानव विकास निर्देशांकानुसार चढता क्रम लावा.?

1) नॉर्वे-डेन्मार्क-ऑस्ट्रेलिया-अमेरिका 

2) डेन्मार्क-स्वित्झर्लंड-नॉर्वे- ऑस्ट्रेलिया

3) डेन्मार्क- नॉर्वे- ऑस्ट्रेलिया-नेदरलँड

4) नॉर्वे- ऑस्ट्रेलिया- स्वित्झर्लंड- डेन्मार्क. ☑️


2.  राष्ट्रीय ओष्णिक उर्जा महामंडळाची स्थापना ....

१) ७ नोव्हेंबर १९५४

२) ७ नोव्हेंबर १९७५☑️

३) १ नोव्हेंबर १९६४


3) लोकसभेला एकदाही सामारे न गेलेले पंतप्रधान कोण?

1) मोरारजी देसाई

2) लालबहादूर शास्त्री

3) चौधरी चरणसिंह☑️

4) इंदिरा गांधी



4) राजस्थान मैदानी प्रदेशाला काय म्हणतात.?

१) सहारा वाळवंट 

२) कलहारी वाळवंट

३) थरचे वाळवंट ☑️

४) गोबी वाळवंट



5) जास्तीत जास्त किंबहुना इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जमिन लागवडीखाली आणणारे भारतातील राज्य

१) पंजाब

२) हरियाना

३) उत्तर प्रदेश ☑️

४) महाराष्ट्र


*6) राष्ट्रीय ओष्णिक उर्जा महामंडळाची स्थापना ....*

१) ७ नोव्हेंबर १९५४

२) ७ नोव्हेंबर १९७५☑️

३) १ नोव्हेंबर १९६४

४) ३१ डिसेंबर १९९५


7 )खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

१) कथ्थकली : आंध्र प्रदेश ☑️☑️

२) भारतनाट्यम : तमिलनाडू

३) मोहिनीअट्यम : केरळ

४) सात्रीय : आसाम


8) खालीलपैकी कोणते नैसर्गिक बंदरे नाही ?

१) मुंबई 

२) मार्मागोवा ☑️

३) कोची

४) परव्दीप


9) भारतातील खेंड्याची एकूण संख्या सुमारे .....इतकी आहे

१) साडेसहा लाख ☑️

२) दहा लाख

३) सात लाख

४) साडेतीन लाख



10) मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?

 A) अजाण 

 B) अबोल 

 C) दररोज ☑️

 D) आडनाव


11) सन २०१८ मधील उपलब्ध माहितीनुसार भारतीय स्त्रिया सरासरी .... इतक्या अपत्याना जन्म देतात

१) ४.५

२)  २.३ ☑️

३) २.६

४) २.५


12) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रारंभ दरवर्षी ..... रोजी केला जातो

१) २६ जानेवारी 

२) १ मे

३) १५ ऑगस्ट ☑️

४) २ ऑक्टोबर


13) घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.

१) लोकसभा

२) कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा

३) लोकसभा व राज्यसभा

*४) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा* ☑️


14) .हुंडा प्रतिबंध कायदा , १९६१ च्या कलम ८ - ब नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन ........ची नेमणूक करू शकते .( PSI मुख्य २०१७ )

१ ) हुंडा प्रतिबंध पथक

२ ) हुंडा प्रतिबंध अधिकारी ☑️

३) हुंडा प्रतिबंध कक्ष 

४) हंड्याच्या खटल्यासाठी विशेष न्यायालय


15) .हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास ......अशी शिक्षा होतो .( PSI मुख्य २०१८ )

१ ) दोन वर्षापेक्षा कमी नाही 

२ ) तीन वर्षापेक्षा कमी नाही 

 ३ ) चार वर्षापेक्षा कमी नाही 

४ ) पाच वर्षांपेक्षा कमी नाही ☑️


16) . ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

श्रीलंका 

आयर्लंड

ग्रीनलंड ☑️

ऑस्ट्रेलिया


17) .  नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 

तापमान 

वातावरण ☑️


18) .  आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्युतीकरणावर ☑️

रूंदीकरणावर

संगणकीकरणावर

खासगीकरणावर


19) . पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.

९०° अक्षांश 

६०° अक्षांश

१८०° अक्षांश ☑️

३८०° अक्षांश


20) .  भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे?

श्रीहरीकोटा ☑️

कोचीन

हसन

बेंगलोर


21). भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.?

कॄष्णा 

दामोदर

अलमाटी

सतलज ☑️


22) . ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

जोग ☑️

नायगारा

कपिलधारा 

शिवसमुद्र


23) . भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. *मानवेंद्र नाथ रॉय ☑️*

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


24) . संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा ☑️

४. पं मोतीलाल नेहरू


25. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी ☑️


26). कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.?

१. कलम न 1 ☑️

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4

राज्यसभा.

🅾राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.

🧩सभासदांची संख्या :

🅾घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.

🧩उमेदवारांची पात्रता :

🅾घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

🧩निवडणूक पद्धत :

🅾राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.

🧩राज्यसभेचा कार्यकाल :

🅾राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.

🧩सभासदांचा कार्यकाल :

🅾प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.

🧩पदमुक्तता :

🅾कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

🧩बैठक किंवा आधिवेशन :

🅾घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.

🧩गणसंख्या :

🅾कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

🧩राज्यसभेचा सभापती :

🅾घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.

🧩उपाध्यक्ष :

🅾राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?


-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

भारतीय घटनेचे मूळ स्त्रोत



संसदीय शासन पद्धती : इंग्लंड


मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड


मूलभूत हक्क : अमेरिका


न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका


न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका


कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड


सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड


कायदा निर्मिती : इंग्लंड


लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड


संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया


शेष अधिकार : कॅनडा


महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या

⭕️ महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या

क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा

⭕️ कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा

⭕️ भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय

⭕️ हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग

⭕️ बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा

क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.

⭕️ द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.

क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०

⭕️ भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत

क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)

⭕️ भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?

क्लुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान

⭕️ आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा

⭕️ सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती

⭕️ दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने

क्लुप्ती : ऑबिलीपी

ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट

⭕️  महाराष्ट्रातील घाट

आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट

⭕️ सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव

⭕️ सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव

⭕️ महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी

⭕️  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

क्लूप्त्या : 'गोभीकृतान '

गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा.

महाराष्‍ट्राचा-महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

👉 महाराष्ट्राचा बहुतांशी भाग ज्वालामुखी निर्मित बेसॉल्ट या खडकाचा बनलेला आहे. राज्यात जुने अनावृत्त खडक वैनगंगेच्या खो-यात आहेत. त्यानंतर विदर्भ व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो.


👉 १. कोकण किनारा –


 

👉 उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे.


👉 अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी


👉 कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी


👉 कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९ 


👉 रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा


👉 कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) 


👉 रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड


👉 महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई


👉 राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई)


👉 राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा


👉 कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय


👉 कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प – उरण (रायगड)


👉 कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव


👉 दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा


👉 कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट. 



महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग 

1]. कोकण किनारपट्टी 

2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट 

3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी


1]. कोकण किनारपट्टी :


🔸 सथान: अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.


🔸 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.


🔸 लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  


🔸कषेत्रफळ: 30,394 चौ.कि 

----------------------------------------------

2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :


🔸 सथान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.


🔸 यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.


🔸 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. 

उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

------------------------------------------------

3]महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :


🔸 सथान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.


🔸 लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.


🔸 ऊची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.


🔸 महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे

लुशाई टेकड्या.


🅾️लशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.


🅾️जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.


🅾️या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.


🅾️या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.


🅾️या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.