०८ डिसेंबर २०२२

रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कार्ये


1) चलन विषयक धोरण अंमलबजावणी – चलन विषयक धोरणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर टाकण्यात आली आहे. रिझर्व बँक दर सहा महिन्यांनी चलनविषयक धोरण अहवाल प्रकाशित करते, या अहवालात चलनवाढीचे स्त्रोत, पुढील 6 महिने ते 18 महिन्यातील चलनवाढीच्या शक्‍यता या बाबी स्पष्ट केलेल्या असतात .


2) चलन प्रचालन – एक रुपयाची नोट सोडून इतर सर्व नोटा छापण्याचे काम रिझर्व बॅंक करते सर्व नाणी व सर्व नोटांचे प्रचालनाचे (म्हणजे व्यवहारात आणण्याचे) काम रिझर्व बँक करते.


3) सरकारची बँक – सरकारच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी रिझर्व बँकेवरती असते. रिझर्व बँक कायदा 1934 नुसार केंद्र सरकारचे पैसा देणे विनिमय बँकिंग व्यवहार आणि कर्ज याबाबत विश्वसनीय म्हणून रिझर्व बॅंक काम पाहते. करार केल्यास राज्य सरकार यांसाठी बँकर आणि कर्जाची व्यवस्थापक म्हणून रिझर्व बँक काम पाहू शकते.

 

4) बँकांची बँक – देशातील सर्व बँकांचे खाते रिझर्व बँकेत असते. या खात्यामार्फत रिझर्व बँक बँकांना बँकिंग सुविधा पुरवते. रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते, बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून उभी राहते, बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन रिझर्व बॅंक देत असते.


5) निरसन गृह –

रिझर्व बँक निरसन गृह म्हणून कार्य करते. आंतर बँक व्यवहारांची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसन गृह होय. प्रत्येक बँकेकडे इतर बँकाकडून चेक, डिमांड ड्राफ्ट इत्यादी बाबी वटवण्यात येत असतात. तसेच इतर बँकांचे त्या बँके वरती चेक, डिमांड ड्राफ्ट आलेले असतात. अशा व्यवहारातून प्रत्येक बँकेला इतर बँकाकडून काही पैसे येणे व काही देणे असतात या व्यवहारांची पुर्तता करण्यासाठी बँकांचे प्रतिनिधी प्रत्येक दिवशी निरसन गृहांमध्ये एकत्र जमून आपापसातील निव्वळ येणी-देणी ठरवतात. हा व्यवहार रोखीने करण्याऐवजी आरबीआय वर चेक, ड्राफ्ट काढून पूर्ण केला जातो. प्रत्येक बँकेचे आरबीआय मध्ये खाते असते त्या चेक, ड्राफ्ट नुसार आरबीआय संबंधित बँकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करते किंवा कमी करते.


6) पतनियंत्रण – व्यापारी बँका ठेवी स्वीकारून त्यातून कर्ज देत असतात या प्रक्रियेत बँक पतनिर्मिती करीत असतात व्यापारी बँकेच्या पत निर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य आरबीआय करते.

 

7) परकीय चलन साठ्याचा नियंत्रक – देशाच्या परकीय चलन साठ्याचा सांभाळ आरबीआय करते. चलनाच्या अंतर्गत व बहिर्गत मूल्य स्थिर राखण्याचे कार्य आरबीआयला करावे लागते. रिझर्व बँक ऑफ इंडिया चलन साठ्याचा सांभाळ करून त्याचा वापर व्यवहार तोल संतुलित ठेवण्यासाठी तसेच रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी करते. रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्याच्या आरबीआयच्या धोरणाला Sterilisation Policy असे म्हणतात.


8) बँक व्यवस्थेची नियंत्रक – रिझर्व बँक बँकिंग व्यवस्थेचे नियंत्रण करीत असते. देशातील सर्व व्यापारी बँका वित्तीय संस्था यांचे नियमन रिझर्व बँक करते. प्रादेशिक ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँका यांच्या कामकाजाचे नियमन रिझर्व बँकेचा ग्रामीण नियोजन व पत विभाग करतो.

खास सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त

1. जय एक वस्तू 70 रु. ला खरेदी करतो आणि 84 रुपयास विकतो तर या व्यवहारात जयला किती % नफा होतो?

 1) 25
 2) 20
 3) 30
 4) 10

उत्तर : 20

2. जानवी एक वस्तू 400 रूपायास खरेदी करते त्यावर तिला खरेदी किमतीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 400
2)  450
 3) 475
 4) 500

उत्तर : 500

3. आचल एक खुर्ची 360 रुपयास विकते त्यावर तिला 20% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  380
 2) 340
 3) 300
 4) 500

उत्तर : 300

4. एका विक्रेता काही वस्तू 200 रूपयास खरेदी करतो. त्यावर त्याला खरेदी किमतीच्या 1/5 नफा होतो. तर त्याला किती टक्के नफा होतो?

1)  20
 2) 25
 3) 30
 4) 40

उत्तर : 20

5. एक विक्रेता एक ड्रेस 350 रुपयास खरेदी करतो व 20% नफ्याने विकतो तर त्याची विक्री किंमत किती?

 1) 370
 2) 280
 3) 300
 4) 420

उत्तर : 420

6. 12 साबनांची खरेदी किंमत ही 10 सबनांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा या तोटा होतो?

