Friday, 20 May 2022

स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तके


1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे 

                                २) बाळासाहेब शिंदे


2) इंग्रजी व्याकरण-  १) बाळासाहेब शिंदे

                               २) एम जे शेख


3) अंकगणित -      १) नितीन महाले

                             २)पंढरीनाथ राणे

                            ३) सचिन ढवळे 

                             

5) इतिहास -            १) ग्रोव्हर, बेल्हेकर

                              २) रंजन कोळंबे


6) भूगोल -               १)ए. बी. सवदी

                               २) खतीब


7) अर्थशास्त्र -       १) रंजन कोळंबे

                             २)किरण देसले 


8) राज्यव्यवस्था  -    १) रंजन कोळंबे

                              २) किशोर लवटे


9) सामान्य विज्ञान-   १) सचिन भस्के

                              २) रंजन कोळंबे


10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड  

                              १) एकनाथ पाटील

                              २) प्रकाश गायकवाड



वरील पुस्तकांपैकी प्रत्येक विषयाचे किमान एक तरी पुस्तक आपल्या कडे असावे.


    तर लागा तयारीला... All The Best


नक्की वाचवा असा लेख ..



👉 तम्ही Mpsc चा अभ्यास खूप दिवसापासून करत असाल आणि तरीही तुमच्या कडे Syllabus ची Print नसेल तर समजून घ्या की तुम्ही Timepass करत आहात..


(ज्यांच्या कडे नसेल त्यांनी उद्या 10 परेंत राज्य सेवा Mainच्या syllabus ची प्रिंट काढून घ्या)


👉 राज्य सेवा देणार असाल तर लेख लिहायला सुरू करा ...स्वतःचे मत मांडायला शिका..Sunday la एक तरी Essay लिहीत चला..


मुलींसाठी महत्वाचे ...

अग तो ओळखीचा नाही त्याला का बोलते..

बाई सगळी मुलं सारखीच असतात ..त्यांच्या पासून दूर असलेलेच बरं...

तिथ चहा नको घ्यायला...तिथे खूप मुलं असतात...ETC ETC😜😜


तत्सम वाक्य बोलणे सोडून द्या..

जेव्हा तुम्ही अधिकारी बनाल तेव्हा दिवसात 1000 लोकांना तोंड द्यावे लागते..

त्या मुळे तुमच्यातील अधिकाऱ्याला आत्ता पासून Developing mode वर ठेवा..


👉 मला खूप वेळा एकच प्रश्न विचारला जातो की 

अभ्यासाची Basic सुरवात कशी करावी..?

Ans is here in 3 Steps👇


1 Syllabus ( पाठ होत नाही तो परेंत वाचा तरच पुढे जे वाचलं त्याला अर्थ राहील)


2 क्रमिक पुस्तक + NCERT (GEO HIS Sci and Eco)

( क्रमिक पुस्तक वाचा विकत घेऊन तेव्हाच जास्त समजेल त्या वर बाजारात आलेले पुस्तक घेऊ नका )


3 Reference Book + Current जे की खूप प्रमाणात उपलब्द आहेत...त्याची लिस्ट Telegram वर सर्व चॅनेल वर आहे.


(आपण फक्त Book list गोळा करत बसलो आहोत पुस्तक मात्र घेत नाही )


👉हल्ली रोज एक नवीन MPSC चा लेखक जन्माला येत आहे नवीन पुस्तक घेऊन..

त्या मुळे जे उत्तम लेखक आहेत त्यांचे पुस्तक वाचा उगाच पैसे आणि वेळ वाया घालवू नका.


👉 Below 25 age चे आहेत त्यांच्या साठी महत्वाचे...


हो अर्थातच मी GF/BF बद्दल बोलत आहे.😂😂


Gf BF नावाचा प्राणी तुमच्या LIFE मध्ये असेल तर तुमची already वाट लागली आहे असे इतर म्हणतात...😂😂


मला तुम्हला जरा वेगळ सांगायचे आहे की 


भांडण, Doubt आणि Restrictions मध्ये तुमचे नाते असेल तर समजून घ्या की MPSC मध्ये तुमच काय खर नाही..

