Wednesday, 4 May 2022

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान :-


◆ गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण प्रसुतीपूर्व सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली.

◆ रोगनिदान चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, प्रसुतीतज्ञाकडून शारीरिक आणि उदर तपासणी, अति जोखमीच्या गरोदरपणाचे वेळेवर निदान, तत्पर संदर्भसेवा हे या अभियानाचे महत्वाचे घटक आहेत.

◆ दर महिन्याच्या नऊ तारखेला या सेवा आरोग्य सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत दिल्या जातात.

◆ नऊ तारखेला रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामकाजाच्या दिवशी या सेवा पुरविल्या जातात.

◆ नियमित प्रसुतीपूर्व सेवांव्यतिरिक्त या सेवा दिल्या जातात.

समानार्थी शब्द व त्यांचे सविस्तर अर्थ

समानार्थी शब्द व त्यांचे सविस्तर अर्थ

आई – माउली ,जननी , माता , जन्मदाती , माय

अहंकार – घमेंड , गर्व

अपाय – त्रास ,इजा

अचल – स्थिर ,शांत ,पर्वत

अवचित – एकदम

अमृत – पियुष, सुधा, संजीवनी

आख्यायिक – लोककथा ,दंतकथा

अग्नी – आग ,अनल ,पावक

अरण्य – रान ,वन ,कानन ,विपिन ,जंगल

अविरत – सतत ,अखंड

अचपळ – खोडकर ,चंचल

अपराध – गुन्हा

अभिनेता – नट

अत्याचार – अन्याय ,जुलूम

अनाथ – निराधार ,पोरका

ओढाळ – उनाड ,भटका

अंतरीक्ष – अवकाश

आनंद – हर्ष ,मोद ,तोष ,संतोष ,आमोद

आपत्ती – संकट

आज्ञा – आदेश ,हुकुम

अंगार – निखारा

अंत – शेवट ,अखेर

अंधार – तिमिर ,काळोख ,तम

आसक्ती – लोभ ,हव्यास

आस – इच्छा ,मनीषा

आयुष्य – जीवन

आकाश – नभ ,गगन ,अंबर ,आभाळ

आरसा – दर्पण

आसन – बैठक

इहलोक – मृत्यलोक

इंद्र – सुरेंद्र ,देवेंद्र

इनाम – बक्षीस

इशारा – सूचना ,खुण

उपद्रव – त्रास ,छळ

उत्कर्ष – भरभराट ,प्रगती ,विकास

उर्जा – शक्ती

उदास – दुखी, खिन्न

उपवन – बगीचा , बाग , उद्यान ,वाटिका

उदर – पोट

उणीव – कमतरता ,न्यन ,न्यूनता


उंदीर – मूषक

उपदेश – सल्ला

उस्ताह – हुरूप

एकजूट – एकी ,ऐक्य , एकता

एश्वर्य – वैभव ,श्रीमंती

औक्षण – ओवाळणे

मनोरंजन – करमणूक

कष्ट – मेहनत

कटी – कंबर

कान – कर्ण , स्रोत

कावळा – वायस ,काक ,एकाक्ष

कठोर – निर्दय , निष्टुर

कमल – पंकज , राजीव ,पदम ,अंबुज ,सरोज ,नीरज ,कौमोदिनी

काष्ठ – लाकूड

किल्ला – गड ,तट ,दुर्ग

कृपण – कंजूस ,चिक्कू

कृश – अशक्त ,हडकुळा

खग – विहंग ,अंडज ,द्वीज ,पक्षी

ख्याती – कीर्ती ,प्रसिधी

खंत – खेद ,दु:खं

खांब – स्तंभ

खाचा – भेगा ,चिरा

खटाटोप – प्रयत्न ,मेहनत ,धडपड

गाव – खेडे ,ग्राम

गाणे – गीत

गुहा – गुफा

गाय – धेनु ,गोमाता

गौरव – सत्कार

गणपती – गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश

