Tuesday, 17 May 2022

Science


1. Work = force × distance
कार्य = बल × दूरी

2. Energy = force × distance
ऊर्जा = बल × दूरी

3. Speed = distance / time
गति = दूरी / समय

4. Velocity= displacement / time
वेग = विस्थापन / समय

5. Electric field = electrical force/charge
विद्युत क्षेत्र= वैद्युत बल/आवेश

6. Force = force/area
प्रतिबल=बल/क्षेत्रफल

7. Volume = length × width × height
आयतन = लंबाई × चौड़ाई × ऊंचाई

8. Mass density = mass/volume
द्रव्यमान घनत्व =द्रव्यमान/आयतन

9. Acceleration =velocity / time
त्वरण = वेग / समय

10. Power = work / time
शक्ति = कार्य / समय

11. Pressure = force / area
दाब =बल/क्षेत्रफल

11. Momentum = mass × velocity
संवेग = द्रव्यमान × वेग

13. Area (A) = Length × Width
क्षेत्रफल ( A ) = लम्बाई × चौड़ाई

14. Force (F) = Mass × Acceleration
बल ( F ) = द्रव्यमान × त्वरण

15. Pressure Energy = Pressure × Volume
दाब ऊर्जा = दाब × आयतन

16. Impulse = force × time
आवेग = बल × समय

17. Linear momentum = mass × velocity
रैखिक संवेग = द्रव्यमान × वेग

18. Kinetic energy = 1/2 mv²
गतिज ऊर्जा = 1/2 mv²

19. Mechanical energy = kinetic energy + potential energy
यांत्रिक ऊर्जा = गतिज ऊर्जा + स्थितिज ऊर्जा

20. Angular momentum = Inertial × Angular velocity
कोणीय संवेग = जड़त्वाघूर्ण × कोणीय वेग

लोकमान्य टिळक


टिऴकांना तुरुंगवास : - 1 

◾️1880/81 मध्ये कोल्हापूर संस्थानातील तत्कालीन परिस्थितीवर ‘केसरी’ व ‘मराठा’मध्ये काही लेख लिहिले होते.

◾️ते चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे लोकमान्य टिळक व आगरकर (अनुक्रमे ‘केसरी’ व ‘मराठा’चे संपादक) यांना 17 जुलै 1882 ला 101 दिवसांची साधी कैद झाली होती..

◾️ त्यावर आगरकरांनी लिहिलेले ’डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

  टिळकांना तुरुंगवास:- 2  

◾️1897 मध्ये प्लेगच्या साथीच्या वेळी सरकारने केलेल्या दडपशाहीच्या विरोधात पुण्यात चाफेकर बंधूंनी रँड या जुलमी अधिकार्‍याची  22 जूनला हत्या केली. .

◾️त्या संदर्भात ‘केसरी’त लोकमान्यांनी लिहिलेल्या दोन लेखांबद्दल ऑगस्ट 1897 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.

◾️या वेळी बॅरिस्टर दावर त्यांचे वकील होते. या खटल्यात त्यांना 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली.

◾️मुंबईत डोंगरी, भायखळा व पुण्यात येरवडा येथे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. .

◾️या शिक्षेत सरकारने 6 महिन्यांची सूट दिल्यामुळे 7 सप्टेंबर 1898 ला त्यांची सुटका झाली.

 टिळकांना तुरुंगवास:- 3 

◾️इंग्रज सरकारच्या दडपशाहीला जोर आला होता. त्याविरुद्ध टिळक ‘केसरी’त सातत्याने लिहीत होते.

◾️ एप्रिल 1908 मधे बंगालमधील बाँबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर टिळकांनी लिहिलेल्या (देशाचे दुर्देव) दोन अग्रलेखांच्या मुद्द्यांवरून जून 1908 मध्ये त्यांना अटक झाली व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.

◾️ काळाची चक्रे कशी फिरतात पाहा. 1897 मध्ये त्यांची बाजू लढवणारे बॅ. दावर आता न्यायमूर्ती झाले होते व त्यांच्यापुढे हा खटला चालणार होता.

◾️ यावेळी बॅ. जीना त्यांचे वकील होते.

◾️22 जुलैला खटल्याचा निकाल लागला. त्यांना दोषी ठरवण्यात येऊन 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

🔲 इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले 🔲

1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध उदगार

🟢 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध उदगार 🟢

◾️स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.

◾️जो धर्म माणुसकीने वागवत नाही त्याला धर्म कसे म्हणावे.