कोणाचा call होता ..? दे मग Screenshot हे वाक्य तुमच्या Relationship मध्ये असेल तर तुमचं अवघड आहे 😂😂😂


(Hello I m not Interrupt in ur personal life ..It's just affecting to MPSC study so just telling u.🙃)


👉 जया दिवशी तुमचा छान स्टडी होतो ना तेव्हा तुम्ही By Soul happy असतात...


शब्द खूप टोचणारे आहेत पण मला स्पस्ट बोलायची सवय आहे...


घराबाहेर राहून अभ्यास करता ना तुम्ही..

मग महिन्याला 6000 खर्च तर होतच असतील 


म्हणजे तुमच्या घरचे तुम्हला 200 रुपय रोजाणे बाहेर ठेवत आहेत...


बस त्या एक दिवसाची 200 रुपय किंमत आहे ना तिच्या इतका अभ्यास करा...🙏🙏


ज्या दिवशी तुमचा 6 तास अभ्यास होणार नाही त्या दिवशी तुम्हला जेवण करण्याचा अजिबात अधिकार नाही ...नाही म्हणजे नाही🙏🙏🙏



फुकटचे सल्ले नाहीत हो ...खूप हृदयापासून लिहले आहे तुमच्यासाठी


वाचून विचार करा 

Online Test Series

जागतिक भूगोल विशेष


1. जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर


2. महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)


3. सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.


4. सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.


5. सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया


6. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)


7. सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)


8. सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.


9. सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.


10. सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे


11. सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)


12. सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची


13. सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.


14. सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)


15. सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.


16. सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.


17. सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.


18. सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.


19. सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)


20. सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)


21. सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.


22. सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.


23. सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)


24. सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.


25. सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.


26. सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)


27. सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी


28. सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)


29. सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)


30. सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.


31. सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)


32. सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)


33. सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.


34. सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क


35. सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)


36. सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.


37. सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.


38. सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.


39. सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.


40. सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.


41. सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)


42. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)


43. सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)


44. सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.


45. सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.


46. सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे


47. सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी


48. सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर


49. सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी


50. सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन


51. सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक


52. सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क


53. सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन


54. सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.


55. सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)


56. सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)


57. सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)


58. सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी.


59. सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी.


60. सर्वात मोठा ग्रह - गुरु


दारिद्र्य

 दारिद्र्य पाहता येते मात्र  दारिद्र्याची व्याख्या करता येत नाही.  गरिबीची व्याख्या ही तत्कालीन परिस्थिती व देशाचा विकास यावर आधारित प्रत्येक देशानुसार किंवा अर्थ व्यवस्थेनुसार वेगवेगळी असू शकते. म्हणून भारतातील दारिद्र्य  आणि दारिद्र्य विषयक समित्या यामध्ये विविधता आढळून येते. या सर्व समितीचा अभ्यास आपण पाहणार आहोत.


दारिद्र्य संकल्पना सविस्तर पाहणार आहोत. मानवी जीवनाच्या गरजा न भागवता येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य असे म्हणता येईल. 


मानवी गरजा या सतत वाढणाऱ्या व अमर्यादित असतात. मात्र काही गरजा या मानवी जीवनासाठी आवश्यक ठरतात. त्या मूलभूत गरजा शिवाय मानवी जीवन अशक्य ठरते. अशा मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते.  अशा मानवी मूलभूत व अत्यावश्यक गरजा भागवणे देखील या लोक समूहाला अशक्य ठरते. अशा लोकांना आपण दारिद्र्य या संकल्पने अंतर्गत घेऊ शकतो.दारिद्र्याची संकल्पना सापेक्ष व निरपेक्ष अशा पद्धतीने मांडता येते –

1)  सापेक्ष दारिद्र्य –   देशातील उच्चतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्याची संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात.


2) निरपेक्ष दारिद्र्य –  दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला दारिद्र्या खालील जनता असे समजले जाते. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्यरेषा असे म्हणतात.


दारिद्र्य रेषा –    

दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्यरेषा(Poverty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो. दारिद्र्य रेषा उपभोग खर्चाच्या आधारावरती ठरवली जाते. दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्ती मागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यूनस्तर निश्चित केला जातो. त्याला मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च (Monthly Per Capita Consumption Expenditure) म्हणून संबोधले जाते.

