०१ मे २०२२

प्रल्हाद केशव अत्रे मराठी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, दिग्दर्शक.

प्रल्हाद केशव अत्रे
मराठी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, दिग्दर्शक,
प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ - जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

प्रल्हाद केशव अत्रे
P K Atre.jpg
प्रल्हाद केशव अत्रे
जन्म नाव
प्रल्हाद केशव अत्रे
टोपणनाव
केशवकुमार
जन्म
१३ ऑगस्ट १८९८
कोडीत खुर्द, महाराष्ट्र, भारत
मृत्यू
१३ जून १९६९
वरळी ,(मुंबई),महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व
भारत भारतीय
कार्यक्षेत्र
साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती
डॉ. लागू, झेंडूची फुले, कऱ्हेचे पाणी (आत्मचरित्र)
वडील
केशव विनायक अत्रे
आई
अन्नपूर्णाबाई केशव अत्रे
अपत्ये
शिरीष पै, मीना देशपांडे
आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.

जन्म व बालपण
कारकीर्द
संस्था
संपादन करा
आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्‌घाटन २९ मार्च १९८१)
आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६
पहा : प्रतिष्ठाने

चित्रपट
संपादन करा
इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

अध्यापन
संपादन करा
मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.

जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

उणिवा आणि निष्ठा
संपादन करा
आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.[४]

पुस्तके
संपादन करा
शाळांसाठी क्रमिक पुस्तके
संपादन करा
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी)च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.

आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’

नाटके
संपादन करा
अशी बायको हवी
उद्याचा संसार
एकच प्याला-विडंबन
कवडीचुंबक
गुरुदक्षिणा
घराबाहेर
जग काय म्हणेल?
डॉक्टर लागू
तो मी नव्हेच
पराचा कावळा
पाणिग्रहण
प्रल्हाद(नाटक)
प्रीतिसंगम (नाटक)
बुवा तेथे बाया
ब्रम्हचारी
भ्रमाचा भोपळा
मी उभा आहे
मी मंत्री झालो
मोरूची मावशी
लग्नाची बेडी
वंदे भारतम
वीरवचन
शिवसमर्थ
सम्राट सिंह
साष्टांग नमस्कार
काव्य
संपादन करा
गीतगंगा
झेंडूची फुले
कथासंग्रह
संपादन करा
अशा गोष्टी अशा गंमती
कशी आहे गम्मत
कावळ्यांची शाळा
फुले आणि मुले
बत्ताशी आणि इतर कथा
आत्मचरित्र
संपादन करा
कऱ्हेचे पाणी - खंड एक ते पाच
कादंबऱ्या
संपादन करा
चांगुणा
मोहित्यांचा शाप
इतर
संपादन करा
अत्रेटोला
अत्रेप्रहार
अत्रेवेद
अध्यापक अत्रे
अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादक : डॉ. नागेश कांबळे)
आमदार आचार्य अत्रे
आषाढस्य प्रथम दिवसे
इतका लहान एवढा महान
केल्याने देशाटन
क्रांतिकारकांचे कुलपुरुष
चित्रकथा भाग-१
चित्रकथा भाग-२
जय हिंद जय महाराष्ट्र
झालाच पाहिजे
दलितांचे बाबा
दूर्वा आणि फुले
मराठी माणसे, मराठी मने
महापूर
महाराष्ट्र कालचा आणि आजचा
मी अत्रे बोलतोय
मी कसा झालो?
मुद्दे आणि गुद्दे
वस्त्रहरण
विनोद गाथा
विनोबा
संत आणि साहित्य
समाधीवरील अश्रू
सिंहगर्जना
सुभाष कथा
सूर्यास्त
हंशा आणि टाळ्या
हार आणि प्रहार
हास्यकट्टा
हुंदके
शापित यक्ष.(ऑस्कर वाईल्ड बद्दल)
गुरूचरणी (रा.ग.गडकरींसंबंधी)
अत्रेयवाणी
अत्रे विचार
वाघनखं
न लिहिलेली पुस्तके
संपादन करा
आचार्य अत्रे हे 'महाकवी कालिदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ते ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे' व 'मेघमाला' संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती. अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते. आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता;. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता.

पुरस्कार आणि सन्मान
संपादन करा
विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णूदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान (पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपे हेदेखील ’मी अत्रे बोलतोय’ करतात.
दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.
आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकांचा दांडगा अभ्यास असलेले दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला ‘अष्टपैलू अत्रे’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात.
आचार्य अत्र्यांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
संपादन करा
अत्र्यांचं अंतरंग (सुधाकर वढावकर)
अध्यापक अत्रे (प्र. के. अत्रे)
आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते - शिरीष पै
आचार्य अत्र्यांचे महान समकालीन (डॉ. सुधीर मोंडकर)
आठवणीतले अत्रे - अप्पा परचुरे
खुमासदार अत्रे (प्रा. श्याम भुर्के)
थोर नाटककार आचार्य अत्रे (आनंद जयराम बोडस)
युगप्रवर्तक चित्रपट कथाकार आचार्य अत्रे (शशिकांत॰ श्रीखंडे)
वडिलांचे सेवेसी (शिरीष पै)
अत्रे वाङ्‌मय प्रदर्शन
संपादन करा
पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्‌मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्‌मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.