 1) 20% तोटा
 2) 25% नफा
 3) 20% नफा
 4) 25% तोटा

उत्तर : 20% नफा

7. एक वस्तू दिलीप 89 रूपयास विकतो. त्यामुळे त्याला तोटा होतो. तेवढाच नफा ती वस्तु 121 रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

 1) 100
 2) 210
 3) 70
 4) 105

उत्तर : 105

8. एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किंमतीवर विक्रेता 15% सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 1020
 2) 1050
 3) 1000
 4) 1215

उत्तर : 1020

9. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपयास विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  740
 2) 700
 3) 750
 4) 600

उत्तर : 600

10. एक वस्तू 37 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 57 रुपयास विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  67
 2) 37
 3) 57
 4) 47

उत्तर : 47


वाचा :- रुपायाचे अवमूल्यन (Devaluation Of Rupee)

अर्थ: रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय


परिणाम: 


आयातीचे आकारमान कमी होते

निर्यातीचे आकारमान वाढते

आत्तापर्यंत रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडून आले आहे.


🛑 पाहिले अवमूल्यन, 1949


26 सप्टेंबर 1949 5% (अमेरिकन डॉलरच्या संदर्भात) तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई.


🛑 दसरे अवमूल्यन, 1966


6 जून 1966 5% (अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन)

उद्दिष्ट्ये: हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे

निर्यात वाढवणे

 व्यापारतोल कमी करणे

तत्कालीन अर्थमंत्री: सचिन चौधरी.


🛑तिसरे अवमूल्यन, 1991


तीन टप्प्यांमध्ये

1 जुलै 1991 9%

3 जुलै 1991 10 ते78%

15 जुलै 1991 2%

सरासरी 5%

तत्कालीन अर्थमंत्री: मनमोहन शिंग.

मराठी व्याकरण



१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? 

o   विश्वास पाटील

o   आनंद यादव

o   रणजीत देसाई

o   शिवाजी सावंत ✅


२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   यशवंत कानेटकर

o   वि. स. खांडेकर ✅

o   व्यंकटेश माडगुळकर

o   आण्णाभाऊ साठे


३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ? 

o   आण्णाभाऊ साठे ✅

o   बा. भ. बोरकर

o   गौरी देशपांडे

o   व्यंकटेश माडगुळकर


४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   लक्ष्मीकांत तांबोळी

o   प्रा. व. भा. बोधे

o   विश्वास महिपाती पाटील ✅

o   वा. म. जोशी


५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ? 

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅

o   चंद्रमुखी

o   ग्रंथकाली

o   मंजुघोषा


६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत . 

o   नामदेव ढसाळ ✅

o   दया पवार

o   जोगेंद्र कवाडे

o   आरती प्रभू


७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   झाडाझडती

o   संभाजी

o   बनगरवाडी ✅

o   सात सक त्रेचाळीस


८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   श्री. ना, पेंडसे

o   भालचंद्र नेमाडे ✅

o   रा. रं. बोराडे

o   ग.ल. ठोकळ 


९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ? 

o   मुक्तामाला

o   बळीबा पाटील

o   यमुना पर्यटन ✅

o   मोचनगड


१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   एकेक पान गळावया ✅

o   स्फोट

o   कल्याणी

o   झाड


११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ? 

o   गौरी देशपांडे

o   शैला बेल्ले

o   जोत्स्ना देवधर

o   सुमती क्षेत्रमाडे ✅


१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ? 

o   डॉ. यशवंत पाटणे ✅

o   आशा कर्दळे

o   ह.ना.आपटे

o   व.ह. पिटके


१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ? 

o   वामन परत आला

o   जगबुडी

o   एक होता फेंगाड्या

o   गावपांढर ✅


१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   राजेंद्र मलोसे ✅

o   भाऊ पाध्ये

o   दादासाहेब मोरे

o   जयंत नारळीकर


१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   कल्पनेच्या तीरावर ✅

o   गारंबीचा बापू

o   पांढरे ढग

o   वस्ती वाढते आहे


अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion)

◆ 2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....

◆ कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.

1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.

2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.

4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.

5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.

6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.

7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.

८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.

9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.

10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.

11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

आत्मविश्वास वाढवायचाय ?

'आत्मविश्वास' या शब्दातच यशाचे गमक दडलेले असते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवू शकता. काही खास टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवू शकता...

1) टेन्शन नही लेने का : सतत हसत रहा. तुम्हाला कितीही टेन्शन असलं तरी ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. अपयश आलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण टेन्शन घेतलं कि, आत्मविश्वास कमी होत असतो.

2) पेहरावाकडे लक्ष द्या : तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता. त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. चांगले दिसण्याने तुम्ही लोकांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. कारण चार-चौघात आपण कसे दिसतो? अशा शंकांमुळे न्यूनगंड निर्माण होत असतो. म्हणून पेहरावाकडे लक्ष द्या.

3) यशस्वी लोकांकडे लक्ष द्या : तुमच्या आसपास अशी काही लोक असतात. ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्यक्ती आत्मविश्वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्य द्या आणि ती करत असलेल्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्यात फॉलो करा.

4) प्रयत्न करा : एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडून देऊ नका. ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका.

5) तुलना नको : स्वतःची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीच तुलना करूच नका. कारण समोरचा कसा आहे? हे फक्त समोरून दिसत असते. त्याच्याबाबत पूर्ण सत्य आपल्याला माहिती नसते. म्हणून त्याच्याशी तुलना करू नका.

6) मान्य करा : बदल करण्यासाठी व आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतीही गोष्ट मान्य करायला पाहिजे. जसे कि, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती मान्य करा उगाच मिरवत बसू नका.

7) बिनधास्त बोला : तुम्ही जर दबलेल्या आवाजात बोलत असाल. तर ते आजच बंद करा. कारण यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणून बिनधास्त बोला.

8) स्वत:ची स्तुती करा : दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा व स्वतःची स्तुती करा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...