                या खर्चापेक्षा कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हटले जाते. तर त्या पेक्षा अधिक खर्च करणाऱ्या व्यक्तीला किंवा कुटुंबांना दारिद्र्यरेषेवरील म्हणून संबोधले जाते.               


मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च ठरवण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या घरगुती उपभोग सर्वेक्षण आकडेवारी चा वापर केला जातो. एन. एस. एस. ओ. मात्र अशी आकडेवारी काढण्यासाठी रिकॉल पिरीयड चा वापर करते. 1. यूआरपी  2. एमआरपी आणि

3. एम एम आर पी.


युनिफॉर्म रिकॉल पिरीयड (Uniform Recall Period: URP) – सर्व उपभोग्य वस्तूंचा काहीच दिवसांच्या कालावधीतील रिकॉल रेफरन्स या ठिकाणी घेतला जातो.


मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Mixed Recall Period: MRP) – पाच प्रकारच्या अधून-मधून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी एका वर्षाच्या कालावधीतील रिकॉल लक्षात घेतला जातो.


मॉडिफाइड मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Modified Mixed Recall Period: MMRP) – यामध्ये सात दिवसाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू , 30 दिवसांच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू आणि एका वर्षाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू अशा सर्व वस्तूंचा विचार या प्रकारात केला जातो.


दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील प्रक्रिया आवश्यक ठरते


1) अत्यावश्यक वस्तू सेवांचा एक गट  निश्चित करणे.

2) अशा वस्तू व सेवांच्या उपभोगासाठी एक महिन्यासाठी आवश्यक असलेला एमपीसीइ(Monthly Per Capita Consumption Expenditure) निश्चित करणे. 

3) MPCE म्हणजे दारीद्र्य रेषा होय. अशा तीन दारिद्र्य रेषा केल्या जातात. अखिल भारतीय दारिद्र्य रेषा, राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य  रेषा आणि राष्ट्रीय शहरी दारिद्र्य  रेषा यावरून दारिद्र्याचे प्रमाण ठरवले जाते.

4) राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासून राज्यासाठी ग्रामीण व शहरी असा विभक्त दारिद्र्य रेषा प्रमाण ठरवणे.

दारिद्र्य समित्या

भारतातील दारिद्र्याच्या संदर्भात विविध समित्यांनी आपले विविध पद्धतींनी आणि आपल्या विविध प्रकारे त्यांनी दारिद्र्याचे मोजमाप केले आहे.  याचा आढावा आपल्याला पुढील प्रकारे घेता येईल.


1)   पी. डी. ओझा समिती – 

                    या समितीने 2250 कॅलरी प्रतिदिन प्रतिव्यक्ती हा निकष वापरून दारिद्र्याचे प्रमाण मोजले. 1960 – 61 मध्ये ग्रामीण भागात दहा ते अकरा रुपये व शहरी भागात 15 ते 18 रुपये मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवून दारिद्र्याचे प्रमाण मोजले आणि ते ग्रामीण भागात 51.6 टक्के तर शहरी भागात 7.6 टक्के आढळले. एकूण दारिद्र हे 44 टक्के होते.


2) अलघ समिती –

                          सर्वप्रथम नियोजन आयोगाने जुलै 1977 मध्ये वाय के अलघ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यांनी आपला अहवाल 1979 मध्ये सादर केला. या कृती दलाने दारिद्र्य टोपली ही संकल्पना सुचवली. या टोपलीत अन्नघटक बसवला. किमान दोन वेळचे अन्न मिळवू न शकणारा म्हणजे ही टोपली भरू न शकणारा गरीब समजावा. 

                            ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागातील व्यक्तींसाठी 2100 कॅलरी देईल इतके अन्न या समितीने गृहीत धरले. 2400 कॅलरी रोज मिळवण्यासाठी 1.64 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे महिन्याला 49.09 रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च करू शकणार गट म्हणजे दारिद्र्यरेषेवरील आणि हा खर्च करू न शकणारे घटक म्हणजे दारिद्र्यरेषेखालील असे या समितीने सुचवले.


3) डी टी लकडावाला समिती –

                                      1990 मध्ये डी टी लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेली. यांनी 1993 मध्ये आपला अहवाल मांडला. या अहवालाचा स्वीकार भारत सरकारने 1997 पासून केला. या समितीने प्रत्येक राज्यासाठी शहरी व ग्रामीण दारिद्र्य रेषा निश्चित केली. लाकडावाला समितीने एम पी सी इ ने मोजमाप यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरीयड चा वापर करून केला होता.


