Monday, 21 November 2022

भारतातील काही महत्त्वाची नवाश्मयुगीन स्थळे :


१. भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश 

पहिल्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ७००० ते ६०००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ६००० ते ४५००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती.


२. जम्मू आणि काश्मीर 

काश्मीरमधील बुर्झोम आणि गुफक्राल येथे इसवी सनापूर्वी २५०० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


३. उत्तर प्रदेश 

उत्तर प्रदेशातील चोपनी मांडो, कोलढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी ६००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


४. बिहार 

बिहार येथील चिरांड, सेनुवार यांसारखी स्थळे. येथे इसवी सनापूर्वी २००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली. 


५. ईशान्य भारत 

आसाममधील दाओजाली हाडिंग येथील उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मयुगाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम उजेडात आला. तेथील गाव वसाहतींची सुरुवात इसवी सनापूर्वी २७०० च्या सुमारास झाली. येथे मिळालेली नवाश्मयुगीन हत्यारे चीनमधील नवाश्मयुगीन हत्यारांशी अधिक साम्य दर्शवणारी आहेत.


६. दक्षिण भारत 

कर्नाटकातील संगणकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा, तमिळनाडूतील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे चौथ्या ते तिसऱ्या शतकांत नवाश्मयुगाची सुरुवात झाली.

रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते


1)  रक्तद्रव ( Plasma )

2) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


🔸 रक्तद्रव (Plasma)


अ.)  रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी,

6 ते 8% प्रथिने

1 ते 2% असेंद्रिय क्षार

व इतर घटक असतात.


आ.) अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.


इ.)  ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.


ई) फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.


उ)  असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू ठेवतात. कार्याचे नियंत्रण


🔸रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


1. लोहित रक्तपेशी (RBC) 

आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. 


• रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.


2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) 


आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात


🔸 या पेशींचे 5 प्रकार आहेत - 

बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील,

मोनोसाईट्स लिम्फोसाईट्स


• पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.


🔸 कार्य- 

पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.


3. रक्तपट्टीका (Platelets)


• या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. 

• रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. 


🔸 कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

- CWG 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकलेली पदकं!



➡️ वेटलिफ्टर - मीराबाई चानू 

(🥇सुवर्णपदक)


➡️ वेटलिफ्टर - जेरेमी लालरिनुंगा 

(🥇सुवर्णपदक)


➡️ वेटलिफ्टर - अंचिता शेउली 

(🥇सुवर्णपदक)


🛑 लाॅल बाॅल्स - भारतीय महिला संघ 

(🥇सुवर्णपदक)


🛑 टेबल टेनिस - भारत 

(🥇सुवर्णपदक)


➡️पॅरा पाॅवरलिफ्टींग - सुधीर 

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - बजरंग पुनिया 

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला कुस्तीपटू - साक्षी मलिक 

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - दिपक पुनिया

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - रवी कुमार दहिया

(🥇 सुवर्णपदक)


➡️महिला कुस्तीपटू - विनेश फोगट

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - नवीन 

(🥇सुवर्णपदक)


➡️पॅरा टेबल टेनिस - भाविना पटेल

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला बॉक्सर - नितू गंगस

(🥇सुवर्णपदक)


➡️बॉक्सर - अमित पंघाल 

(🥇सुवर्णपदक)


➡️ट्रिपल जंप - एल्धोस पाॅल

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला बॉक्सर - निखत झरिन 

(🥇सुवर्णपदक)


➡️टेबल टेनिस मिश्र दुहेरी गट - शरथ कमल आणि श्रीजा अकुला 

(🥇सुवर्णपदक)



➡️बॅडमिंटन पुरुष एकेरी गट - लक्ष्य सेन

(🥇सुवर्णपदक)


➡️बॅडमिंटन महिला एकेरी गट - पि.व्ही.सिंधू 

(🥇सुवर्णपदक)


➡️टेबल टेनिस पुरुष एकेरी गट - शरथ कमल 

(🥇सुवर्णपदक)