◾️साम्राज्यशाही पेक्षा ब्राम्हन्य हजारपट वाईट.

◾️समाजाच्या उन्नती ची गुरुकिल्ली म्हणजे राजकीय शक्ती होय.

◾️जर माझ्या मनात द्वेष असता, सुडा ची भावना असती तर 5 वर्षेच्या आता मी या देशाचे वाटोळे केले असते.

◾️गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप बंड करून उठेल.

◾️माझ्या पुस्तकाला बेलिफाने हात लावला तर त्याला गोळ्या घालीन.

◾️शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

प्रश्न१) चटरगाला बोगदा _ या ठिकाणांना जोडतो.
(A) कठुआ आणि दोडा✅
(B) जम्मू आणि बारामुल्ला
(C) राजौरी आणि कुपवाडा
(D) कठुआ आणि उधमपूर

प्रश्न२) जानेवारी 2021 मध्ये चर्चेत आलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?
(A) इन्फ्लूएंझा टाइप-बी विषाणू
(B) व्हॅरिसेला-झोस्टर विषाणू
(C) इन्फ्लूएंझा टाइप-ए विषाणू✅
(D) एचएसव्ही-2

प्रश्न३) __ या ठिकाणांना जोडणारी जगातली पहिली डबल स्टॅक लाँग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत झाली.
(A) कोटा आणि अंबाला
(B) अजमेर आणि फरीदाबाद
(C) जोधपूर आणि गुडगाव
(D) अटेली आणि किशनगड✅

प्रश्न४) 'नवी दिल्ली स्कूल बॅग’ धोरणानुसार, स्कूल बॅगचे वजन किती असावे?
(A) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे
(B) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे✅
(C) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 18 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे
(D) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 16 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे

प्रश्न५) कोणत्या संस्थेनी ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट’ अहवाल प्रसिद्ध केला?
(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(B) जागतिक व्यापार संघटना
(C) जागतिक बँक✅
(D) युनेस्को

प्रश्न६) कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तींचे AI-आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले?
(A) हार्वर्ड विद्यापीठ
(B) कॅंब्रिज विद्यापीठ
(C) स्टॅनफोर्ड विद्यापीठ
(D) ऑक्सफोर्ड विद्यापीठ✅

प्रश्न७) कोणत्या देशासोबत भारताने "विशिष्ट कौशल्य कामगार" संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला?
(A) जपान✅
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया

प्रश्न८) कोणती बँक RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळविणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरली?
(A) राजकोट सहकारी बँक मर्यादित
(B) शिवालिक मर्केंटाईल सहकारी बँक✅
(C) राजानगर सहकारी बँक मर्यादित, बेंगळुरू
(D) पालमूर सहकारी अर्बन बँक मर्यादित

प्रश्न९) कोणत्या देशासोबत भारताने मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली?
(A) रशिया
(B) जर्मनी
(C) जपान
(D) इस्त्रायल✅

प्रश्न१०) कोणती व्यक्ती ‘अयोध्या’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
(A) माधव भंडारी✅
(B) देवेंद्र फडणवीस
(C) उद्धव ठाकरे
(D) भागवत सिंह कोश्यारी

व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 /व्हॉइसरॉय:-लॉर्ड लिटन

🟢व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878🟢

◾️व्हॉइसरॉय:-लॉर्ड लिटन

◾️शीर्षक:-पौव्रात्य भाषांमधील प्रकाशनाच्या अधिक चांगल्या नियंत्रण साठी कायदा

♦️अटी

◾️जिल्हा मॅजिस्ट्रेट ला प्रिंटर व प्रकाशक सोबत बातम्या बाबत करार करता येत असत.

◾️मॅजिस्ट्रेट ला जामीन मागण्याची संमती देण्यात आली.

◾️जामीन जप्त करण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट ला दिला गेला.

◾️गुन्हा दुसऱ्यांदा केला तर छापखाना साहित्य जप्त केले जाईल.

◾️मॅजिस्ट्रेट च्या कृती विरुद्ध कोणत्याही न्यायालयात अपील करता येणार नाही.

◾️देशी वृत्तपत्र यांनी मजकूर प्रूफ सादर केली तर कायद्यातून सुटका मिळेल

◾️अशी बंधने इंग्रजी वृत्तपत्र ला टाकण्यात आली नाही.

भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी

भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी

1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते

2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास

3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ

4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस

5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस

6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ

7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस

8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये

9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास

10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस

11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस

12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस

13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास

14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास

15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास

16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस

17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास

18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ

19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात

20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस.

