Wednesday, 15 June 2022

अंकगणित सराव 20 प्रश्न उत्तरे , अवश्य सोडवा

1. मुद्दल = 5000 रु, मुदत = 4 वर्षे, व्याज = 1600 रु तर सरळव्याजाचा दर किती?

 6

 7

 9

 8

उत्तर : 8



 2. 7 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल?

 VI

 VII

 XII

 IIV

उत्तर :VII



 3. 720 चा शेकडा 25 किती?

 360

 180

 144

 270

उत्तर :180



 4. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

 45,54,63,72,?

 42

 21

 81

 18

उत्तर :81



 5. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

 29,58,87,?

 116

 96

 100

 106

उत्तर :116



 6. प्रश्नचिन्हाच्या जागीकाय येईल?

 10:50::8:?

 30

 40

 50

 60

उत्तर :40



 7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 पुरुष:स्त्री::मोर:?

 मोरीण

 लांडोर

 लांडोरिन

 पिसारा

उत्तर :लांडोर



 8. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 6:36::?:49

 40

 6

 35

 7

उत्तर :7



 9. घड्याळाच्या दोन काटयांत साडेबारा वाजता किती अंशाचा कोन असेल?

 105°

 165°

 180°

 195°

उत्तर :165°



 10. ‘साखरभात’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही?

 साभार

 भारत

 सारखा

 साखर

उत्तर :सारखा



 11. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात?

 पाणी

 हवा

 आकाश

 माती

उत्तर :माती



 12. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

पेन्सिल, पेन, खडू, —–?

 पाटी

 खोडरबर

 बोरू

 पट्टी

उत्तर :बोरू



 13. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

6/30,3/15,7/35,—–?

 2/10

 11/33

 8/24

 10/20

उत्तर :2/10



 14. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

4,9,16,—-

 138

 32

 164

 25

उत्तर :25



 15. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 45

 32

 47

 41

उत्तर :32



 16. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 32

 18

 43

 48

उत्तर :43



17. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 25

 12

 9

 64

उत्तर :12



 18. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

90:92::98:?

 982

 96

 89

 100

उत्तर :100



 19. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 13:26::15:?

 20

 30

 31

 40

उत्तर :30



 20. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

40:10::60:?

 20

 15

 12

 30

उत्तर : 15

मौलाना अबुल कलाम आझाद

🟢 मौलाना अबुल कलाम आझाद 🟢

◾️जन्म: 11नोव्हेंबर 1888
मक्का, ऑट्टोमन साम्राज्य (आताचे सौदी अरेबिया)

◾️मृत्यू: 22 फेब्रुवारी 1958, दिल्ली

◾️लोकजागृतीसाठी 1912 साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले.

◾️1915 साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले.

◾️अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत

◾️1923 च्या दिल्ली येथील कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले

◾️आझाद 1949 ते 46 पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते

◾️1942 ची क्रिप्स योजना, 1945 ची वेव्हेलची सिमला परिषद व 1946 मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला

◾️केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले

◾️त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (1959) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे.

भारतीय राज्यघटनेचा सरनामा

भारतीय राज्यघटनेचा सरनामा

आम्ही,भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम,

समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय,

विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,

दर्जाची व संधीची समानता,

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची  प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. 

भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच आपल्या राज्यघटनेचा सरनामा किंवा प्रस्तावना (Preamble) देण्यात आलेली आहे.१३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या उद्देश पत्राच्या आधारावर आणि अमेरिकन राज्यघटनेच्या धर्तीवर भारतीय राज्यघटनेत  ‘राज्यघटनेचा सरनामा’ सामील करण्यात आलेला आहे. ही केवळ भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना नसून, भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान, मुल्ये,आदर्श व्यक्त करणारी उद्देशिका आहे आणि या सरनाम्याचे भारतीय राज्यघटनेत अनन्यसाधारण महत्व आहे.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये घटनेच्या प्राधिकाराचा स्त्रोत; भारतीय राज्याचे स्वरूप आणि आदर्श; राज्यघटनेचे उद्देश व आकांक्षा आणि घटनेची स्वीकृती तारीख- या चार घटकांचा समावेश होतो. या प्रस्तावनेमध्ये मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचे चित्र प्रदर्शन होते.    सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य,न्याय, स्वातंत्र्य,समानता,बंधुता,एकता आणि एकात्मता हे प्रस्ताविकेतील तत्त्वज्ञान संपूर्ण राज्यघटनेची दिशा निर्धारित करतात. यांतील प्रत्येक शब्द हा लाखमोलाचा असून त्याचे विस्तृत विवेचन आपणास राज्यघटनेच्या विविध कलमांमधून पहावयास मिळते.

भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. ‘सार्वभौम’ म्हणजे आपणावर कोणत्याही बाह्य शक्तींचा निर्णयप्रक्रियेत प्रभाव नसणे. भारत हे सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे आता आपल्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही आणि आपला अंतर्गत आणि बाह्य कारभार आपण आपल्या पद्धतीने करण्यास मुक्त व सक्षम आहोत. ‘समाजवादी’ हा शब्द आपणास केवळ घटनेच्या सरनाम्यात आढळतो आणि राज्यघटनेत तो शब्द इतरत्र कुठेही नमूद करण्यात आलेला नाही. लोकशाही समाजवादाच्या माध्यमातून विषमता दूर करून ‘कल्याणकारी राज्य’ स्थापन करण्याची अपेक्षा घटनाकर्त्यांना अपेक्षित आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाचा अर्थ म्हणजे भारत देशाला स्वतःचा असा कुठलाही धर्म नाही, परंतु सर्वधर्मसमभाव हे तत्त्व आपल्या देशात अवलंबिले जाईल. ‘लोकशाही’म्हणजे लोकांनी,लोकांसाठी,लोकांमार्फत राबविलेली शासनव्यवस्था होय.

‘गणराज्य’ या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्या देशात सर्वोच्च असे राष्ट्रप्रमुखाचे पद हे वंशपरंपरेने अथवा राजेशाही पद्धतीने नेमले जात नसून भारताचे राष्ट्रपती हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतीनिधीमार्फत अप्रत्यक्षपणे निवडणूक पद्धतीने निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय अशा पद्धतीने अपेक्षित आहे.

कुठल्याही पद्धतीच्या जात,वर्ण,वंश,लिंग यांसारख्या आधारावर भेदभाव न करता ‘सामाजिक न्याय’ प्रस्थापित करता येईल आणि  उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करून ‘आर्थिक न्याय’ प्रस्थापित होऊ शकेल. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क,सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती,राजकीय संधींची समानता यांचा समावेश होतो. ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ व्यक्तींच्या कृतीवर बंधन नसणे आणि त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी संपूर्ण संधी देणे, असा होय.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्व भारतीयांसाठी
विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. या विविध स्वातंत्र्यांची अमलबजावणी राज्यघटनेत मुलभूत हक्कांच्या स्वरुपात उपलब्ध आहे.

‘समानते’च्या तत्वानुसार सर्व भारतीय नागरिकांना नागरी,राजकीय आणि आर्थिक समानतेची हमी देण्यात आलेली आहे. ‘बंधुभावा’च्या तत्वानुसार धार्मिक,भाषिक,प्रांतिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य असेल. ‘एकता व एकात्मता’ ह्या संकल्पना  राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक एकसंधता व मानसिक बाजू प्रदर्शित करतात. एकात्मतेच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणासोबत जोडलेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या मूळ सरनाम्यामध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी,धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता- या तीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे भारतीय राज्यघटनेमध्ये  अनन्यसाधारण असे महत्व आहे. खऱ्या अर्थाने, ती भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे भरतीय संविधानाचा आरसा आहे, जो भारतीय राज्यघटनेला खरेखुरे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबीत करतो.संविधान सभेचे सदस्य पंडित ठाकूर दास भार्गव यांच्या मते – ‘ सरनामा हा आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे.तो घटनेचा आत्मा आहे. ती घटनेची चावी आहे.

’ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार  सुरुवातीला सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा हिस्सा आहे की नाही, यांविषयी वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यामध्ये १९६० मध्ये सरनामा हा घटनेचा भाग नसल्याचा निवाडा दिला होता, परंतु १९७३ मधील केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि सरनामा हा संविधानाचा भाग असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही प्रस्ताविका अत्यंत महत्वाचा भाग असून घटनेचा अर्थ या सरनाम्यातील उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भातच लावण्याचे मत प्रदर्शित करण्यात आले.

थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले.

राज्य व समुद्रकिनारा

✔️गुजरात:-1700 किमी

✔️आंध्रप्रदेश:-1011 किमी

✔️तामिळनाडू:-907 किमी

✔️महाराष्ट्र:-720 किमी

✔️केरळ:-560 किमी

✔️ओरिसा:-457 किमी

✔️प.बंगाल:-374 किमी

✔️कर्नाटक:-258 किमी

✔️गोवा:-113 किमी

❇️केंद्रशासित प्रदेश:-

▪️अंदमान निकोबार:-1285 किमी

▪️लक्षद्वीप:-132 किमी

✍मुख्यभूमी किनारा:-6100

✍एकूण किनारा:-7517

✍एकूण 9 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेश यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे.

✍एकूण 73 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे.

मराठी :- सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी

दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.

सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ +अ = आ    

१. सूर्य + अस्त = सूर्यास्त

२. कट + अक्ष = कटाक्ष

३. रूप + अंतर = रुपांतर

४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न

५. स + अभिनय = साभिनय

६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

७. सह + अध्यायी = सहाध्यायी

८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ

९. सह + अनुभूती = सहानुभूती

१०. मंद + अंध = मंदांध

११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार

🟤 अ + आ = आ 🟤

१. देव + आलय = देवालय

२. हिम + आलय = हिमालय

३. फल + आहार = फलाहार

४. अनाथ + आश्रम = अनाथाश्रम

५. गोल + आकार = गोलाकार

६. मंत्र + आलय = मंत्रालय

७. शिशिर + आगमन = शिशिरागमन

८. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

९. धन + आदेश = धनादेश

१०. जन + आदेश = जनादेश

११. दुख: + आर्त = दुखार्त

१२. नील + आकाश = नीलाकाश

१३. कार्य + आरंभ = कार्यारंभ

🟤 आ +आ = आ 🟤

१. महिला + आश्रम = महिलाश्रम 

२. राजा + आश्रय = राजाश्रय

३. कला + आनंद = कलानंद

४. विद्या + आलय = विद्यालय

५. राजा + आज्ञा = राजाज्ञा

६. चिंता + आतुर = चिंतातुर

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

३. अभि + इष्ट = अभीष्ट

🟤 इ+ ई = ई 🟤

१. गिरि + ईश = गिरीश

२. कवि + ईश्वर = कवीश्वर

३. परि + ईक्षा = परीक्षा

🟤 ई+ इ = ई 🟤

१. गोमती + इच्छा = गोमतीच्छा

२. रवी + इंद्र = रवींद्र

३. मही+  इंद्र = महिंद्र

🟤 ई+ ई = ई 🟤

१. मही + ईश = महीश

२. पार्वती + ईश = पार्वती

🟤 उ +उ = ऊ 🟤

१. गुरु + उपदेश = गुरुपदेश

२. भानु + उदय = भानुदय

🟤 ऊ +उ = ऊ 🟤

१. भू + उद्धार = भूद्धार

२. वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष

३. लघू + उत्तरी = लघूत्तरी

ऋ+ ऋ = ऋ

१. मातृ + ऋण = मातृण

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

   1) रांगणारे मूल    2) पिकलेला आंबा    3) पेणचे गणपती    4) वरचा मजला

उत्तर :- 3

2) पुढीलपैकी ‘ला’ आख्यात ओळखा.
   1) बसला    2) बसू      3) बसतो      4) बसावा

उत्तर :- 1

3) ‘तुला जसे वाटेल तसे वाग’ – या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक ................. आहे.
   1) क्रियाविशेषण वाक्य      2) विशेषण वाक्य
   3) प्रधानवाक्य        4) नामवाक्य

उत्तर :- 1

4) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

   अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडू नयेत नाही.   
   ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत.

