०१ जून २०२२

राज्यसेवा पूर्व परीक्षा : 2022 .


◆ CSAT Qualified झाल्यामुळे आता GS ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. परंतु ज्यांचे CSAT अगोदरच व्यवस्थित नव्हते त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नका.

◆  काही विद्यार्थ्यांच्या मते मागील काही परीक्षेत चालू घडामोडी ची काठिण्य पातळी वाढली आहे. तर माझ्या मते विद्यार्थी जे चालू घडामोडी साठी पुस्तक/मासिक वाचत असतात आणि त्यातून जर परीक्षेत प्रश्न नाही आले तर ते थेट प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली असं म्हणतात. कारण त्या Q चा Source त्यांच्या जवळ नसतो. आणि मुख्यतः आपण विद्यार्थी मासिक/ News Paper खूप वाचतो परंतु आपल्याला जे गरजेचे आहे ते आपण करत नाहीत म्हणजे आपण कधी MCQ ची प्रॅक्टिसचं करत नाहीत. त्यामुळे तो विषय आपल्याला अवघड किंवा त्या विषयाची काठिण्य पातळी वाढली असे वाटते.

◆ आता आपण सर्व विद्यार्थीच आहोत , चालू घडामोडी चे प्रश्न वयक्तिक मला तरी कधी अवघड गेले नाहीत . 15 ते 16 प्रश्नांपैकी हमखास मला मागील परीक्षेत 12 ते 13 मार्क मिळत आले आहेत .माझा  इथे सांगण्याचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपण चालू घडामोडी कडे खूप दुर्लक्ष करत असतो. परीक्षा जवळ आली की 1 वर्षाचे 12 मासिक एकदाच गोळा करतोत आणि वाचत बसतोत. ही चुकीची पद्धत आहे.

◆ मागील काही आयोगाचे पेपर बघून आपल्याला असे दिसते की किमान आपण परीक्षेच्या अगोदरचे 2 वर्षाचे तरी चालू घडामोडी चांगले करावे म्हणजे आपल्याला  अपेक्षित मार्क मिळतील....

◆ 21 ऑगस्ट ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किमान आपण जानेवारी 2021 पासून चे चालू घडामोडी चांगले केलेच पाहिजे . [ त्या अगोदरचेही काही केले तर उत्तमच ] .

◆ या वर्षी 🔥GS ला किमान 120 चे टार्गेट 🔥ठवा आणि त्यानुसारच अभ्यास करा. अभ्यास हा व्यवस्थित प्लॅन/Schedule नेच करा , काहीही वाचून मार्क मिळत नाहीत.

💐 सर्वांना शुभेच्छा 💐

मुस्लिम धर्मीयांतील सुधारणा चळवळी

♦️अलीगढ चळवळ :- सर सय्यद अहमद खान .

♦️मोहमेडन लिटररी सोसायटी :- अब्दुल लतिफ.

♦️अहमदिया चळवळ :- मिर्झा गुलाम मुहम्मद.

♦️जामिया मिलिया इस्लामिया :- मुहम्मद अली.

♦️फरियादी चळवळ (1804) :- फरीदपूर (बंगाल) .

♦️वहाबी आंदोलन :- (1820-1820)

♦️तायुणी चळवळ (1839):- ढाका

♦️देवबंद चळवळ (1867) .

♦️टिटू मिर ची चळवळ .

31 मे 2022 चालू घडामोडी..!!


1). द्विपक्षीय नौदल सराव "बोंगोसागर" हा भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो?
उत्तर - बांगलादेश

२). अमर जवान ज्योतीची स्थापना कोणत्या युद्धानंतर झाली?
उत्तर - 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर

३). अलीकडे चर्चेत असलेले "मुंद्रा बंदर" कुठे आहे?
उत्तर - गुजरात

4). यूएन पिस्किपिंग मिशनमध्ये अलीकडे कोणत्या देशात भारतीय सैनिकांवर हल्ले झाले आहेत?
उत्तर - काँगो

५). जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - गुजरात

६). अलीकडेच चर्चेत असलेले कांगेर व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे?
उत्तर - छत्तीसगड

७) नुकतेच अमगढ बिबट्या राखीव कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - राजस्थान

8). नुकताच महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – २८ मे

प्र. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक कोण बनले आहे?
उत्तर – टॅड्रोस एडहेनॉम

प्र. जोस रामोस होर्टा हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?
उत्तर – पूर्वी तिमोर / पुर्वी तिमोर

प्र. जागतिक थायरॉईड दिवस २०२२ कधी साजरा केला जातो?
उत्तर – २५ मे / २५ मे

प्र. शिरूई लिली फेस्टिव्हल 2022 ची चौथी आवृत्ती कोणत्या राज्यात सुरू झाली आहे?
उत्तर – मणिपुर / मणिपूर

प्र. प्रतिष्ठित 'ऑनररी चाइल्ड राइट्स हिरो अवॉर्ड 2022' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – अशोक दयाल चंद (भारत) आणि जेम्स कोफी अन्नान (घाना)

Q. मे 2022 मध्ये, भारतातील 1 दशलक्ष सर्व महिला आशा कार्यकर्त्यांना …… द्वारे सन्मानित करण्यात आले आणि सन्मानित करण्यात आले.
उत्तर - WHO

प्र. दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – ज्ञानेश भारती / गायनेश भारती

Q. क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशात पोहोचले?
उत्तर – पाक / जपान

प्र. जेट एअरवेजचे मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - प्रभा शरण सिंह / प्रभा शरण सिंह

प्र. 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' या अनुवादित हिंदी कादंबरीसाठी कोणत्या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे?
उत्तर – गीतांजलि श्री / गीतांजली श्री

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...