21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)

22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस.

भारतीय नोटावरील प्रतिमा

🔴भारतीय नोटावरील प्रतिमा🔴

🔳10 ₹:-कोणार्क सूर्य मंदिर

🔳20 ₹:-वेरूळ लेण्या

🔳50 ₹:-हंपी रथ

🔳100 ₹:-राणी ची विहीर

🔳200 ₹:-सांची स्तूप

🔳500 ₹:-लाल किल्ला

🔳2000 ₹:-मंगळयान.

भारतीय संसद विषयी माहिती

भारतीय संसद विषयी माहिती


कलम(७९): नुसार भारतासाठी एक संसद असेल.संसदेचे राष्ट्रपती (कलम ५२) ,राज्यसभा कलम (कलम ८०) व लोकसभा (कलम ८१) यांचा समावेश होतो.

राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य असा घटक आहे,मात्र तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो.


कलम (९९) : संसदेच्या प्रत्येक नवनियुक्त सदस्याचा राष्ट्रपतींकडून पदग्रहणाची शपथ दिली जाते.

संसदेची दोन सभागृह असतात.

राज्यसभा : संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह
लोकसभा : संसदेचे कनिष्ठ अथवा प्रथम सभागृह
घटनाकारांनी राज्यसभेला स्वयंसिद्ध दर्जा बहाल केला आहे.

संसदेचे (कायदेमंडळाचे) अधिकार : कायदेमंडळाचे प्रमुख अधिकार पुढीलप्रमाणे


१) कायदे करणे २)कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवणे.

पुढील प्रकारे संसद कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवते.

१) अविश्वास ठराव : विरोधी पक्षांनी सरकार विरुद्ध मांडलेले अविश्वास ठराव मंजूर झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो.

२) मंत्र्यांनी मांडलेले सरकारी विधेयक नामंजुर झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो.

३) कपात सूचना : अर्थमंत्र्यांनी सुचविलेल्या खर्चाच्या प्रस्तावावर विरोधी पक्षांनी सुचविलेला कपात प्रस्ताव मंजूर झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो.

४) प्रश्नोत्तराचा तास : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहात पूरक प्रश्न विचारून सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रभावी उपाय आहे.


शून्य प्रहर (Zero Hour): प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर इतर कामकाज सुरू होण्यापूर्वीचा संसदेतील सामान्यत दुपारी १२ ते १ हा एक तास ‘शून्य प्रहर’ गणला जातो. एक तास आधी सूचना देऊन ‘शून्य प्रहरात सदस्य कोणताही प्रश्न विचारू शकतात.

५) तहकुबी ठराव : संसदेत ऐनवेळी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभापतींच्या संमतीने विरोधी पक्ष पूर्वनियोजित कामकाज तहकूब करण्याचा ठराव करू शकतात.

६) लक्षवेधी सूचना : १९५४ साली सुरुवात. एखादा संसद सदस्य सभागृहाच्या सभापतींच्या (अध्यक्षाच्या) पूर्वसंमती एखाद्या महत्त्वाच्या विषयाकडे संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी नियम १९७ अंतर्गत एका दिवशी जास्तीत जास्त दोन लक्षवेधी सूचना मांडू शकतो. या सूचनेस मंत्री उत्तर देतात.

कलम ९९ : संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यापदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींसमोर पदाची शपथ घ्यावी लागते.

कलम १०१ (१) : कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही.

कलम १०१ (२) : कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसद व घटकराज्यांचे विधिमंडळ या दोन्हींचे सदस्य असणार नाही.

कलम १०१ (४) : संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य परवानगीशिवाय सलग ६० दिवस सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिल्यास, त्याचे सदस्यत्व संपुष्टात येते. मात्र, सभागृहाचे सत्र संपलेले असेल किंवा सभागृह सलग चार दिवसांहून अधिक काळ तहकूब असेल, तो कालावधी फक्त ६० दिवसांमध्ये मोजला जात नाही.

