Saturday, 6 August 2022

चालू घडामोडीप्रश्नसंच

 1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या अजेंडा आयटम अंतर्गत 'विष्कार, असमानता आणि संघर्ष' या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत  भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

1. डॉ. राजकुमार रंजन सिंग

2.  एस. एन. सुब्रह्मण्यन

3. नरेंद्र मोदी

4. अजीत डोभाल


उत्तर- 1


------------------------------------------------------------


2.पोलंडमधील व्रोकला येथे झालेल्या प्रेसिडेंट कप नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या एअर पिस्तूलमध्ये कोणत्या खेळाडूला रौप्य पदक मिळाले आहे?

1. अभिषेक वर्मा

2. सौरभ चौधरी

3. ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर

4. यापैकी नाही


उत्तर- 2


------------------------------------------------------------


3. कोणत्या राज्यातील पक्षांनी 14 नोव्हेंबर रोजी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे?

1. राज्यस्थान

2. महाराष्ट्र

3. त्रिपुरा

4. उत्तर प्रदेश


उत्तर- 3


------------------------------------------------------------


4.  पानिपत येथे भारतातील पहिल्या मेगा-स्केल मॅलिक एनहाइड्राइड प्लांटचे उद्घाटन कोणी केले आहे?

1. ओएनजीसी

2. हिंदुस्थान पेट्रोलियम

3. भारत पेट्रोलियम

4. आयओसी


उत्तर- 4


------------------------------------------------------------


5. पेन्शनधारकांसाठी पहिली व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवा कोणत्या भारतीय बँकेने सुरू केली आहे?

1. एसबीआय

2. आयसीआयसीआय

3. एचडीबीआय

4. कॅनरा बँक


उत्तर- 1


------------------------------------------------------------


6. आधुनिक भारत या पुस्तकाचे प्रकाशन कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले?

1. गुजरात

2. आसाम

3. हरियाणा

4. बिहार


उत्तर- 3


------------------------------------------------------------


7.  विश्व टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1. 7 नोव्हेंबर

2. 8 नोव्हेंबर

3. 9 नोव्हेंबर

4. 10 नोव्हेंबर


उत्तर- 3


------------------------------------------------------------


8.  वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण ठरली आहे?

1. विनेश फोगाट

2. अंशु मलिक

3. गीता फोर

4. साक्षी मलिक


उत्तर-2


------------------------------------------------------------


9. संकल्प गुप्ता हे भारताचे कितवे ग्रँडमास्टर बनले आहे?

1.  65

2. 70

3. 71

4. 75


उत्तर- 3


------------------------------------------------------------


10. ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स 2021 नुसार भारत 30 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे?

1. 18

2. 20

3. 22

4. 25


उत्तर- 1

महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

  

🎀 जळगाव - केळी

🎀 जळगाव - जळगाव वांगी

🎀 नागपूर - संत्री

🎀 जालना - मोसंबी

🎀 लासलगाव - कांदा

🎀 महाबळेश्वर - स्ट्राबेरी

🎀 सोलापूर - डाळींब

🎀 वगुर्ला - काजू

🎀 डहाणू - चिकू

🎀 वायगाव - हळद

🎀 नवापूर - तूरडाळ

🎀 मराठवाडा - केशर आंबा

🎀 मगळवेढा - ज्वारी

🎀 कोरेगाव - घेवडा

🎀 नाशिक - द्राक्षे

🎀 बीड - सीताफळ

🎀 भिवापूर - मिरची

🎀 कोल्हापूर - गुळ

🎀 आजरा - घनसाळी तांदूळ

🎀 सांगली - हळद

🎀 सांगली - बेदाणे

🎀 परंदर - अंजीर

🎀 सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम

🎀 रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,        

🎀 रायगड -  हापुस आंबा


भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग


🏔 गजरात.................. सापुतारा


🏔प.बंगाल...............दार्जिलिंग


🏔 राजस्थान............... माउंट अबू


🏔 पचमढी................. मध्यप्रदेश


🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला


🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी


🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली


🏔 उत्तराखंड............... अल्मोढा


🏔 उत्तराखंड............... मसुरी


🏔 करळ..................... मन्नार


🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर


🏔 महाराष्ट्र.................. माथेरान


🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा


🏔 तामिळनाडू............. उटी


🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल


🏔 तामिळनाडू............. कुन्नुर


🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान)



