अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो.
परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.
खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते.
अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.
बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो.
म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.
यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.
लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते.
पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.
पेचकस स्क्रुला लंब असल्यास लावलेले बल स्क्रुच्या टोकाकडे सर्वाधिक संक्रमित होते.
यावरून असे स्पष्ट होते की वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.
एखाधा पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते.
बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.
दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.
दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ.
लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात.
एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.
दाब = उत्प्लाविता / क्षेत्रफळ.
SI पद्धतीमध्ये दाब N/m२ मध्ये मोजतात.
त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ‘पास्कल’ (Pa) असेही म्हणतात.
बल वाढल्यास दाब वाढतो.
बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ कमी झाल्यास दाब वाढतो.
फळे कापायच्या सुरीला धार लावल्यामुळे सूरीवर लावलेले बल किमान क्षेत्रफळावर कार्य करते अन फळ चटकन कापले जाते.