कलम १०२ : लाभाचे पद स्वीकारणारी व्यक्ती, मनोरुग्ण व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती, स्वेच्छेने परकीय नागरिकत्व स्वीकारलेली व्यक्ती संसद सदस्य बनण्यास अपात्र ठरते.
कलम १०९ (१) : धन विधेयक राज्यसभेत मांडले जात नाही. (प्रथम ते लोकसभेत मांडले जाते)


कलम ११० : धन विधेयकाची व्याख्या : धन विधेयकात पुढील बाबींचा समावेश होतो

A) कोणताही कर बसविणे, तो रद्द करणे, माफ करणे, त्यात बदल करणे, विनियमन करणे
B) सरकारने घेतलेले कर्ज किंवा दिलेली हमी, सरकारने स्वीकारलेल्या कोणत्याही वित्तीय बाबींशी संबंधित कायद्याची सुधारणा
C) भारताचा एकत्रित निधी किंवा आकस्मिकता निधी यांचे संरक्षण, या निधींमध्ये पैसे भरणे किंवा त्यांमधून पैसे काढणे:
D) भारताच्या एकत्रित निधीतील पैशांचे नियोजन
E) कोणताही खर्च भारताच्या एकत्रित निधीवर अवलंबून असल्याचे घोषित करणे, अशा खर्चाची मर्यादा वाढविणे.
F) भारताचा एकत्रित निधी किंवा लोकलेखा खात्यांमध्ये पैशाची आवक होणे किंवा या खात्यामधून पैशांची जावक होणे किंवा या पैशाची अभिरक्षा करणे, केंद्र सरकार किंवा राज्यांचे लेखापरीक्षण.
G) A ते F दरम्यान व्यक्त केलेल्या कोणत्याही घटकांशी आनुषंगिक असलेली बाब.वरील तरतूदी ज्या विधेयकात अंतर्भूत आहेत त्यास धनविधेयक म्हणावे.

कलम ११२(३) : केंद्राच्या एकत्रित व संचित निधीतून केले जाणारे खर्च :
१) राष्ट्रपतीच्या वित्तलब्धी व भत्ते

२) राज्यसभेचा सभापती-उपसभापती, लोकसभेचा अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते

३) भारत सरकारचे दायित्व असलेले व्याज, कर्जनिवारण निधीआकार, कर्जाची उभारणी, ऋणसेवा.

४) कोणत्याही न्यायालयाचा किंवा ट्रायब्यूनलचा न्यायनिवाडा, हुकूमनामा यांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक रकमा.

कलम १२० : संसदेत वापरवयाची भाषा : कलम ३४८ मधील तरतूदींच्या अधीन राहून संसदेतील कामकाज हिंदी किंवा इंग्रजी भाषेतूनच चालविण्यात येईल. मात्र; लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचा सभापती यांच्या परवानगीने हिंदी, इंग्रजी भाषा अवगत नसणाऱ्या एखाद्या संसद सदस्यास सभागृहात मातृभाषेतून भाषण करता येईल.


Repo Rate ..म्हणजे नेमके काय ? Reverse repo rate(RRR)?Cash Reserve Ratio(CRR) ?Statutary Liquidity Rate (SLR)?

📚 1) Repo Rate ..म्हणजे नेमके काय?

               ..  त्यामध्ये रेपो रेट एक असा दर असतो ज्यावर बँकांना आरबीआयकडून कर्ज दिला जातो. बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असतात. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होतात. परिणामी सामान्य ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळतो. बँका रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्यानुसार आपल्या ग्राहकांना सुद्धा कर्ज स्वस्त करून देतात. अर्थातच, गृह कर्ज आणि वाहन कर्जासह इतर कर्जांवरील ईएमआय स्वस्त किंवा महाग होऊ शकतो.

📝  2) Reverse repo rate(RRR)...
      ...नावावरूनच रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट एकमेकांच्या विरुद्धार्थी असल्याचे स्पष्ट होते. रिव्हर्स रेपो रेटचा अर्थ विविध बँकांचा आरबीआयमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज होय. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून आरबीआय बाजारपेठातील कॅश लिक्विडी अर्थात कॅशच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते. बाजारात खूप रोख रक्कम असल्यास आरबीआय रिव्हर्स रेपोमध्ये वाढ करत असते. जेणेकरून बँका जास्त व्याज मिळवण्यासाठी आपल्याकडील जास्तीत-जास्त रोख रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करतील.

📝 3 )Cash Reserve Ratio(CRR) ..
         ...देशात लागू असलेल्या बँकिंग नियमांनुसार, प्रत्येक बँकेला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण रकमेपैकी ठराविक रोख रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागते. यालाच Cash Reserve Ratio असे म्हटले जाते. त्यावरूनच ठराविक रक्कम निश्चित केली जात असते.

