Thursday, 1 December 2022

प्रश्न मंजुषा



🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.

१) मोद्रिक धोरण.
२)राजकोषीय धोरण ✔️✔️
३)द्रव्य निर्मिती
४) चलनविषयक धोरण
_____________________________

🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे.
१) लोखंड व कार्बन
२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️
३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट
४) लोखंड टीन व कार्बन
_____________________________

🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

१)छोटा नागपूर
२)अरवली ✔️✔️
३) मालवा
४) विध्य
_____________________________

🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.
१) कांगारू
२) पेग्विन
३) व्हेल
४) प्लॅटिपस ✔️✔️
_____________________________

🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे
१)दुसरे
२)पाचवे
३)सातवे
४)नववे ✔️✔️
_____________________________
🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

१) लॅडस्टयनर ✔️✔️
२)फुन्क
३)स्टेड
४)विल्यम हार्वे
_____________________________

⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते
१)पारा
२) चांदी
३) पाणी ✔️✔️
४) लोखंड
_____________________________
🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.

१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️
२) लोकमान्य टिळक
३) न्यायमूर्ती रानडे
४)म.गांधी
_____________________________

🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो
१)ग्लुकोज
२) लक्टोज
३)रेनिन
४)केसिन ✔️✔️
_____________________________

🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.
१)सी -१४  ✔️✔️
२) सी -१३
३) सी -१२
४) यापैकी एकही नाही

_____________________________

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राचा इतिहास




⭕️ मौर्य ते यादव ⭕️


(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)



👉 मौर्य साम्राज्याचा काळ


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.



👉 सातवाहन साम्राज्याचा काळ


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.



👉 वाकाटकांचा काळ


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



👉 कलाचुरींचा काळ


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.



👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.



👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.



👉 यादवांचा काळ


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

________________________________________

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात


 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ.
▪ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
▪ पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)
▪पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
▪ पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
▪ पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)
▪ पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
▪ पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
▪ पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली
▪ पहिले व्यापारी विमानोड्डापण-  कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
▪ पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
▪ पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)
▪ पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
▪ पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
▪ पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा
▪ पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)
▪ पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)
▪ पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल
▪ पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)
▪ पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)
▪ पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)
▪ पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा
▪ पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात
▪ भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता
▪ पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)
▪ भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

दक्षिण भारतातील उठाव

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...