Saturday, 15 October 2022

कायमधारा पध्दत


   प्रायोगिक स्वरूपात :- इ.स. 1790
   कायम स्वरूपात :- इ.स. 1793
   ठिकाण :- बंगालa, बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी
   प्रमाण :- भारतातील एकूण शेतजमीनीच्या 19%
   महसूल वाटणी :- शासन, जमीनदार व शेतकरी
   संकल्पना :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   गव्हर्नर :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   प्रभाव :- सर जॉन शोअर
   इतर नावे - जहागिरदारी पध्दत, मालगुजारी पध्दत, बिसवेदारी पध्दत.
वॉरन हेस्टिंग याने जमीन महसुल वसुल करण्याच्या अधिकारांचे लिलाव करण्याची पध्दत स्विकारली होती. मात्र ही व्यवस्था काही उपयोगात ठरली नाही. यामुळे हेस्टिंग्जच्या या पध्दतीतील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने 1789 मध्ये सर जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सर जाॅन शोअर समितीच्या शिफारशी नुसार, कायमधारा पध्दत लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतात इ.स. 
1790 ला 10 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू केली होती, परंतू नंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था कायमस्वरूपासाठी लागू केली. म्हणूनच या व्यवस्थेला कायमधारा पध्दत असे म्हणतात.
कायमधारा पध्दतीत जमीनीचा मालक जमीनदार असून प्रत्यक्ष शेतकरी हा भुदास असतो.
या पध्दतीत शेतसारा हा रोख स्वरूपात गोळा केला जात असल्याने या पध्दतीत व्यापारवादाची तत्वेदिसतात.
या व्यवस्थेत संपूर्ण जमिनीचे महसुल गोळा करण्याची जबाबदारी ही संपुर्णपणे जमिनादारांवरच सोपविण्यात आली.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या महसुलांपैकी विशिष्ट रक्कम ही जमिनदाराने ब्रिटीशांना महसुल रूपात देणे आवश्यक होते.
या व्यवस्थेनुसार जमिनदार व शेतकरी यांच्यात करारनाम्याची तरतूद होती जेणे करुन जमीनदाराला शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम महसूल रुपात मिळेल. परंतू तसे प्रत्यक्षात न झाल्यामुळे जमिनदार शेतकऱ्यांकडून कितीही महसुल वसुल करु शकत होता व ती जास्तीची रक्कम ही ब्रिटीशांना देण्याची 
गरजही नव्हती.
1799 मध्ये तर महसूलाची रक्कम वेळेत न मिळाल्यास जमिनदारास शेतकऱ्याची जमीन, अवजारे किंवा जनावरे जप्त करण्याचा अधिकार मिळाला व यासाठी त्यास न्यायालयाच्या परवानगीची गरज देखील नव्हती.
या व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन महसुलाची रक्कम ही कायमची ठरविण्यात आली. यानुसार 89 टक्के सरकारला व 11 टक्के जमीनदारांना असे जमीन महसूलाच्या रकमेचे दोन भाग करण्यात आले होती.
शेतसारा हा 30 ते 40 वर्षेस्थिर असेल.यात वाढ करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
या कायमधारा पध्दतीचे लाभार्थी हे केवळ जमिनदारच बनत असे.
या व्यवस्थेवर सर जॉन शोअर याचा प्रभाव होता.
जॉन शोअर समितीच्या शिफारसीनुसार या समितीत जेम्स ग्रँट आणि जोनार्थन डंकन हे इतर सदस्य होते.
ही पध्दत सुरूवातीला केवळ बंगाल प्रांतामध्ये लागु करण्यात आली हाेती. 
तिचा विस्तार पुढे बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी या भागांमध्ये करण्यात आला.
भारतातील एकुण शेतजमिनीच्या 19 % क्षेत्रफळावर ही पध्दत अस्तित्वात होती.
विल्यम बेंटिकने आपल्या 1829 च्या भाषणात कायमधारा पध्दतीचे फायदे स्पष्ट केले होते.