भूगोल प्रश्न व उत्तरे

⭕️ भूगोल प्रश्न व उत्तरे ⭕️

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

यशाचा राजमार्ग प्रश्न मंजुषा

🔰प्रश्न मंजुषा🔰

(1)⚛ भारताच्या पहिल्या महिला पुर्ण वेळ स्वतंत्र संरक्षण मंत्री कोण ?
⏩⏩ निर्मला सीतारामन

(2)⚛ RBI चे पहिले गव्हर्नर कोण होते?
⏩⏩ओसबर्न स्मित

(3)⚛  . ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
(1) लाला लजपतराय
 (2)सुभाषचंद्र बोस
(3) बाळ गंगाधर टिळक✅✅✅
(4) रामनाथ गोयंका

(4)⚛कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो*_
1.लाकूड✅✅✅
2.पाणी
3.धातू
4.स्फोटके

🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान
B. बॅ. महमद अली जीना
C. मौलाना अब्दुल करीम आझाद
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

__________________________
🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
__________________________
⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873
B. 10 ऑक्टोबर, 1873
C. 14 सप्टेंबर, 1873 ✅
D. 15 ऑगस्ट, 1873
__________________________
🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅
B. विरेंद्रकुमार घोष
C. अरविंदो घोष
D. हेमचंद्र दास

🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. जगन्नाथ शंकर शेठ✅
__________________________
🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड

🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
__________________________
🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113

__________________________
🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही
__________________________
🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी
__________________________
⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी
__________________________
🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी
2)दोडाबेटा✅✅
3) अन्ना मलाई
4) उदकमडलम
__________________________
🟡 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

__________________________

धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

📌महाराष्ट्राचा भूगोल 

धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे

जायकवाडी          नाथसागर

पानशेत                तानाजी सागर

भंडारदरा              ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

गोसिखुर्द              इंदिरा सागर

वरसगाव              वीर बाजी पासलकर

तोतलाडोह            मेघदूत जलाशय

भाटघर                  येसाजी कंक

मुळा                      ज्ञानेश्वर सागर

माजरा                   निजाम सागर

कोयना                   शिवाजी सागर

राधानगरी                लक्ष्मी सागर

तानसा                    जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

माणिक डोह            शहाजी सागर

चांदोली                   वसंत सागर

उजनी                     यशवंत सागर

दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी                शंकर सागर

वैतरणा                 मोडक सागर

वनस्पती

वनस्पती

हालचाल करू न शकणाऱ्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.

वनस्पतींमधील विविधता
वनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी : (१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशीभित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.

वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.

वनस्पती हा मूळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे. तरीही, चरक संहितेनुसार, सुश्रुत संहितेनुसार आणि वैशेषिकेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणाऱ्या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरला जात असे.

ऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणाऱ्या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.

अथर्ववेदात वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वर्ग तर तैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.

मनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत. चरक संहितेनुसार व सुश्रुत संहितेनुसार वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.

पाराशर , वृक्षायुर्वेदचा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे (द्विदल व एकदल). नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.

वनस्पतींसंबंधीची मराठी लेखकांची पुस्तके
संपादन करा
ए फिल्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
औषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक)
कॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी)
घरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड)
ट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे)
नक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर)
निसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते)
निसर्गभान (प्रा. श्री.द. महाजन)
परसबाग (द.गो. मांगले)
प्लँट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तिसरा, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे)
फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
बहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर)
वनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे)
सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे)
सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी)
सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले)
हिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर)
अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके
संपादन करा
गार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; लेखक - विष्णू स्वरूप)
जड़ी बूटियों की खेती (हिंदी, लेखक - वीरेन्द्र चन्द्रा आणि मुकुल चन्द्र पाण्डेय)
डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लँट्स ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक - उमराव सिंग, ए.एम. वधवानी आणि बी.एम. जोहरी)
प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ सिल्व्हिकल्चर (इंग्रजी, लेखक - एल.एस. खन्‍ना)
फ्लॉवरिंग ट्रीज (इंग्रजी, लेखक - एम.एस. रंधावा)
फ्लॉवरिग ट्रीज अँड श्‍रब्ज इन इंडिया (इंग्रजी, लेखक - डी.व्ही. कॉवेन)
द बेल (बेलाचे झाड, इंग्रजी, लेखक - आर.एन. सिग आणि सुशांत के. रॉय)
मेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी, लेखक - एस.के. जैन)
व्हेजिटेबल्स (इंग्रजी, लेखक - बी. चौधरी)

____________________

पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती
कडूनिंब
तुळस
कोरफड (कुमारी)
अडुळसा
कुडा
काही सोपे घरगुती उपाय
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत.
कडूनिंबहे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहेरील भागाचा काढाही ब-याच आजारांवर उपायकारक ठरतो. या झाडाची लागवड करणं आणि त्याची काळजी घेणं हे आपल्या फायद्याचं आहे. कडूनिंब तेल असे तयार करावे कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते. बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.
तुळसतुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महान' असे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो. याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे,रक्ती मूळव्याध, इत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूध, किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावं. सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे - एक कप तुळशीची पानं पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कप, इतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.
कोरफड (कुमारी)या वनस्पतीचा उपयोग जखमेवरची मलमपट्टी म्हणून छान होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापा. जखम धुऊन घ्या. तुकडयाची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. ब-याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताचे आजार, स्त्रियांचे आजार आणि खोकला यावर हे खूप गुणकारी आहे.
आपण कोरफड आपल्या बागेत लावू या आणि लोकांनाही लावायला सांगू या. कोरफड कणखर असते आणि वर्षानुवर्षे वाढते व टिकते .

