Friday, 22 July 2022

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प



❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

 

◆ खोपोली - रायगड              

◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

◆ कोयना - सातारा                

◆ तिल्लारी - कोल्हापूर          

◆ पेंच - नागपूर                      

◆ जायकवाडी - औरंगाबाद


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


❇️ महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-

              

◆ तारापुर - ठाणे                    

◆ जैतापुर - रत्नागिरी              

◆ उमरेड - नागपूर(नियोजित)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


❇️ महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-

                   

◆ जमसांडे - सिंधुदुर्ग             

◆ चाळकेवाडी - सातारा           

◆ ठोसेघर - सातारा               

◆ वनकुसवडे - सातारा           

◆ ब्रह्मनवेल - धुळे                 

◆ शाहजापूर - अहमदनगर

६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार


🎞️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : Soorarai Pottru

👩‍🦰 चित्रपटाच्या दिग्दर्शिका : सुधा कोंगरा


👤 सर्वोत्कृष्ट अभिनेता : सुर्या - अजय देवगण 


🎞️ सर्याला : Soorarai Pottru चित्रपटासाठी

🎞️ अजय देवगणाल : तान्हाजी चित्रपटासाठी

 

👩‍🦰 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अर्पणा बालामुरली 

🎞️ Soorarai Pottru चित्रपटासाठी


👤 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : बिजू मेनन 

👩‍🦰 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : लक्ष्मी प्रिया


⭐️ स. मराठी चित्रपट : गोष्ट एका पैठणीची 

👤 दिग्दर्शक : शंतनु गणेश रोडे


⭐️ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : तुलसीदास ज्युनिअर

👤 दिग्दर्शक : मृदुल तुलसीदास


🔝 चित्रपट अनुकूल राज्य : मध्यप्रदेश

रुपयाची ऐतिहासिक पडझड; डॉलरच्या तुलनेत गाठला ८० चा टप्पा.


🌷भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर्यतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात निचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया ७९.९७ रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात ७९.९८ प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊन ८०.०५ प्रति डॉलर झालं.


🌷रपयाचं मूल्य ८०.०५ पर्यंत खाली आल्यावर ते रुपया ७९.९३/९४ प्रति डॉलर ट्रेंड करत होता. सोमवारी परदेशी चलन बाजारात अमेरिकेन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १६ पैशांनी घसरला आणि ७९.९८ प्रति डॉलरवर बाजार बंद झाला. मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच रुपयाची ऐतिहासिक पडझड होऊन ८०.०५ च्या स्तरावर गेला.


🌷शक्रवारी रुपयाच्या मुल्यात १७ पैशांची वाढ झाली आणि बाजार ७९.८२ प्रति डॉलरवर बंद झाला. त्यामुळे काही दिवस रुपयाचं मूल्य ७९.७९ ते ८०.२० प्रति डॉलर असेल, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

आता गुगल मॅपवरही औरंगाबादच्या जागी दिसणार ‘संभाजी नगर’.✴️


☘️औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या सरकारतर्फे यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले.


☘️गल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा विषय खूपच चर्चेत आहे. नामांतराचा मुद्दा तापलेला असतानाच एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. गुगल मॅप्सवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजी नगर’ करण्यात आले आहे. इतकेच नाही तर गुगलवरही औरंगाबादचे नाव बदलण्यात आले आहे. आता गुगलवर औरंगाबाद शहर असं टाइप केल्यानंतर तिथे औरंगाबादच्या जागी संभाजीनगर असं लिहून येत आहे.


☘️औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली असली तरीही एमआयएमने या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता गुगल मॅपवर संभाजीनगर असा उल्लेख आल्याने पुन्हा वादाला तोंड फुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...