Wednesday, 30 November 2022

गूणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती :-

१) डाऊन सिंड्रोम/मंगोलिकता :- 46+1

●  यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे असतात 

● (46+ 1) या विकृतीला ट्रायसोमी - 21 असेही म्हणतात. (21व्या गुणसूत्राची त्री - समसुत्री अवस्था)

● कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21 व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर 1 अधिकचे गुणसूत्र असते.

 ● त्यामुळे अशा  अर्भकात 46 ऐवजी  47 गुणसूत्रे दिसतात.

● अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्ये आहे.

_____________________________


२) टर्नर सिंड्रोम :- 44+X

● लिंग गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे निर्माण होतो.

● या विकारांत X गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भाग निकामी झालेला असल्याने एकच X गुणसूत्र कार्यरत असते किंवा जनकांकडून एकच X गुणसूत्र संक्रमित होते.

● अशा स्त्रियांमध्ये 44+XX या स्थिती ऐवजी 44+X अशी स्थिती असते.

● अशा स्त्रियांमध्ये प्रजानेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात.

_____________________________


३) क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम:- 44+XXY

● पुरुषांमधील लिंग गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे हा विकार उद्भवतो.

● यात पुरुषांमध्ये 44+XY खेरीज X गुणसूत्र अधिक असल्यामुळे गुणसूत्रांची एकूण संख्या 44+ XXY कशी होते.

● ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात ते पुरुष अल्पविकसित आणि प्रजननक्षम नसतात.

_____________________________


🎯 एक जुणुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग :-

★ हचिन्सन रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ऍनीमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा...etc

_____________________________


🎯 ततुकणिकीय विकृती :- 

★ भ्रूण विकसित होताना अंड पेशीकडूनच तंतुकणिका येत असल्याने या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त मातेकडूनच संततीला मिळतात 


उदा. लेबेरची अनुवंशिक चेताविकृती

_____________________________


🎯 बहुजणूकीय  उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती 

उदा. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा अतिस्थूलता.

पोलीस भरती प्रश्नसंच

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर

विज्ञान प्रश्नसंच


🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...