Friday, 14 October 2022

ब्राह्मणेतरांची पत्रकारिता


दीनबंधू:  पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी कृष्णराव भालेकरांनी सुरु केले.

दीनमित्र :  ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले.

तरुण मराठा:  शाहू महाराजांच्या इच्छेनुसार दिनकरराव जवळकर यांनी  १९२२ मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरु केले. चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे (देशाचे दुश्मन ही पुस्तिका) जवळकरांचे नाव गाजले.

कैवारी  :   फेब्रुवारी १९२८ मध्ये दिनकरराव जवळकर यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जेधे बंधु याच्या प्रेरणेने व सहकार्याने सुरु केले.

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता :

मूकनायक : ३१ जानेवारी १९२०,

बहिष्कृत भारत:  १९२७,

जनता: १९३०

प्रबुद्ध भारत : १९५६.

मराठी वृत्तपत्र


मित्रोदय:  पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. ते १८४४ मध्ये निघाले;

ज्ञानप्रकाश

१२ फेब्रुवारी १८४९ रोजी ज्ञानप्रकाश सुरु झाले  .

कृष्णाजी त्रिंबक रानडे

१९०९ मध्ये ‘भारत सेवक समाजा’ने हे वृत्तपत्र चालविण्यास घेतले.

त्यानंतर नेमस्तांचे मुखपत्र अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली.


ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार हरी नारायण  आपटे यांना मिळाला.

‘सत्य, सौख्य आणि ज्ञान’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते.

महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नामवंत व्यक्ती ज्ञानप्रकाशमधून लेखन करीत.

इंदुप्रकाश

जानेवारी १८६२ पासून इंदुप्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले.

ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता.

इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत.

प्रभाकर

प्रभाकर हे वृत्तपत्र २४ ऑक्टोबर १८४१ रोजी सुरु झाले.

भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते. .

प्रभाकरचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे त्यात प्रसिध्द झालेली शतपत्रे. ही शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी  लिहीत असत.

हे साप्ताहिक १८६५ साली बंद पडले.

प्रभाकरशी स्पर्धा करणाऱ्या वर्तमानदीपिका या वृत्तपत्राला तोंड देण्यासाठी भाऊ महाजन यांनी धूमकेतू (१८५३) नावाचे वृत्तपत्र काढले .

मराठी वृत्तपत्रांचा आढावा


दर्पण

मराठीतील पहिले वृत्तपत्र

दि. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरु केले.

दर्पण प्रारंभी पाक्षिक होते. ४ मे १८३२ पासून ते साप्ताहिक झाले.

या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत मजकूर छापला जात असे.

जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात भाऊ महाजन (ऊर्फ गोविंद विठ्ठल कुंटे) यांचे सहकार्य लाभत असे.

बेअदबी प्रकरणाची झळ लागून दर्पण बंद पडले (१८४०). ते बंद पडल्यावर त्याच्या चालकांनी युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिक सुरु केले.

दिग्दर्शन

जांभेकरांनी  १८४० च्या मे महिन्यात दिग्दर्शन हे मराठी नियतकालिक सुरु केले.

ते साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांना वाहिलेले भारदस्त मासिक होते.

ज्ञानोदय :  जून १८४२ मध्ये अहमदनगर येथे ख्रिस्ति मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे मासिक सुरु केले. १८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते.

भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे


भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला.
१८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.
भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

मिरात-उल्-अखबार

राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले.

लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले.

संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्‌सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.

दिग्दर्शन: श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

समाचार दर्पण:  २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

सोमप्रकाश: पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

तत्त्वबोधिनी पत्रिका: देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

सुलभ समाचार : केशवचंद्र सेन (१८७८).

अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले.

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास:

भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत.

भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले. ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली. तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.
मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.

मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते.

1857 च्या उठावाची कारणे

- सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
- 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिध्द आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग असल्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. यामागे असणारी कारणे जाणून घेऊयात...

राजकीय कारणे:

- इ.स.1600 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
- इ.स.1757 च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
- इ.स.1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

- तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला.
- वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
- लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.

आर्थिक कारणे:

- ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
- 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
- शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

लष्करी कारणे :

- शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते. पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला.

- शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.

- ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले.

- इ.स.1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.

धार्मिक कारणे:

- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने धार्मिक साम्राज्यवादाचा पुरस्कार केला.

- इ.स.1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
- अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.

- कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.

युरोपीयांचे भारतात आगमन


ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली.

सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने इ.स. १६०९ साली कंपनीस कायमची सनद बहाल केली.

भारतात प्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज व शेवटी फ्रेंच या क्रमाने युरोपियन सत्ता आल्या.

अल्बकुर्क हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो. १५१० मध्ये त्याने विजापूरच्या अदिलशाहकडून गोवा प्रांत जिंकून घेतला.

पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय- डी अल्मेडा, दुसरा व्हाइसरॉय- अल्फान्सो डी अल्बकुर्क.

भारतात सर्वात जास्त म्हणजे ४५० वर्षे राहिलेली युरोपियन सत्ता म्हणजे पोर्तुगीज सत्ता होय.

डी अल्मेडा (१५०४ ते १५०९) – भारतातील पोर्तुगीजांचा प्रथम व्हाइसरॉय. याने पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्तारासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसीचा स्वीकार केला. भारतात साम्राज्य विस्तारासाठी, भूप्रदेशावर ताबा घेण्यासाठी सागरावरील प्रमुख केंद्रे ताब्यात घेतली.

अल्बकुर्क (१५०९ ते १५१५) – भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा व्हाइसरॉय. अल्बकुर्कला भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. डॉड वेल नामक इतिहासकाराने अल्बकुर्कची तुलना लॉर्ड क्लाइव्हशी केली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे



‘गुरु नानक’ हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.
गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.

1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.
1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला ‘शिवशाही काठी’ असे म्हटले जात असे.
शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये ‘होन’ हे सोन्याचे तर ‘शिवराई’ हे तांब्याचे नाणे होते.
दक्षिण भारतामध्ये ‘नायनार आणि अलवार’ या भक्ती चळवळी उदयास आल्या.
महाकवी सूरदास यांनी ‘सुरसागर’ हे काव्य लिहिले.
शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्‍या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली.

23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे


महाराष्ट्रातील नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.
‘सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची रानी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.

चालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर ‘दंतीदुर्ग’ याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.
राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले .
शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.
शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.
चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.

यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.
अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.
बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले –
वर्हाडी – इमादशाही
अहमदनगर – निजामशाही
बिदर – बरीदशाही
गोवलकोंडा – कुतुबशाही
विजापूर – आदिलशाही
विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली.

संस्था आणि संस्थापक



१८२८:- राजाराम मोहन राय – ब्राह्मो समाज
१८६५:- देवेंद्र नाथ टागोर – आदी ब्राह्मो समाज
१८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
१८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर – पार्थना समाज
१८७२ :- आनंद मोहन बोस – सार्वजनिक समाज
१८७३ :- महात्मा फुले – सत्यशोधक समाज
१८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज
१८८० :- केशव चंद्र सेन – नावविधान समाज
१८८९ :- पंडिता रमाबाई – आर्य महिला समाज
१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज
१९११ :- शाहू महाराज – सत्यशोधक समाज कोल्हापूर
१९१८ :- शाहू महाराज – आर्य समाज शाखा कोल्हापूर
१९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे – तरुण ब्राह्मो समाज
१९५५ :- पंजाबराव देशमुख – भारत कृषक समाज.

सोसायटी

१७८४ :- विलियम जोन्स – बंगाल अशियाटिक सोसायटी
१७८९ :- विलियम जोन्स – असियटीक सोसायटी
१८२२ :- जगनाथ शंकर सेठ – बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ – ग्रँट मेडिकल कॉलेज
१८५२ :- भाऊ दाजी लाड – ग्रँट मेडिकल सोसायटी
१८६२ :- सर सय्यद अहमद खान – सायंन्तफिक सोसायटी
१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ – मोहमदम लिटररी
१८६४ :- सर सय्यद अहमद खान – ट्र्न्स्लशन सोसायटी
१८६५ :- दादाभाई नवरोजी – लंडन इडीयन सोसायटी
१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा – थेओसोफिकल सोसायटी
१९०१ :- शाहू महाराज – मराठा एजुकेशन सोसायटी
१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
१९०६ :- शाहू महाराज – किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर – पीपल्स एजुकेशन सोसायटी.

वृत्तपत्र : संस्थापक

  

प्रभाकर   :   भाऊ महाजन

ज्ञानदर्शन  :  भाऊ महाजन

हिंदू         :   बी राघवाचार्य

दिनबंधु    : कृष्णराव भालेकर

तेज         : दिनकरराव जवळकर

निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर

ज्ञानसिंधु   : विरेश्वर छत्रे

दिनमित्र    : मुकुंदराव पाटील

इंडिया      : दादाभाई नौरोजी

प्रताप        :    गणेश शंकर विद्यार्थी

इंदूप्रकाश   : विष्णुशास्त्री पंडित

बंगाली      :  एस एन बॅनर्जी

सुधारक     : गो ग आगरकर.

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ 

 

 ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली.

  लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान  होता.
त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला.

   इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ असे म्हणतात.

  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 

  बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला.  मद्रास व मुंबईचे राज्यपाल  त्यांच्या अमलाखाली आले.

   कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली.

  कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत.

   हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता. परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णत: समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. त्याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.

  अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१द्वारे यात काही सुधारणा करण्यात  आल्या

लक्षात ठेवा

पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.