गोष्ट – कथा ,कहाणी

गंध – परिमळ ,वास

घोडा – वारू ,तुरंग ,अश्व ,हय

घर – निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह ,भवन

चंद – सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर

चेहरा – वदन ,आनन ,तोंड ,मुख

ओटा – चौथरा

चौफेर – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली

छद – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली

छिद्र – भोक

छडा – तपास ,शोध

छबी – सौंदर्य

जरा – म्हातारपण

जयघोष – जयजयकार

जिज्ञस – पधार्थ

जखम – इजा ,व्रण

जीर्ण – जुने

जिव्हाळा – प्रेम ,माया ,ममता

झोका – हिंदोळा

झेंडा – निशाण ,ध्वज ,पताका

झुंबड – गर्दी

झांजर – पहाट

झाड – तरू ,वृक्ष

टंचाई – कमतरता

टुमदार – रम्य

ठसा – खूण

ठेकेदार – कंत्राटदार ,मक्तेदारी


ठग – लुटारू

डोके – माथा ,मस्तक ,शीर

डोल – तोरा ,ऐट

डोळा – नयन ,नेत्र ,लोचन ,चक्षु ,अक्ष

डोंगर – पर्वत

ढग – मेघ ,जलद ,अंबुद ,पयोद

ढीग – रास

तलाव – सारस ,तटाक ,तळे ,कासार

तरुण – जवान ,युवक

तंदूस्त – निरोगी

तहान – लालसा ,तृषा

तारे – तारका ,चांदण्या ,नक्षत्र

तारू – जहाज ,गलबत

तालीम – व्यायामशाळा

तृण – गवत

तळ – स्थान ,ठिकाण

थकवा – शिणवटा ,शीण

थवा – घोळका ,गट ,चमू ,समुदाय

थंड – शीत ,गार ,शीतल

दुर्धर – कठीण ,अवघड ,गहन

दुर्दशा – दुरवस्था ,दुस्थिती

दैन्य – दारिद्र्य

द्रव्य – पैसा

देव – ईश्वर ,परमेश्वर ,सूर ,ईश

दुजाभाव – भेदभाव

दुनिया – जग ,विश्व

दुजा – दुसरा

दया – करून

दात – दंत ,रदन

दंडवत – नमस्कार, प्रणाम

दीन – गरीब

दागिना – अलंकार ,भूषण

दगड – खडक ,पाषाण

धरणी – पृथ्वी ,धरती ,मही ,वसुधा ,वसुंधरा ,भूमी ,धरित्री ,जमीन ,भू

धनुष – चाप ,धून ,कोदंडा ,तीरकमठा

धन – संपत्ती ,संपदा ,वित्त, संपती , द्रव्य

धवल – पांढरे ,शुभ्र

नीच – तुच्छ , चांडाळ , अधम

निर्मळ – स्वच्छ ,निष्कलंक , विमल

निर्झर – झरा

निर्जल – ओसाड

नदी – सरिता , तटिनी ,जीवनदायीनी

नाथ – धनी, स्वामी

नारळ – श्रीफळ ,नारिकेल

नवनीत – लोणी

नजराणा – भेट ,उपहार

नगर – शहर ,पूर , पुरी

नौदल – आरमार

नेता – नायक, पुढारी

पाणी – जल , उदक, वारी , नीर जीवन ,पय ,सलील

पोपट – शुक , राघू ,रावा ,कीर ,

पारंगत – निपुण ,तरबेज

परिमल – सुवास ,सुगंध

पर्वत – नगर ,गिरी ,शेल ,अचल ,अद्री

पाळत – पहारा

पान – पर्ण ,पत्र ,पल्लव

परेड – कवायत

पगडा – प्रभाव


पंक – चिखल

पंक – चिखल

पंक्ती – राग , ओळ ,पंगत

पंडित – शास्री ,विद्वान ,बुद्धिमान

प्राचीन – पुरातन ,जुनाट

प्रतिक – चिन्ह, खुण

प्रपंच – संसार

प्रजा – लोक ,रयत ,जनता

प्रकाश – उजेड ,तेज

प्रताप – पराक्रम

प्रात:काळ – सकाळ ,उषा ,पहाट