📝 4)Statutary Liquidity Rate (SLR)
         ...ज्या दरांवर बँका आपली ठराविक रक्कम सरकारकडे ठेवतात त्यालाच एसएलआर असे म्हटले जाते. बाजारात नकद किंवा रोख रक्कम नियंत्रित ठेवण्यासाठी हा आणखी एक उपाय आहे. कमर्शियल बँकांना एक ठराविक रक्कम यामध्ये जमा करावी लागते. त्याचा वापर आपातकालीन व्यवहारांसाठी केला जाऊ शकते.

राज्यपालाल विशेष राज्यपालाल विशेष जबाबदाऱ्या तरतुदी साठी अंतिम निर्णय देवू शकतो

राज्यपालाल विशेष
राज्यपालाल विशेष जबाबदाऱ्या तरतुदी साठी अंतिम निर्णय देवू शकतो

कलम ३७१=महारष्ट्र व गुजरात  विशेष तरतुदी

कलम ३७१(A)=नागालँड विशेष तरतुदी


कलम ३७१ (B)=आसाम विशेष तरतुदी

कलम ३७१(C)=मणिपूर विशेष तरतुदी

कलम ३७१(D)=आंद्राप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी

कलम ३७१(E)=आंद्राप्रदेश ण केंद्रीय विद्यापीठ स्थापनेबाबत

कलम ३७१(F)=सिक्कीम विशेष तरतुदी

कलम ३७१(G)=मिझोरम विशेष तरतुदी

कलम ३७१(H)=अरुणाचलप्रदेश विशेष तरतुदी

कलम ३७१(I)=गोवा विशेष तरतुदी

कलम ३७१(J)=कर्नाटक व हैद्राबाद विशेष तरतुदी

इतरही महत्वपूर्ण कलमे
कलम =१०० सभागृहात मतदान ,जागा रिक्त असताही कार्य करण्याचा अधिकार व गणपूर्ती

कलम =१०८ संयुक्त बैठक

कलम =११० धनविध्येयकाची व्याख्या

कलम =१११ विधायकाला राष्ट्रपतीची समिती

कलम =१२३ संसदेच्या विराम विराम काळात अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपती आहे

कलम =१२९ सर्वोच्चन्यायालय अभिलेख

कलम =१३७ न्यायनिर्णय किवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुर्विलोकन

कलम १४३=सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीस अधिकार

कलम २३३ =जिल्हा न्यायधीसाची नेमणूक

कलम =२३९AA दिल्ली संदर्भातील विशेष तरतुदी

कलम २४३ (A)=ग्रामसभा

भाग XI संघराज्य आणि राज्य संबंध

कलम २६२ =आंतरराज्यीय नदिजल विवाद

कलम २६३ =आंतरराज्यीय परिषद

भाग XII वित्त ,मालमत्ता,

कलम २६५ =कर आकारणी (कायद्याने प्राधिकर दिल्या शिवाय कर न लावणे)

कलम २६६ (१)=संचित निधी

कलम २६६ (२)=सार्वजनिक लेखे

कलम २६७ =आकस्मित निधी

कलम २६९(A)=GST परिषद

कलम २८० =वित्त आयोग

कलम २९२ =भारत सरकारने कर्ज काढणे

कलम २९३ =राज्याने कर्ज काढणे

भाग XIV संघराज्य आणि राज्ये सेवा

कलम ३१२ =अखिल भारतीय लोकसेवा आयोग

कलम ३१५ =संघराज्य आणि राज्यकर्ता लोकसेवा आयोग

भाग XV निवडणुका संबंधी

कलम ३२४=निवडणूक आयोग स्थापन करणे

कलम ३२५ =मतदार यादीत समाविष्ट करणे(कोणत्याही व्यक्तीस धर्म ,वंश ,जात यावरून मतदान यादीत अपात्र असणार नाही 

कलम ३२६ =लोकसभा किवा विधानसभा प्रौढ मतधान

कलम ३२९ =निवडणूक बाबतीत न्यायालयाचे हस्तक्षेप करण्यास मनाई

भाग XVI विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट तरतुदी

कलम ३३० =लोकसभेत SC आणि ST आरक्षण

कलम ३३२ =विधानसभेत SC आणि STआरक्षण संबधित

कलम ३३८ =SC राष्ट्रीय आयोग

कलम ३३८ (A)=ST राष्ट्रीय आयोग

कलम ३४० =मागासवर्गीय आयोग

कलम ३४१ =SC म्हणजे अनुसूचित जाती

कलम ३४२ =ST म्हणजे अनुसूचित जमाती

भाग XVII राजभाषा

कलम ३४३ =संघराज्याची राज्यभाषा

कलम ३४५ =राज्याची राज्यभाषा

कलम ३४८ =सर्वोच्च व उच्च न्यायालयाची आणि कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरायची भाषा