अडुळसाया झुडुपाचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. 50-60 अडुळशाची पाने स्वच्छ धुऊन, ती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे. हा काढा गार करून गाळून ठेवावा. खोकला झाल्यास 20 मि.लि. काढा दिवसातून 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.
कुडाहे जंगलात सापडणारं झाड आहे. त्याची शेंगेसारखी फळं पिकल्यावर काळी होतात ही फळे जोडीने लटकलेली असतात. म्हणून ती मध्ये जोडलेल्या दोन शेवग्याच्या शेंगांसारखी दिसतात. या झाडाच्या खोडाचे साल औषधी असते. जुलाब आणि आव यासाठी ते वापरतात. खोडाच्या सालाचा एक तुकडा कुटून त्यात एक चमचा मध मिसळून औषध तयार केले जाते. कुडयाचा काढादेखील करतात. सोळा कप पाण्यामध्ये सालाचे एक कप कूट घालून मिश्रण चार कप होईपर्यंत उकळा. गार करून बाटलीत भरून ठेवा. एका माणसाला एका वेळी 20 मि.लि. काढा, दिवसातून तीनदा द्यावा.
काही सोपे घरगुती उपाय1. हळद ही एका वनस्पतीच्या कंदाची पूड असते. आपल्या देशात ती जेवणात वापरतात आणि औषध म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. शेकडो वर्षापासून तिचे औषधी गुण सर्वांना माहीत आहेत. हळदीची पूड रक्त थांबायला आणि जखम बरी करण्यात मदत करते. खरचटणे किंवा कापण्यावरही हळद आणि तेल लावण्याची पध्दत आहे. आंघोळ करताना दूध बेसन आणि हळदीचा लेप लावण्याची देखील पध्दत आहे. 2. त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहेडा या तीन फळांचं औषधी मिश्रण आहे. बध्दकोष्ठ, मधुमेह तसेच वजन कमी करण्याकरता याचे चूर्ण पोटात घेतात. बाहेरून लावल्यास जखमा भरून निघण्याकरता हे उपयुक्त आहे. आंघोळीच्या वेळी त्रिफळा चूर्ण लावल्यास त्वचेकरतादेखील याचा उपयोग होतो. हे चूर्ण दात घासण्याकरताही वापरतात. घशावर सूज आल्यास, हिरडयातून रक्त येत असल्यास किंवा तोंड आल्यावर याच्या काढयाने गुळण्या करतात. 3. सांधेदुखीकरता तेलाने मालिश करणे चांगले. पण औषधांचीदेखील गरज असते. 4. ज्येष्ठमध ही एक अतिशय गुणकारी वनस्पती आहे. हिच्या सुक्या काटक्या मिळतात. घसा बसल्यास याच्या खोडाची पूड मधात कालवून देतात. ही पूड वरवरचा घशातील खोकलाही बरा करते. गाईच्या दुधाबरोबर पूड घेतल्यास मेंदूची क्षमता वाढवण्यात याचा उपयोग होतो. ही वनस्पती शरीरात थंडावा निर्माण करणारी असते. म्हणूनच पित्तदोषाच्या आजारांवर हिचा वापर करतात. 5. चमकदार त्वचेकरता ज्येष्ठमध पूड आणि हळद दुधात कालवून लावावी. शतावरीची पूड दुधाबरोबर घेतल्यास शक्तिवर्धक औषधासारखा उपयोग होतो आणि आरोग्य सुधारते. 6. आम्लतेसाठी आवळयाची पूड तुपात कालवून पोटात घेतात. 7. पोटात जळजळीकरता गुलकंद आणि तूप उपयोगी आहे. 8. कोरडया खोकल्याकरता गरम किंवा कोमट पाणी प्यावे. 9. जुलाब होत असल्यास शरीरातील पाणी भरून येण्यासाठी लिंबाचा रस, साखर आणि मीठ घ्यावे. 10. कोरडया खोकल्याकरता मध चांगला. इतर औषधे मधात घोळवून देण्यासाठी पण उपयोग होतो. 11. वजन कमी असल्यास ते वाढवण्याकरता दूध आणि तूप उपयुक्त आहेत. 12. झोप लागत नसल्यास, तेलाने डोक्याला मालिश करावे. तसेच गायीच्या तुपाने तळपायाला मालिश करावी. वनौषधींबद्दल अधिक माहिती आपल्याला इतर आजार आणि विषयांच्या माहितीसोबत मिळेलच.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...