प्रेम – माया ,लोभ ,स्नेह

प्रहर – वेळ

फरक – भेद ,भिनता

फुल – पुष्प, सुमन ,कुसुम

बैल – वृषभ ,पोळ ,खोंड

बेढब – बेडोल

बाप – वडील , पिता , जनक , तात,जन्मदाता

बंधन – निर्बंध , मर्यादा

बेत – योजना

बक – बगळा

बहिण – भगिनी

बहर – हंगाम ,सुगी

ब्रीद – बाणा ,प्रतिष्टा

बंधू – भाऊ

भरवसा – विश्वास , खात्री

भाऊबंद – नातेवाईक ,आप्त ,सोयरे

भाव – किंमत

भार – ओझे

भान – जागृती ,ध्यान

भूषण – अभिमान ,मोठेपणा

भित्रा – भीरु, भ्याड ,भेकड

भुंगा – भ्रमर ,अली ,मिलिंद ,भृंग

मुलगा – सुत,पुत्र,तनय,नंदन,लेक

मुलगी – सुता,पुत्री,तनया,दुहिता,कन्या,लेक,तनुजा

मंगल – पवित्र

मित्र – सवंगडी ,दोस्त ,साथीदार ,सोबती ,स्नेही

मुलामा – लेप

मासा – मीन ,मत्च्य

माणूस – मानव ,नर मनुष्य ,मनुज

मोहिनी – भुरळ

मोकाट – मोकळा

मेंढा – मेष

मजा – गमंत ,मौज

मत्सर – द्वेष ,असूया

मंगल – पवित्र

मुद्रा – शिक्का

महिमा – थोरवी ,मोठेपणा ,महात्म्य

मनसुबा – बेत ,विचार

मलूल – निस्तेज ,खिन्न

मंदिर – देऊळ,देवालय

मध – मकरंद

यातन – दु:ख ,वेदना

याचक – भिकारी

युवती – तरुणी


यान – अंतराळयान

रस्ता – वाट ,मार्ग ,पथक ,सडक

राक्षस – देत्य ,दानव असुर

रंक – गरीब

रक्ष – कोरडे ,निरस

रात्र – निशा ,रजनी ,यामिनी ,रात

राजा – नृप ,भूप ,नरेश ,भूपती , भूपाळ, महिपती

लावण्य – सौंदर्य

लाडका – आवडता

लांज – शरम ,भीड

लढाई – लढा ,झुंज ,संघर्ष

वारा – वायु , वात ,पवन

वासना – इच्छा

वाली – रक्षणकर्ता

वायदा – करार

विलंब – उशीर

विद्रूप – कुरूप

विनय – नम्रता

विशाल – विस्तृत ,विस्तीर्ण

व्याकूळ – दु:खी

विषण्ण – कष्टी, खिन्न

विलग – सुटे ,अलग

व्यथा – दु:ख

वेश -पोशाख

वादविवाद – भांडण

विनवणी – विनंती

वरदान – देणगी , श्रेष्टदान

वर्षा – पाऊस ,पावसाळा

वर – नवरा ,पती,भ्तार

वारा – अनिल ,समीर ,मरुत

वचक – धाक ,दरारा

वस्त – बालक ,वासरू

वीज – बिजली ,सौदामिनी ,चपला ,चंचला ,विदूत ,तडिता,विदुल्लाता

उपसंहार – सारांश

वेल – लता ,लतिका

बेडूक – मंडूक

किळस – घृणा , तिटकारा

बुद्धी – मती ,अक्कल

ब्राम्हण – विप्र

रहष्य – मर्म ,गूढ

राग – क्रोध ,रोष ,संताप ,त्वेष ,कोप

रजनी – निशा ,रात्र

शंका – संशय ,किंतु

पांढरा – श्वेत , शुभ्र ,धवल

हेवा – असूया ,इर्षा ,मस्तर

युगुल – जोडी,द्वय

युद्ध – लढाई ,समर ,संग्राम, रन

कपाळ – भाल ,ललाट ,निढळ ,कपोल

क्रीडा – लीला ,खेळ ,मौज ,विहार

कनक – सुवर्ण ,कांचन ,सोने

कुरूप – विरूप ,विद्रूप

कासव – कूर्म

कोरडा – शुष्क,रखरखीत

काळजी – चिंता ,फिकीर ,विवंचना

चेहरा – आनन ,वंदन

तुषार – थेंब ,दहिवर

तृप्ती – संतोष ,समाधान

खजिना – तिजोरी ,भांडार

गर्विष्ठ – घमेंखोर ,अहंमन्य

गृह – निवास ,सदन ,आलय