4) सुरेश तेंडुलकर समिती –

                            दारिद्र्य मोजणीची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी नियोजन आयोगाने 2009 मध्ये सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना केली.या समितीने दारिद्र्याची रेषा मोजण्यासाठी कॅलरी या निकषाचा वापर बंद करण्याची शिफारस केली. कारण समितीच्या मते कॅलरी, उपभोग व पोषण यांच्यामध्ये कमी परस्परसंबंध आहे.                       


या गटाने एम आर पी उपभोगा वर आधारित दारिद्र्य रेषा चा वापर केला. तेंडुलकर समितीने ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा मांडण्याच्या प्रकाराचा त्याग केला व एकच राष्ट्रीय दारिद्र्यरेषा मांडली. या गटाने 2009 – 10 साठी दारिद्र्य रेषा दारिद्र्याच्या प्रमाणाचे मोजमाप केले. तेंडुलकर गटाने 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 466.68 रुपये तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली.


                           याच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.5 टक्के तर शहरी भागात 25.7 टक्के इतके असल्याचे निश्चित केले.

              तेंडुलकर समितीने 2009 – 10 साठी ग्रामीण भागासाठी 673 रुपये तर शहरी भागासाठी 860 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली या दारिद्र्यरेषेच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे व्यक्त केले. एकूण दारिद्र्य 29.7 टक्के तर ग्रामीण भागात 33.8 टक्के आणि शहरी भागात 20.9 टक्के इतके दारिद्र्य असल्याचे सांगितले.


5) सी रंगराजन समिती चे मोजमाप –

                                          2012 मध्ये रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गटाची स्थापना केली या गटामध्ये महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता हे अर्थतज्ञ सदस्य होते. रंगराजन समितीने तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून लकडावाला पद्धतीचाच स्वीकार करण्याची शिफारस केली. म्हणजे अन्न व इतर वस्तू व सेवांच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस त्यांनी केली.                                 


रंगराजन समितीने कॅलरी उपभोगाचा निकष ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी प्रति व्यक्ती प्रति दिन इतका तर शहरी भागासाठी 2090 कॅलरी प्रतिव्यक्ती प्रतिदिन इतका गृहीत धरला. रंगराजन समितीच्या मोजमापानुसार 2011 – 12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5 टक्के ग्रामीण भागातील दारिद्रयाचे प्रमाण 30.9 टक्के तर शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण 26.4 टक्के असे व्यक्त केले.


              रंगराजन समितीने गरीब लोकांची सर्वाधिक संख्या असणारी पाच राज्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत –

उत्तर प्रदेश (809 लाख), बिहार (438 लाख), मध्य प्रदेश (328 लाख), पश्चिम बंगाल (275 लाख),महाराष्ट्र (228 लाख)             


दारिद्र्याच्या प्रमाणानुसार सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण असलेली पाच राज्य पुढीलप्रमाणे सांगितली –

छत्तीसगड(48%), मणिपूर (47.7%), ओडिशा (46%), मध्य प्रदेश (44%) आणि झारखंड (42%)

रंगराजन समितीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण 20 टक्के होते.

राज्यसेवा प्रश्नसंच

 🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे

१.  दादाभाई नवरोजी

२.  मॉरीस डी मॉरीस

३. जेके मेहता

४.  वरीलपैकी एकही नाही✅✅

(स्पष्टीकरण:-

जनक मेहबूब उल हक)


🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते?

१.  सापेक्ष दारिद्र्य✅✅

३. निरपेक्ष दारिद्र्य

२. नागरी दारिद्र्य

४.  शहरी दारिद्र्य


🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही

१.  कॉलरा

२. विषम ज्वर

३. खरुज

४. इसब

५. वरीलपैकी एकही नाही✅✅




🔰 चारकोल म्हणजे काय ?

१. लोणारी कोळसा ✅✅

२. दगडी कोळसा

३. कच्चा कोळसा

४. खाणीतील कोळसा


🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते?

1.  १७००✅✅

2 १८००

३. १५००

4. १२००


🔰 पलागा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?

