1) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
9.7 टक्के .
2) महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?
मध्ये प्रदेश .
3) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
रत्नागिरी.
4) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?
गोंदिया.
5) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?
रत्नागिरी.
6) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग.
7) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?
नाशिक.
8) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
अंबोली (सिंधुदुर्ग).
9) महाराष्ट्रात वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
ठाणे जिल्ह्यात.
10) विदर्भातील नंदनवन कोणते?
चिखलदरा.
11) संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे?
शेगाव जिल्हा बुलढाणा .
12) महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
नाशिक
13) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
नाशिक.
14) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
सातपुडा.
15) महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
यवतमाळ.
16) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
NH 6 .
17)cस्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
भगुर (नाशिक ).
18) महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
नांदेड.
19) महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?
सोलापूर.
20) छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
कोल्हापूर येथे 1895 ला.
21) महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
अमरावती.
22) पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
जुन्नर.
23) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
भीमा.
24) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
प्रवरानगर(जी अहमदनगर ).
25) महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
गोदावरी.
26) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
गोदावरी.
27) महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
अहमदनगर.
28) संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
अमरावती.
29) यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
प्रीतिसंगम
30) भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले?
कर्नाळा जिल्हा रायगड.
31) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
मोझरी (अमरावती)
32) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
कोयना प्रकल्प.
33) महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
गंगापूर (नाशिक)
34) महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
औरंगाबाद.
35) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
बुलढाणा