◼️ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

 - पांढ-या पेशी


◼️ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

 - मुत्रपिंडाचे आजार


◼️ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

- मांडीचे हाड


◼️ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

 - कान


◼️ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

 - सुर्यप्रकाश


◼️ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

 - टंगस्टन


◼️ सर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

 - 8 मिनिटे 20 सेकंद


◼️ गरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

 - न्यूटन


◼️ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

 - सूर्य 


◼️ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

 - नायट्रोजन


महत्त्वाचे क्रांती ➖ उत्पादन



🌱 हरित क्रांती           ➖   अन्नधान्य उत्पादनात वाढ.


🥛 धवल / श्वेत क्रांती  ➖   दग्ध उत्पादनात वाढ.


🐬 निल / निळी क्रांती ➖   मत्स्य उत्पादनात वाढ.


🦐 गलाबी क्रांती         ➖   झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.


🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖  अडी उत्पादनात वाढ.


🥜 पीत क्रांती             ➖   तलबिया उत्पादनात वाढ.


🍂 करडी क्रांती          ➖   खत उत्पादनात वाढ.


🌊 अमृत क्रांती          ➖   नदी जोड प्रकल्प.


🥔 गोल क्रांती            ➖   बटाटा उत्पादनात वाढ.


🎋 सोनेरी क्रांती         ➖   ताग उत्पादनात वाढ.


🚢 कष्ण क्रांती           ➖   खनिज तेल उत्पादनात वाढ.


🐐 लाल क्रांती            ➖  मढीपालन/ टोमॅटो उत्पादनात 


💻 ई क्रांती                ➖  माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.


🥦 चदेरी तंतू क्रांती     ➖  कापूस उत्पादनात वाढ


महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


जायकवाडी         नाथसागर

 

पानशेत              तानाजी सागर


भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  


गोसिखुर्द           इंदिरा सागर 


वरसगाव               वीर बाजी पासलकर


तोतलाडोह            मेघदूत जलाशय


भाटघर                  येसाजी कंक


मुळा                      ज्ञानेश्वर सागर 


माजरा                   निजाम सागर


कोयना                   शिवाजी सागर


राधानगरी                लक्ष्मी सागर


तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ


तापी प्रकल्प            मुक्ताई सागर


माणिक डोह            शहाजी सागर


चांदोली                   वसंत सागर


उजनी                     यशवंत सागर


दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर


विष्णुपुरी             शंकर सागर


वैतरणा                 मोडक सागर



Pre Exam कशी पास व्हावी ?


खूप जणांना पडलेला हा प्रश्न!


मी माझ्या अनुभवावरून काही मुद्दे मांडत आहे

१. प्रिलिम चा कट ऑफ किती लागतो आणि येणाऱ्या attempt ला किती लागेल एक अंदाज लक्षात घ्यावा


२.आपल्याला पास व्हायला किती मार्क हवेत , तो आकडा म्हणजे आपले ध्येय होय.


३. त्या धेयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला गरज असते योग्य मार्गदर्शनाची, अचूक दिशेने प्रयत्नची, योग्य स्टडी मटेरियल ची.


४. स्टडी मटरियल निवड खूप महत्त्वाची असते. त्यासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. शक्यतो जे टॉपर आलेत त्यांना फॉलो केले तरी चालेल.


५. एकदाका पुस्तकांची यादी ठरवली की जोपर्यंत परीक्षा होऊन जात नाही,  आपण पास होत नाही तोपर्यंत पुस्तके बदलायची नाहीत.


६. त्या पुस्तकाच्या उणीवा चुका भरून काढण्यासाठी टीपणी वही घालावी. त्यात एक्स्ट्रा मुद्दे लिहून काढावे. आणि पुस्तका बरोबर ते पण पुन्हा पुन्हा वाचावे.