इतिहास प्रसिद्ध

   
” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स.

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) :


इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले.
इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी ‘स्वराज्य’ हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावरून ‘स्वराज्य’ या ध्येयाची प्रथमच घोषणा. याच अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला.
1907 च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.
व्हाईसरॉय कर्झनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय बनला.
भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून रिपनला ओळखतात.
हार्डिंगने ब्रिटिशांची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलवली.

भारतमंत्री मॉन्टेंग्यूच्या रोपोर्टनूसार व्हाईसरॉय चेम्सफोर्डने प्रांतात वैध प्रशासनाचा (व्दिदल शासनपद्धती) प्रारंभ केला.
1919 ला पंजाब प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.
13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग हत्याकांड घडले.
लखनौ अधिवेशन (1916): या अधिवेशनात काँग्रेस 1907 नंतर सांधली गेली. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजूमदार. या अधिवेशनात 1909 च्या मॉर्ले मिंटो कायद्याव्दारे मुस्लिमांना दिलेल्या स्वतंत्र मतदार संघाची तरतूद काँग्रेसने मान्य केली.
होमरूल चळवळ म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळणे होय.
होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.

होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.
होमरूल चळवळ भारतात सुरू करण्याचे श्रेय आयरिश विदुषी अॅनी बेझेंटकडे जाते.
1 सप्टेंबर 1916 पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.
एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे स्वतंत्रपणे होमरूल चळवळीसाठी संघटना स्थापन केली.

इ.स. 1795 :- खर्ड्याची लढाई


सदरील लढाई ही पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च 1795 साली महाराष्ट्रातील 
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता. जामखेड) येथे झालेली एक निर्णायक लढाई होती.
मराठा साम्राज्यवादी विस्तार करू इच्छिणाऱ्या नाना फडणवीसने हैद्राबादच्या निजामाकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली होती. निजामाचा मंत्री मुशिर मुल्कने सदरील मागणी फेटाळून लावताच पेशवा, दौलतराव शिंदे (मादजी शिंदेचा 
वारस), तुकोजी होळकर व दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च 1795 मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. 
यावेळी निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली असता ब्रिटिशांनी सदरील मदत नाकारली. परीणामी उघड्या मैदानावर मराठ्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. या किल्याला लगेचच मराठ्यांनी वेढा घातला व या किल्याला होणारा पाणी पुरवठा व अन्न पुरवठा खंडीत करुन किल्ल्या भोवती तोफा रचल्या.
अखेर भयग्रस्त निजामाने 13 मार्च 1795 साली तहाची याचना करून लढाईतून माघार घेतली व या तहाने सदरील लढाईची सांगता झाली. या लढाईत पराभुत झाल्यावर निजामानेही इंग्रजांची साथ सोडून दिली.
              या तहातील अटींनुसार, 
निजामाने मराठ्यांना 5 कोटी रुपये, थकलेल्या चौथाई देण्याचे मान्य केले.
स्वत:च्या ताब्यातील प्रदेशांपैकी एक तृतीअंश प्रदेश मराठ्यांचा स्वाधीन केला.
दौलताबादचा किल्ला तसेच त्याच्या भोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला.
तसेच वऱ्हाडचा प्रदेश नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला.

महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०:


मौर्य साम्राज्याचा काळ :
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ :
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ :
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचुरींचा काळ :

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ :
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ :
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ :
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

चालू घडामोडी


टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग 2023 जाहीर करण्यात आली आहे.

या वर्षी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरने भारतीय विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे.

पाच भारतीय विद्यापीठांनी जगातील शीर्ष 500 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे.

IISc 251-300 ब्रॅकेट अंतर्गत ठेवण्यात आले आहे. शीर्ष 10 भारतीय विद्यापीठांची संपूर्ण यादी खाली सूचीबद्ध आहे.

जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स 2022) 121 देशांपैकी भारताचा क्रमांक 107 आहे.

जागतिक भूक निर्देशांकात 121 देशांपैकी भारताचा क्रमांक 107 आहे ज्यात युद्धग्रस्त अफगाणिस्तान वगळता दक्षिण आशियातील सर्व देशांपेक्षा वाईट स्थिती आहे.

भारताचा 29.1 स्कोअर त्याला ‘गंभीर’ श्रेणीत ठेवतो. भारत श्रीलंका (64), नेपाळ (81), बांगलादेश (84) आणि पाकिस्तान (99) च्याही खाली आहे.

अफगाणिस्तान (109) हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे जो निर्देशांकात भारतापेक्षा वाईट कामगिरी करतो.

15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन 2022 साजरा करण्यात आला.

15 ऑक्टोबर हा जागतिक ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण भागातील महिलांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी केंद्रित आहे.

2022 ची थीम :- "Rural Women Cultivating Good Food for All"

आयुर्वेदासाठी वैज्ञानिक सहयोग

भारत आणि जपानने भारतीय आयुर्वेदासाठी वैज्ञानिक सहयोग विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला

राष्ट्रीय प्रगत औद्योगिक विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (AIST), जपान आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सामंजस्य कराराचा उद्देश शैक्षणिक संस्थांची तांत्रिक क्षमता आणि क्षमता वाढवणे आहे.

प्रमुख मुद्दे :-

पुराव्यावर आधारित शिफारशी तयार करण्याच्या उद्देशाने डिझाइन आणि अंमलबजावणीचा अभ्यास संयुक्त प्रयत्नांचा एक भाग असेल.

आयुर्वेदिक संकल्पना आणि सरावांसह समकालीन औषधांची सांगड हा प्रकल्प अपेक्षित आहे.

यात जपानमधील आयुर्वेद वापरण्यासाठी सुरक्षा आवश्यकता आणि मार्गदर्शक तत्त्वांचे संशोधन करणे देखील आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, शास्त्रज्ञ, संशोधक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची एक प्रकल्प ते प्रकल्प अशी सहयोगी देवाणघेवाण केली जाईल.

चालू घडामोडी

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांची गल्फ ऑईल इंडियाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांची गल्फ ऑईल इंडियाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्याचा पुरुष क्रिकेट खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत कंपनीचा राजदूत म्हणून सहभाग घेतला आहे.

भागीदारीद्वारे, गल्फ ऑइलने भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा गौरव करताना ‘महिला शक्तीचा उत्सव साजरा करणे’ आणि ‘देशातील महिला प्रेक्षकांना प्रेरित करणे’ हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

या असोसिएशनसह, गल्फ ऑइल वंगण क्षेत्रातील पहिली कंपनी बनल्याचा दावा करते ज्याने संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महिला क्रिकेटपटूला राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.

मुलाबाबत चां पक्षपात

भारतातील मुलग्याबाबतचा पक्षपात (son/bias) कमी होतोय.

भारतात मुलग्याबाबतचा पक्षपात (son bias) कमी होत असल्याचे Pew Research Center च्या एका अभ्यासात दिसून आले आहे.

या अभ्यासानुसार जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर वाढले आहे.

2011 मध्ये ते 100 मुलींमागे 111 मुले होते, ते 2019-21 मध्ये 100 मुलींमागे 108 मुले असे झाले आहे.

भारतात गहाळ झालेल्या तान्ह्या मुलींची (baby girls missing) सरासरी वार्षिक संख्या 2010 मधील सुमारे 4.8 लाखांवरून 2019 मध्ये 4.1 लाखांपर्यंत कमी झाली आहे. येथे गहाळ म्हणजे स्त्री- निवडक गर्भपात नसता तर या काळात आणखी किती मुली जन्माला आल्या असत्या ही संख्या होय.