कलम ३५० (A)= प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण

कलम ३५० (B)=भाषिक अल्पसंख्यांक विशेष अधिकार

कलम 351=हिन्दी भाषेच्या विकासासाठी

भाग XVIII आणीबाणी संबधी

कलम ३५२ =राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६ =राष्ट्रपती राजवट आणि राज्यामध्ये कलम ३६५ नुसार राजवट

कलम ३६० =आर्थिक आणीबाणी

भग XIX संकीर्ण

कलम ३६१ =राष्ट्पती ,राज्यपाल व राज्यप्रमुख यांना संरक्षण

कलम ३६१ (A)=प्रेसचे स्वातंत्र्य(संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या कामकाजा संबंधी )

भाग III =मुलभूत हक्क कलम १४ ते ३२

भाग IV =मार्गदर्शक तत्वे कलम ३६ ते ५१

भाग IV A =मुलभूत कर्तव्ये कलम ५१ A

FAQ
भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत

उत्तर = मुलघटनेत ३९५ होती आणि सध्या ४६१ कलमे आहे

ग्रामपंचायतीची सदस्य संख्या

ग्रामपंचायतीची सदस्य संख्या

१) महाराष्ट्रातून लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या ठरली जाते.

२) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.

३) महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ७ ते १७ इतकी आहे.

४) भारतामध्ये ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ५ ते ३१ इतकी आहे

लोकसंख्या           सदस्यसंख्या

६०० ते १५००           ७

१५०१ ते ३०००         ९

३००१ ते ४५००         ११

४५०१ ते ६०००         १३

६००१ ते ७५००          १५

७५०१ ते पुढे               १७

_______________

शेकडेवारी

📚 शेकडेवारी 📚

1) कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

· उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)

· 125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा.

· 500 चे 30% = 150

· 500 चे 10% = 50

· 30% = 10%×3

· = 50×3 = 150

· 500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)

· 500 ची 1% = 5

· :: 500 चे 8% = 40

2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

· उदा. 368 चे 12.5% = ?

· 368×12.5/100

· = 368×1/8= 46

3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

· उदा. 465 चे 20% = 93

· 465×20/100

· = 465×1/5 ने गुणा = 93

4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

· उदा. 232 चे 25% = 58

· 232×25/100

· = 232×1/4= 58

5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

· उदा. 672 चे 37.5% = 252

· 672×37.5/100

· = 672×3/8

· = 252

6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

· उदा. 70 चे 50% = 35

· 70×50/100

· = 70×1/2

· = 35

7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

· उदा. 400 चे 62.5% = 250

· 400×62.5/100

· = 400×5/8

· = 250

8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

· उदा. 188 चे 75% = 141

· 188×3/4

· = 141

9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

· उदा. 888 चे 87.5% = 777

· 888 × 87.5/100

· = 888×7/8

· = 777

10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.

· उदा. 25 चे 25% = 6.25

· 25 × 25/100

· = 625/100

· = 6.25

_________________________

🎯 शेकडेवारी 🎯

1) कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

· उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)

· 125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा.

· 500 चे 30% = 150

· 500 चे 10% = 50

· 30% = 10%×3

· = 50×3 = 150

· 500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)

· 500 ची 1% = 5

· :: 500 चे 8% = 40

2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

· उदा. 368 चे 12.5% = ?

· 368×12.5/100

· = 368×1/8= 46

3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

· उदा. 465 चे 20% = 93

· 465×20/100

· = 465×1/5 ने गुणा = 93

4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

· उदा. 232 चे 25% = 58

· 232×25/100

· = 232×1/4= 58

5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

· उदा. 672 चे 37.5% = 252

· 672×37.5/100

· = 672×3/8

· = 252

6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

· उदा. 70 चे 50% = 35

· 70×50/100

· = 70×1/2

· = 35

7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

· उदा. 400 चे 62.5% = 250

· 400×62.5/100

· = 400×5/8

· = 250

8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

· उदा. 188 चे 75% = 141

· 188×3/4

· = 141

9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

· उदा. 888 चे 87.5% = 777

· 888 × 87.5/100

· = 888×7/8

· = 777

10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.

· उदा. 25 चे 25% = 6.25

· 25 × 25/100

· = 625/100

· = 6.25

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...