१. क

२. ई

३. ड

४. वरीलपैकी एकही नाही✅✅

(स्पष्टीकरण:-

पेला ग्ररोग्य  ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)

सारख्या नावाचे तालुके

🔴 सारख्या नावाचे तालुके 🔴

❇️तालुका व जिल्हा❇️

🔳आष्टी:-बीड-वर्धा

🔳शिरूर:-बीड-पुणे

🔳कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद

🔳खेड:-पुणे-रत्नागिरी

🔳कर्जत:-नगर-रायगड

🔳मालेगाव:-वाशीम-नाशिक

🔳कारंजा:-वाशीम-वर्धा

🔳सेलू:-वर्धा-परभणी

🔳नांदगाव:-नाशिक-अमरावती.

नेशनल पार्क ~राज्यवार

🎓  नेशनल पार्क ~राज्यवार 🎓

🌴राजस्थान
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

🌴मध्य प्रदेश
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

🌴अरुणाचल प्रदेश
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

🌴हरियाणा
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

🌴उत्तर प्रदेश
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

🌴झारखंड
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

🌴मणिपुर
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

🌴सिक्किम
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

🌴तरिपुरा
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

🌴तमिलनाडु
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

🌴ओडिसा
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

🌴मिजोरम
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

🌴जम्मू-कश्मीर
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

🌴पश्चिम बंगाल
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

🌴असम
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

🌴आध्र प्रदेश
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूगवामी नेशनल पार्क
4. श्री वेंकटेश्वरम राष्ट्रीय पार्क
5. कावला राष्ट्रीय पार्क
6. नागार्जुन सागर राष्ट्रीय पार्क
7. नेलापत्तु पक्षी राष्ट्रीय पार्क

🌴महाराष्ट्र
1. बोरीवली ( संजय गांधी ) राष्ट्रीय पार्क
2. चांदोली राष्ट्रीय पार्क
3. तबोड़ा राष्ट्रीय पार्क
4. गुग्गामल राष्ट्रीय पार्क
5. नवागांव राष्ट्रीय पार्क
6. तन्सा नेशनल पार्क, थाणे
7. मेलघाट राष्ट्रिय अभ्यारण्य

🌴अण्डमान-निकोबार
1. सैडिल पीक राष्ट्रीय उद्यान
2. महात्मा गाँधी मैरीन ( वंदूर ) राष्ट्रीय उद्यान
3. फोसिल राष्ट्रीय पार्क
4. कैंपबैल नेशनल पार्क
5. गलेथा राष्ट्रीय पार्क
6. माऊंट हैरिट नेशनल पार्क
7. रानी झांसी मैरीन राष्ट्रीय पार्क

🌴हिमाचल प्रदेश
1. पिन वैली पार्क
2. ग्रेट हिमालय राष्ट्रीय पार्क
3. रोहल्ला राष्ट्रीय पार्क
4. किरगंगा राष्ट्रीय पार्क
5. सीमलबरा राष्ट्रीय पार्क
6. इन्द्रकिला नेशनल पार्क
7. शिकरी देवी अभ्यारण्य

🌴गजरात
1. गिर राष्ट्रीय पार्क
2. मरीन राष्ट्रीय पार्क
3. ब्लेक बुक राष्ट्रीय पार्क
4. गल्फ आफ कच्छ
5. वंसदा नेशनल पार्क

🌴उत्तराखण्ड
1. जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क
2. वैली आफ फ्लावर राष्ट्रीय पार्क
3. नन्दा देवी राष्ट्रीय पार्क
4. राजाजी नेशनल पार्क
5. गोविन्द पासू विहार नेशनल पार्क
6. गंगोत्री राष्ट्रीय पार्क

🌴छत्तीसगढ
1. कांगेर घाटी ( कांगेर वैली ) राष्ट्रीय पार्क
2. इन्द्रावती राष्ट्रीय पार्क
3. गुरू घासीदास ( संजय ) राष्ट्रीय उद्यान

🌴करल
1. साइलेंट वैली राष्ट्रीय पार्क
2. पेरियार नेशनल  पार्क
3. मैथीकेतन नेशनल पार्क
4. अन्नामुदाई नेशनल पार्क
5. एर्नाकुलम नेशनल पार्क