एवढ्यासाठी पुस्तक च बदलणे तोट्याचे ठरेल. सारखी पुस्तके बदलली की आपले वाचन परिपूर्ण होत नाही. त्या विषयाचे सखोल ज्ञान मिळत नाही. पुस्तकाच्या खोलीचा अंदाज यायला वेळ लागतो. एक च पुस्तक सारखे सारखे वाचल्याने विषयाचे परिपूर्ण आणि सखोल ज्ञान मिळते आणि खूप चांगले आकलन होते. प्रश्न लवकर कमी वेळेत सुटतात


७. नियमित प्रश्नांचा सराव करावा . 

८. आयोगाचे पेपर वारंवार चाळावे. 

९. टेस्ट सिरीज शक्यतो आयोगाच्या वेळेच्या ५-१० मीन आधी संपेल अशा दृष्टीने सराव करावा.


१०. कमी मटेरियल आणि खूप वेळा रिविजन केल्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना विचार करायला लावणारा वेळ वाचतो आणि आपण आपण वेळेत पेपर सोडवून चांगले मार्क मिळवू शकतो.

११. १००० kicks are not important but one kick that practiced १००० times is more powerful.


Sunil jadhav sir(Officer Katta)

राज्य लोकसेवा आयोग MPSC कडून राज्यसेवा, गट ब, गट क, तसेच तांत्रिक सेवा परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा :-


(१) स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.


(२) राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता 'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.


(३) स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरीता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. 


(४) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा / हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल / येतील व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.


(५) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषि सेवा मुख्य परीक्षा इत्यादी) निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल. 


(६) सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा' (Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच, सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.


(७) महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.


(८) महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या/वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा' तसेच 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा' या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येतील.


 (९) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा' तसेच 'महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा' या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील.


(१०) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा करीता 'मराठी व इंग्रजी' तसेच 'सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी' अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. 


(११) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरीता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम घेण्यात येईल.


(१२) मुख्य परीक्षेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) घेण्यात येईल व त्याच्या आधारे संबंधित संवर्गाकरीता निवडप्रक्रिया राबविण्यात येईल.


(१३) पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरीता शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल...


(१४) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही. 

समाजसुधारक या टॉपिक वर कसे प्रश्न विचारले जातात



⛳️  समाजसुधारक यांचे

पूर्णनाव, जन्मठिकाण, शिक्षण- नोकरी, सामाजिक कार्य,  संस्था-संघटना, उद्देश, वर्तमानपत्र, पुरस्कार, त्यांचे सहकारी, त्यांच्याबद्दल असलेली मते, त्यांचे विचार  यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.


1) महात्मा फुले


2) महर्षी धोंडो केशव कर्वे 

         

3) डॉ बाबासाहेब आंबेडकर  

 

4) राजा राममोहन रॉय 

      

5) म.गो.रानडे   

               

6) रमाबाई रानडे   

            

7) पंडिता रमाबाई.

            

8) राजर्षी शाहू महाराज 

    

9) गोपाळ हरि देशमुख

       

10) गो.ग.आगरकर 


11) महर्षी वि.रा.शिंदे   

               

12) जगन्नाथ शंकरशेठ 

             

13) गोपाळ कृष्ण गोखले 

  

14) कर्मवीर भाऊराव पाटील


15) बाळशास्त्री जांभेकर


सुजॉय लाल थाओसेन यांच्याकडे ITBP च्या DG चा अतिरिक्त कार्यभार आहे



🔹नवी दिल्लीतील सशस्त्र सीमा बलचे महासंचालक डॉ. सुजॉय लाल थाओसेन यांनी भारत-तिबेट सीमा पोलीस महासंचालक म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली . 


🔸डॉ. थाओसेन हे 1988 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 


🔹डॉ. थाओसेन यांना आयपीएस संजय अरोरा यांच्याकडून प्रभार व पारंपारिक दंडुका स्वीकारण्यात आला . 


🔸1962 मध्ये स्थापन झालेली ITBP भारत-चीन सीमेवर गस्त घालते. याव्यतिरिक्त, छत्तीसगडमधील नक्षलविरोधी कारवायांसारख्या अनेक अंतर्गत सुरक्षा कार्यांसाठी याचा वापर केला जातो.


Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...