दुध – पय ,क्षीर ,दुग्ध

दानव – असुर, राक्षस ,दैत्य

दास – सेवक ,गुलाम ,किंकर ,नोकर

दारिद्र्य – रंक ,गरीब ,निर्धन

दैव – नशीब ,प्रारब्ध

दंड – शासन ,शिक्षा

समन्वय – मेळ ,मिलाफ

सावध – दक्ष ,जागरूक

सुगंध – सुवास ,परिमल


जरब – दरारा, वचक ,धाक

जमीन – भू ,धारा ,धरणी ,भुई

नमस्कार – प्रणाम ,प्रतिपात ,नमन ,अभिवादन

पती – दादला ,नवरा ,भ्रतार

नदी – सरिता ,तरंगिणी

नारी – वनिता ,ललना ,स्री

नर – पुरुष

झाड – वृक्ष ,तरू

उदरनिर्वाह – चरितार्थ ,उपजीविका ,योगक्षेम, उदरपोषण

ऋषी – तपस्वी ,मुनी

जीभ – रसना ,जीव्हा

दागिना – अलंकार ,आभूषण

दैत्य – दानव ,राक्षस ,असुर

पुण्य – सत्कर्म , सुकृत श्रेयस

प्रवीण – निपुण ,कुशल

अवघड – कठीण, बिकट

भांडण – झगडा ,तंटा ,कलह

मोर – मयूर ,केकी

मित्र – सखा ,सवंगडी ,स्नेही

मन – चित्त ,मानस ,अंत:करण

यज्ञ – होम ,याग

रोग – विकार ,व्याधी

लक्ष्मी – रमा, स्री

वस्र – वसन

वाघ – शार्दुल ,व्याघ्र

विद्वान – पंडित, निष्णात

सकल – अखिल ,समस्त

समाप्ती – पूर्ती ,सांगता ,अंत

सह्याद्री – सह्यगिरी

आरंभ – सुरुवात,प्रारंभ

सेनापती – सेनानी ,सेनानायक

स्थिती – दशा ,अवस्ता

ज्ञाता – ज्ञानी ,सुख ,तज्ञ

कान – श्रवण , कर्ण

किमया – चमत्कार ,जादू

कुटी – झोपडी

खडक – दगड ,पाषा

रुबाब – दिमाख ,ऐट ,डोल

लढा – संग्राम ,झुंझ,संगर्ष

ध्वज – निशाण ,झेंडा

तृषा – तहान ,लालसा

नारळ – श्रीफळ

नीच – तुच्छ ,अधम

निर्जल – ओसाड

बाण – तीर ,शर

अंथरून – शय्या ,बिछाना


समुद्र – सागर ,रत्नाकर

सोपा – सुगम ,सुकर ,सुलभ

कला – कसब ,कौशल्य

विश्वासघात – दगाबाजी , बेईमान

शेतकरी – कृषिक ,कृषीवल

कीर्ती – लौकिक ,ख्याती ,प्रसिद्धी

क्लुप्ती – युक्ती ,कल्पना ,शक्कल

कलागत – भांडण ,वैर

कलंक – डाग ,बट्टा ,ठपका ,काळिमा

सारांश – डाग ,बट्टा ,ठपका ,काळिमा

मद्यपान स्पर्धा – सुरापान ,अहमहमिका ,चढाओढ

उस – इक्षु

हकालपट्टी – उचलबांगडी ,उच्चाटन ,अर्धचंद्र

चर्चा – वाटाघाटी ,उहापोह

स्तन – उरोज

कठीण – क्लिष्ट ,दुर्बोध

पैजण – नुपूर

शिकार – पारध ,मृगया

म्हण – लोकोक्ती

फुशारकी – वल्गना ,प्रौढी ,बढाई

गवगवा – वाच्यता ,बोभाता

म्हातारपन – जरा ,वार्धक्य

पंडिता – विदुषी

कंटाळा – विट ,उबग ,शिसाई

वेश्या – वारांगना

शिकारी – व्याध ,पारधी

बाल्य – लहानपन

संडास – पायखाना

सासरा – श्वशुर

रक्षणकर्ता – वाली ,त्राता

शुसृषा – सेवा ,परिचर्या

हुंडा – वरदक्षिणा

वेदना – कळ , शूळ

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो :-

आरोग्यसेवा,
उद्योग,
कला,
क्रीडा,
पत्रकारिता,
लोक प्रशासन,
विज्ञान,
समाजसेवा,

निकष,

सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.