   1) अ बरोबर    2) ब बरोबर    3) अ आणि ब बरोबर  4) अ आणि ब चूक

उत्तर :- 4

5) गुरुजी म्हणाले, की ‘प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे’ या वाक्यातील गौणवाक्य कोणते ?

   1) गुरुजी म्हणाले      2) प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे
   3) प्रत्येकाने नियमितपणे      4) नियमितपणे शाळेत यावे

उत्तर :- 2

6) अयोग्य जोडी निवडा.

   अ) विरोधीदर्शक    -  उंहू
   ब) शोकदर्शक    -  अगाई
   क) मौनदर्शक    -  गुपचित

   1) अ      2) ब      3) क      4) यापैकी नाही

उत्तर :- 4

7) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) रीती भूतकाळ  2) रीती वर्तमानकाळ  3) पूर्ण वर्तमानकाळ  4) साधा वर्तमानकाळ

उत्तर :- 1

8) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

   1) कविता    2) कवयित्री    3) कवित्री    4) कवियित्री

उत्तर :- 2

9) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते.

   अ) कागद    ब) आज्ञा     क) उंदीर      ड) विद्या

   1) ब, क, ड    2) अ, ब, क, ड    3) अ, क, ड    4) अ, ब, ड

उत्तर :- 2

10) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) मुला    2) मुलां      3) मुलींना    4) मुलाला

उत्तर :- 2

स्पर्धात्मक चालू घडामोडी



१) "ईमान्यूअल मक्रोन" यांची कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?

✅️ - फ्रांस


२) "वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडीचर रिपोर्ट २०२१ नुसार भारत सैन्य खर्चामध्ये कितव्या क्रमांकावर आहे?

✅️- ३


३) २४ वे "उन्हाळी बधीर ऑलम्पिक" कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

✅️ - ब्राझील


४) चर्चेत असलेले "उर्जा प्रवाह" जहाज भारताच्या कोणत्या दलाचे आहे?

✅️INDIAN COAST GUARD


५) संरक्षण मंत्रालयाने कोठे "डेफ कनेक्ट २.०" चे अयोजन केले आहे?

✅️- दिल्ली


६) कोणत्या राज्य सरकारने "स्पेसटेक फ्रेमवर्क कार्यक्रम सुरु केला आहे?

✅️ तलंगना


७) कोणत्या देशाने "ट्रायलटरल कोर्पोरेशन फंड" सुरु केले आहे?

✅️- भारत


८) सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने किती युटूब चनेल वर "सुरक्षेच्या कारणाने" बंदीघातली आहे?

✅️ १६


९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे देशातील पहिले "सामुदायिकरेडीओ स्टेशन" "दुध वाणी" चेउद्घाटन केले आहे?

✅️- गुजरात


१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितव्या "रायसीनाडायलोग" चे उद्घाटन केले आहे?

✅️- ७ व्या


१) पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे?

- नरेंद्र मोदी


२) "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे?

- विनोद राय


३) अलीकडेच कोणत्या दक्षिण आशियाई देशाने स्वतःला “डीफालटर" घोषित केले आहे?

- श्रीलंका


४) नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यां “१०६४ भष्टाचार विरोधी app" सुरु केले आहे ?

- उतराखंड


५) अलीकडेच कोणत्या राज्याच्या "कांगडी चाय" ला GI tag भेटला आहे ?

- हिमाचल प्रदेश


६) भारत आणि कोणत्या देशात “२ + २ डायलोग" आयोजित केला आहे?

- अमेरिका


७) सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे?

- गुजरात


८) दरवर्षी "मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस " केव्हा साजरा करण्यात येतो?

- १२ एप्रिल

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...