➡️ बॅडमिंटन पुरुष दुहेरी गट - सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

(🥇सुवर्णपदक)





➡️ वेटलिफ्टर - संकेत सरगर 

(🥈रौप्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - बिंदीयाराणी देवी 

(🥈रौप्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - विकास ठाकुर 

(🥈रौप्यपदक)


⭐ ज्युडो - सुशीला देवी 

(🥈रौप्यपदक)


⭐️ज्यूडो - तुलिका मान

(🥈रौप्यपदक)


🏸भारतीय बॅडमिंटन संघ 

(🥈 रौप्यपदक)


➡️लांब उडी - मुरली श्रीशंकर

(🥈रौप्यपदक)


➡️महिला कुस्ती - अंशू मलिक 

(🥈रौप्यपदक)


➡️लाॅन बाॅल्स - भारतीय पुरुष संघ 

(🥈रौप्यपदक)


➡️स्टीपलचेस 3000 मीटर - अविनाश साबळे 

(🥈रौप्यपदक)


➡️10000 मीटर रेस वाॅक प्रियंका गोस्वामी 

(🥈रौप्यपदक)


➡️ट्रिपल जंप - अब्दुला अबूबकर

(🥈रौप्यपदक)


➡️टेबल टेनिस दुहेरी गट - शरथ कमल साथियान ज्ञानसेकरन 

(🥈रौप्यपदक)


➡️भारतीय महिला क्रिकेट संघ 

(🥈रौप्यपदक)


➡️बॉक्सर - सागर अहलावत 

(🥈रौप्यपदक)


➡️भारतीय पुरुष हॉकी संघ - 

(🥈रौप्यपदक)





⭐  ज्युडो - विजय कुमार 

(🥉कांस्यपदक)


➡️उंच उडी - तेजस्वीन शंकर 

(🥉 कांस्यपदक)


➡️ स्क्वाॅश - सौरव घोषाल

(🥉 कास्यंपदक)


➡️ वेटलिफ्टर  - गुरुराज पुजारी 

(🥉कांस्यपदक)


➡️वेटलिफ्टर - गुरदीप सिंह 

(🥉कांस्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - हरजिंदर कौर 

(🥉कांस्यपदक)


➡️वेटलिफ्टर - लवप्रीत सिंग 

(🥉कांस्यपदक)


➡️कुस्तीपटू - मोहित ग्रेवाल

(🥉कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - दिव्या काकरान

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सिंग - जस्मीन लंबोरीया 

(🥉 कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - पुजा गेहलोत

(🥉कांस्यपदक)


➡️पॅरा टेबल टेनिस - सोनलबेन पटेल

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सर - रोहित टोकस 

(🥉कांस्यपदक)


➡️कुस्तीपटू - दिपक नेहरा

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सर - मोहम्मद हुसामुद्दीन

(🥉कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - पुजा सिहाग

(🥉कांस्यपदक)


➡️हाॅकी - भारतीय महिला संघ 

(🥉कांस्यपदक)


➡️10,000 मीटर रेस वाॅक - संदिप कुमार 

(🥉कांस्यपदक)


➡️महिला भालाफेकपटू - अणू राणी 

(🥉कांस्यपदक,60 मीटर भाला फेकला)


➡️ बॅडमिंटन - किंदाबी श्रीकांत 

(🥉कांस्यपदक)


➡️स्क्वॅश दुहेरी मिश्र गट - सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल 

(🥉कांस्यपदक)


➡️बॅडमिंटन दुहेरी गट - गायत्री पुलेला आणि त्रिशा जाॅली 

(🥉कांस्यपदक)


➡️टेबल टेनिस पुरुष एकेरी गट - ज्ञानशेखर साथीयान 

(🥉कांस्यपदक)


🇮🇳 भारताची आत्तापर्यंतची कामगीरी 

(🥇22 , 🥈 16 , 🥉 23) एकुण 61 पदके.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...