स्वरुप

पुरस्कार विजेत्याला ₹ १० लाख रोख व प्रशस्तीपत्र दिले जाते. पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

(भाषण) – कार्य, विचार आणि निबंध
मूळ आडनाव – गोह्रे
जन्म – 11 एप्रिल 1827
मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.
1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.
युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल .

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय
आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण ---

फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

विवाह ---

महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

संस्थात्मक योगदान ---

3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :
1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘

1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.
1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.
1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.
शिवाजी महाराजांचा पोवाडा.
महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये
थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.
1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.

2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.
ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.
सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘
सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

महाराष्ट्रातील समाजसुधारक आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे

जन्म – 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).

मृत्यू – 11 नोव्हेंबर 1982.

आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.

भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.

संस्थात्मक योगदान :

1921 – वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.
संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.
18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.
कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.

आचार्य यांचे लेखन :

1923-महाराष्ट्र धर्म मासिक.
गीताई – भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.
मधुकर(निबंधसंग्रह)
गीता प्रवचने.
‘स्वराज्य शस्त्र‘ हा ग्रंथ.
विचर पोथी.
जीवनसृष्टी.
अभंगव्रते.
गीताई शब्दार्थ कोश.
गीताई – धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.

वैशिष्टे :

वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.
गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.

चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.
मंगरौठ – उत्तरप्रदेश येथे ‘सब भूमी गोपाल की’ हा नारा दिला.

‘जय जगत‘ घोषणा

महाराष्ट्रातील समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे :

जन्म – 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू – 2 जानेवारी 1944.

1932 – 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

‘महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी‘ गं. बा. सरदार.

‘निष्काम कर्मयोगी‘, भाई माधवराव बागल.

जनतेकडून ‘महर्षी‘ ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :

1905 – मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

18 ऑक्टोबर 1906 – डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई

येथे स्थापना. पहिले अध्यक्ष – न्या. चंदावकर.

1910 – जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन‘ ही संस्था.

अनाथाश्रम – रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

23 मार्च 1918 – अस्पृश्यता निवारक संघ.
1918 – मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

1920 – पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

1937 – स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

1923 – तरुण ब्रहयो संघ.

1937 – बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्य

महिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :

प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

1903 – प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

1903 – अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा निबंध वाचला.

Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .


वैशिष्ट्ये :

शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

1904 – मुंबई धर्म परिषद.

1905 – अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

1918 – मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

1924 – वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

1935 – बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.


महाराष्ट्रातील समाजसुधारकधोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे

जन्म – रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू – 9 नोव्हेंबर 1962.

1942 – बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 – भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :

1893 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

1 जानेवारी 1899 – अनाथ बालिका आश्रम.

1907 – हिंगणे महिला विद्यालय.

1910 – निष्काम कर्मकठ.

1916 – महिला विद्यापीठ, पुणे.

1916 – महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

1 जानेवारी 1944 – समता संघ.

1945 – पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
1948 – जातींनीर्मुलन संघ.

1918 – पुणे – कन्याशाळा.

1960 – सातारा – बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :

मानवी समता – मासिक.

1893 – विधवेशी पुनर्विवाह.

1894 – पुनर्विवाहितांचा मेळावा.

1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

1928 – आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.
‘अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार’ – आचार्य अत्रे.

महाराष्ट्रातील समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर

गोपाल गणेश आगरकर:

जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.

मृत्यू : 17 जून 1895,पुणे

1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.

बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .

संस्थात्मिक योगदान :

1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .

15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.
गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.

स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.
अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून

लेखन.

शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.
‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस‘ हे पुस्तक.
हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

वैशिष्टे :---

इष्ट असेल ते बोलणार……
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.
हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.

बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.

जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...