2000-2019 दरम्यान, स्त्री-भ्रूण गर्भपातामुळे नऊ कोटी मुलींचा जन्म गहाळ झाला.

जागतिक आर्थिक मंच

  जागतिक आर्थिक मंचाची स्थापना जानेवारी 1971 मध्ये झाली. सुरुवातीला त्याचे नाव युरोपियन मॅनेजमेंट फोरम असे होते.

संस्थापक :- क्लॉस श्वाब (जर्मन अर्थतज्ञ)
मुख्यालय :- कोलोन, जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

ही खाजगी आणि सार्वजनिक सहकार्यासाठी काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.

1979 मधील एका अहवालात या संघटनेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याविषयी चर्चा झाली. यानंतर 1987 मध्ये त्याचे नामकरण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असे करण्यात आले.

2015 मध्ये, या संस्थेला औपचारिकरित्या आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळाली. सध्या सुमारे 190 देश या संघटनेचे सदस्य आहेत.

जागतिक व्यापार, राजकीय, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणून औदयोगिक दिशा ठरवणे हा फोरमचा एकमेव उद्देश आहे.

चालू घडामोडी


जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स 2022) 121 देशांपैकी भारताचा क्रमांक 107 आहे.

जागतिक भूक निर्देशांकात 121 देशांपैकी भारताचा क्रमांक 107 आहे ज्यात युद्धग्रस्त अफगाणिस्तान वगळता दक्षिण आशियातील सर्व देशांपेक्षा वाईट स्थिती आहे.

भारताचा 29.1 स्कोअर त्याला ‘गंभीर’ श्रेणीत ठेवतो. भारत श्रीलंका (64), नेपाळ (81), बांगलादेश (84) आणि पाकिस्तान (99) च्याही खाली आहे.

अफगाणिस्तान (109) हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे जो निर्देशांकात भारतापेक्षा वाईट कामगिरी करतो.

15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन 2022 साजरा करण्यात आला.

15 ऑक्टोबर हा जागतिक ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण भागातील महिलांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी केंद्रित आहे.

2022 ची थीम :- "Rural Women Cultivating Good Food for All"

चालू घडामोडी


मोहित भाटिया यांची बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मोहित भाटिया यांची बँक ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड (बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड) चे सीईओ म्हणून नियुक्ती सार्वजनिक करण्यात आली आहे.

मोहित भाटिया यांनी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीई आणि एमबीए (गुडगाव) पदवी प्राप्त केली.

मोहित भाटिया यांच्याकडे असलेल्या पूर्वीच्या पदांमध्ये फ्रँकलिन टेम्पलटन AMC मधील किरकोळ सल्लागार सेवा प्रमुख, उत्तर भारतासाठी अॅक्सिस बँकेतील संपत्तीचे क्षेत्रीय प्रमुख, DSP मेरिल लिंच गुंतवणूक व्यवस्थापकांसाठी उत्तर भारताचे प्रमुख, नंतर संपूर्ण भारतासाठी बँकिंग चॅनेलचे प्रमुख या पदांचा समावेश आहे

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ बाह्य अवकाशात चित्रपट करणारा पहिला अभिनेता ठरला

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ, जो त्याच्या प्रकल्पांमध्ये उच्च-ऑक्टेन स्टंट्स काढण्यासाठी प्रसिद्ध आहे, गोष्टींना पुढील स्तरावर नेत आहे आणि लवकरच अंतराळात शूट करणारा पहिला अभिनेता होऊ शकतो.

टॉप गन अभिनेत्याने दिग्दर्शक डग लिमन सोबत एका प्रोजेक्टवर भागीदारी केली आहे ज्यात त्याला स्पेसवॉक करण्यासाठी बोलावले आहे.

हॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शकाने टॉमला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत स्वतःला लाँच करण्याच्या प्रस्तावासह युनिव्हर्सल फिल्म्ड एंटरटेनमेंट ग्रुप (UFEG) शी संपर्क साधला आहे.