🌴कर्नाटक
1. बांदीपुर राष्ट्रीय पार्क
2. नागरहोल ( राजीव गांधी ) राष्ट्रीय उद्यान
3. अंसी राष्ट्रीय पार्क
4. बनेरघाटला नेशनल पार्क
5. कुडूरमुख नेशनल पार्क
6. तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क

🌴 पंजाब
1. हरिकै वैटलैण्ड नेशनल पार्क

🌴 तेलंगाना
1. महावीर हरीना वनस्थली नेशनल पार्क
2. किन्नरसानी अभ्यारण्य

🌴 गोआ
1. सलीम अली बर्ड सैंचुरी
2. नेत्रावली वन्यजीव पार्क
3. चौरा राष्ट्रीय पार्क
4. भगवान महावीर नेशनल पार्क

🌴 बिहार
1. वाल्मिकी नेशनल पार्क
2. विक्रमसिला गंगटिक डॉल्फिन सैंचुरी
3. कंवर लेक बर्ड सैंचुरी

🌴 नागालैण्ड
1. इंटांग्की अभ्यारण्य, कोहीमा

🌴 मेघालय
1. बलफकरम नेशनल पार्क
2. सीजू अभ्यारण्य
3. नांगखिलेम अभ्यारण्य
4. नोकरे.

हे लक्षात ठेवा :- गांधी शांतता पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते (१९९५ ते २०२०)

♻️ हे लक्षात ठेवा :- गांधी शांतता पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते (१९९५ ते २०२०)

🏆 १९९५ : जुलियस न्यरेरे (टांझानिया)

🏆 १९९६ : एक टी अरियरत्ने (श्रीलंका)

🏆 १९९७ : गेरहार्ड फिशर (जर्मनी)

🏆 १९९८ : रामकृष्ण मिशन (भारत)

🏆 १९९९ : बाबा आमटे (भारत)

🏆 २००० : नेल्सन मंडेला (द.आफ्रीका)

🏆 २००० : ग्रामीण बॅंक (बांग्लादेश)

🏆 २००१ : जॉन ह्यूम (ब्रिटन)

🏆 २००२ : भारतीय विद्या भवन

🏆 २००३ : व्हॅकलाव हवेल (झेक)

🏆 २००४ : कोरेटा स्कॉट (अमेरिका)

🏆 २००५ : डेसमंड तुतु (द‌.आफ्रीका)

🏆 २०१३ : सी पी भट (भारत)

🏆 २०१४ : इस्रो (भारत)

🏆 २०१५ : विवेकानंद केंद्र (भारत)

🏆 २०१६ : अक्षय पात्र फाऊंडेशन

🏆 २०१६ : सुलभ इंटरनॅशनल

🏆 २०१७ : एकल अभियान ट्रस्ट

🏆 २०१८ : सासाकावा (जपान)

🏆 २०१९ : काबूस बिन सैद अल सैद (ओमान)

🏆 २०२० : शेख मुजिबूर रहमान (बांग्लादेश) .

जागतिक स्तरावरील महत्वाच्या व्यक्ती

जागतिक स्तरावरील महत्वाच्या व्यक्ती

👤 जो बायडन
✅ अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष

👩‍🦰 कमला हॅरीस
✅ अमेरिकेच्या ४९व्या उपराष्ट्राध्यक्षा

👤 डेव्हिड मालपास (अमेरिका)
✅ जागतिक बॅंकेचे १३वे अध्यक्ष

👩‍🦰 क्रिस्टलिना जॉर्जिवा (बल्गेरिया)
✅ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख

👤 टेड्रोस अ‍ॅधॅनॉम (इथिओपिया)
✅ जागतिक आरोग्य संघटनेने ८वे प्रमुख

👤 अँटोनियो गुटेरेस (पोर्तुगाल)
✅ संयुक्त राष्ट्राचे ९वे सरचिटणीस

👩‍🦰 एनगोझी ओकोन्जो (नायजेरिया)
✅ जागतिक व्यापार संघटनेच्या ७व्या प्रमुख

👩‍🦰 ऑड्रे अझोले (फ्रान्स)
✅ युनेस्कोच्या ११व्या महासंचालिका

👩‍🦰 गीता गोपीनाथ (भारतीय वंशाच्या)
✅ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ

👩‍🦰 सना मरीन (३५) (फिनलॅंड)
✅ जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...