- अशोक मेहता

ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती.
- बाबूराव काळे

पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला ....
- जून, १९८६

जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला ....
- १९५७

लक्षात ठेवा

                  

बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायतराज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने इ. स. १९६० मध्ये एक समिती नियुक्त केली. तत्कालीन महसूलमंत्री .... हे या समितीचे अध्यक्ष होते.
- वसंतराव नाईक

वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्र शासनास आपला अहवाल सादर केला ....
- १९६१

वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा, १९६१ संमत करण्यात आला .... पासून महाराष्ट्रात पंचायतराज व त्याअंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली.
- १ मे, १९६२

.... घटनादुरुस्ती अधिनियम, १९९२ अन्वये ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिला गेला.
- ७३ वी

राज्यात पंचायतराज पद्धतीचा अवलंब सुरू झाल्यानंतर साधारणत: आठ वर्षांनंतर म्हणजे २ एप्रिल, १९७० रोजी पंचायतराज पद्धतीच्या एकूण कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी .... यांच्या अध्यक्षतेखाली एक पुन र्विलोकन समिती नेमण्यात आली होती.
- ल. ना. बॉगिरवार

हे  लक्षात ठेवा


वंदे भारत एक्स्प्रेस ला ( रेल्वे - 18 ) या नावाने देखील ओळखले जाते 

पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?
उत्तर :- दिल्ली ते वाराणसी 

भारतातील दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?
उत्तर :- दिल्ली ते कटरा 

भारतातील तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावत आहे ?
उत्तर :- मुंबई ते गांधीनगर 

भारतातील चौथी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कुठे धावणार आहे ?
उत्तर :- दिल्ली ते उना

भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यातील आदिवासी भागांच्या संदर्भात विशेष प्रशासकीय तरतुदी आहेत?
उत्तर :- आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम

कर्कवृत्त कोणत्या देशातून जात नाही?
उत्तर :- नेपाळ

अन्न आणि कृषी संघटना (FAO) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर :-  रोम, इटली

ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके कोणाकडे आहेत?
उत्तर :- लारिसा लॅटिनिना

खालीलपैकी कोणता स्त्रोत मौर्य साम्राज्याच्या नगर प्रशासनाची तपशीलवार माहिती देतो?
उत्तर :- मेगास्थनीज इंडिका

मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर :- भारतोलन

भारताच्या 2011 च्या जनगणनेचे बोधवाक्य खालीलपैकी कोणते होते?उत्तर :- आपली जनगणना, आपले भविष्य

भारतातील वनक्षेत्राची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे?
उत्तर :-  24%

__च्या नमुन्यासाठी लीड क्रोमेटची चाचणी घेतली जाते.
उत्तर :- हळद पावडर

भारताच्या राज्यघटनेत ____ मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.
उत्तर :- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

MOP उपलब्धता सुधारण्यासाठी RCF आणि K प्लस S यांनी सामंजस्य करार केला

6 ऑक्टोबर 2022 रोजी, भारताच्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) ने K Plus s Middle East FZE DMCC, K+S Minerals and Agriculture GmbH, जर्मनीची उपकंपनी, शेतकरी समुदायाला पाठिंबा देण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) केला. म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) ची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि विविध प्रकारच्या जटिल खतांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी. उपस्थित मान्यवर:

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री, डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री, भगवंत खुबा यावेळी उपस्थित होते.

अरुण सिंघल, सचिव (खते), SC मुडगेरीकर (CMD RCF) आणि खत विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

मुख्य कल्पना

i. RCF आणि K plus s मधील भागीदारी ठराविक कालावधीत खते आणि कच्च्या मालाची सुरक्षित उपलब्धता प्रदान करते.

ii सामंजस्य करारानुसार, के प्लस 2022 ते 2025 या कालावधीसाठी सवलतीच्या भारत-विशिष्ट किमतीवर दरवर्षी 1,05,000 दशलक्ष टन (MT) MOP पुरवणार आहेत.

iii K plus S RCF ला त्याच्या कॅप्टिव्ह वापरासह MOP पुरवेल तसेच RCF च्या 60% कॅप्टिव्ह वापराच्या त्याच्या व्यापाराच्या उद्देशांसाठी आवश्यक आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) बद्दल

RCF हा भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या मालकीचा भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) - SC मुडगेरीकर मुख्यालय - मुंबई, महाराष्ट्र

स्थापना - 1978

K Plus S मध्य पूर्व FZE DMCC बद्दल:

K Plus S मिडल ईस्ट FZE DMCC ची स्थापना K+S Minerals आणि Agriculture GmbH (कॅसेल, जर्मनी येथे मुख्यालय) साठी विपणन आणि विक्री सेवा प्रदाता म्हणून करण्यात आली आहे.

व्यवस्थापकीय संचालक- हर्वे कॉस्पेन

मुख्यालय- दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE) स्थापना- 2018.