Monday, 11 April 2022

11 एप्रिल 2022 चालू घडामोडी

१) नुकतेच महाराष्ट्र केसरी २०२२ कोण बनले आहे?

- पृथ्वीराज पाटील

२) नुकतेच CRPF शौर्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
- ९ एप्रिल

३) नुकतेच भारत आणि कोणत्या देशात "खंजर २०२२" युद्धसराव आयोजित केला आहे?

- किर्गीस्तान

४) नुकतेच नागरिक उड्डाण मंत्रालयाने कोणती योजना सुरु केली आहे?

- आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क योजना

५) "टायगर ऑफ द्रास" पुस्तक कोणी लिहिले आहे ?
- मीना नय्यर / हिम्मत सिंह

६) अलीकडेच कोणत्या बंगाली लेखकाला "ओ हेनरी पुरस्कार २०२२" मिळाला आहे?

• अमर मित्रा

७) नुकतेच कोणत्या राज्यात "चीथिराई" उत्सव साजरा करण्यात आला?

- तामिळनाडू

८) नुकतेच केंताजी ब्राऊन जैक्सन" कोणत्या देशाची सुप्रीम कोर्टाची पहिली कृष्ण वर्णीय महिला न्यायाधीश बनली आहे?

- अमेरिका

९) अलीकडेच संरक्षण सचिव अजयकुमार यांनी कोठे “artificial Intelligence प्रोगेमिंग सेंटर" सुरु केले आहे?

- झुनझुनू, राजस्थान

प्र. अलीकडे कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणामध्ये ई-सायकलचा समावेश केला आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्र. भारत-किरगिझस्तान संयुक्त विशेष सैन्य सरावाच्या 9व्या आवृत्तीचे अलीकडेच कोणत्या राज्यात आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेचे कारण देत 4 पाकिस्तानी चॅनेल्ससह किती YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे?
उत्तर :- २२

प्र. अलीकडेच 57 वा CRPF शौर्य दिवस 2022 कधी साजरा झाला?
उत्तर :- ९ एप्रिल

प्र. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर किती टक्के ठेवला आहे?
उत्तर :- ४ टक्के

प्र. अलीकडेच ओडिशाच्या किनार्‍याजवळील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR), चांदीपूर येथे “सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट” (SFDR) बूस्टरची यशस्वी चाचणी कोणी केली?
उत्तर:- DRDO

प्र. नुकताच शोधलेला बाह्य ग्रह 'K2-2016-BLG-0005Lb' हा कोणत्या ग्रहाचा एकसारखा जुळा आहे?

उत्तर :- बृहस्पति

प्र. अलीकडेच इंदिरा गांधी दिल्ली महिला तांत्रिक विद्यापीठाने कोणत्या देशाच्या विद्यापीठाशी करार केला?

उत्तर :- मलेशिया

प्र. अलीकडेच ८ एप्रिल २०२२ रोजी 'प्रधानमंत्री मुद्रा योजने'चा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आला?

उत्तर :- ७ वा

प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) द्वारे 7500 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले?
उत्तर :- गुजरात

प्र. अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात लागू केलेली आणीबाणी उठवली आहे?
उत्तर :- श्रीलंका

प्र. अलीकडे कोणत्या देशाच्या कृषी निर्यातीने प्रथमच ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे?
उत्तर :- भारत
प्र. अलीकडे कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणामध्ये ई-सायकलचा समावेश केला आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्र. भारत-किरगिझस्तान संयुक्त विशेष सैन्य सरावाच्या 9व्या आवृत्तीचे अलीकडेच कोणत्या राज्यात आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेचे कारण देत 4 पाकिस्तानी चॅनेल्ससह किती YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे?
उत्तर :- २२

प्र. अलीकडेच 57 वा CRPF शौर्य दिवस 2022 कधी साजरा झाला?
उत्तर :- ९ एप्रिल

प्र. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर किती टक्के ठेवला आहे?
उत्तर :- ४ टक्के

प्र. अलीकडेच ओडिशाच्या किनार्‍याजवळील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR), चांदीपूर येथे “सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट” (SFDR) बूस्टरची यशस्वी चाचणी कोणी केली?
उत्तर:- DRDO

प्र. नुकताच शोधलेला बाह्य ग्रह 'K2-2016-BLG-0005Lb' हा कोणत्या ग्रहाचा एकसारखा जुळा आहे?

उत्तर :- बृहस्पति

प्र. अलीकडेच इंदिरा गांधी दिल्ली महिला तांत्रिक विद्यापीठाने कोणत्या देशाच्या विद्यापीठाशी करार केला?

उत्तर :- मलेशिया

प्र. अलीकडेच ८ एप्रिल २०२२ रोजी 'प्रधानमंत्री मुद्रा योजने'चा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आला?

उत्तर :- ७ वा

प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) द्वारे 7500 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले?
उत्तर :- गुजरात

प्र. अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात लागू केलेली आणीबाणी उठवली आहे?
उत्तर :- श्रीलंका

प्र. अलीकडे कोणत्या देशाच्या कृषी निर्यातीने प्रथमच ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे?
उत्तर :- भारत

➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र केसरी 2022 या बद्दल काही विशेष  माहिती


1—  2022 महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे भरली होती
— सातारा

2— महाराष्ट्र केसरी स्पर्धा फायनल कोणत्या दोन खेळाडू  मध्ये झाला
— पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विरुद्ध विजय बनकर अमरावती

3— महाराष्ट्र केसरी 2022 विजेता खेळाडू कोण
— पृथ्वीराज पाटील कोल्हापूर

4—  उपमहाराष्ट्र केसरी 2022 उपविजेता  खेळाडू कोण
— विशाल बनकर (मुंबई )

5— आत्ता झालेले महाराष्ट्र केसरी स्पर्धा......... वि स्पर्धा आहे
— 64 वी

6— महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांचं गाव कोणतं
— कोल्हापूर

7— पृथ्वीराज पाटील यांनी विजय बनकर किती गुणांनी मात केली
› 5—4

8—  पृथ्वीराज पाटील हा सैन्य दलात कार्यरत आहे

9— पृथ्वीराज पाटील यांनी   अवघ्या 21 व्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आहे

महत्वपूर्ण प्रश्न व उत्तरे


#One_liner #Current_Affairs

प्र. 1 "इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन" कोठे आहे?
उत्तर श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)

प्रश्न 2 दरवर्षी "जागतिक पर्यावरण दिन" कधी साजरा केला जातो?
उत्तर 5 जून रोजी

Q. 3 PSLV चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन

Q. 4 जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे?
उत्तर रेडवुड

Q.5 कोणत्या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट चित्रपट" मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला?
उत्तर परजीवी

Q.6 "पहिल्या पंचवार्षिक योजनेची" मुदत काय होती?
उत्तर 1951 ते 1956

Q.7 भारतात नोटाबंदी कधी झाली?
उत्तर 2016

Q.8 कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते?
उत्तर व्हिटॅमिन के

प्र.९ काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात १९२९ मध्ये काय घडले?
उत्तर पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली

प्र.१० “द व्हाईट टायगर” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर अरविंद अडिगा

प्र.११ “जागतिक आरोग्य संघटना” कुठे आहे?
उत्तर जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

Q.12 BRAC चे जुने नाव काय आहे?
उत्तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

प्र. 13 कोणत्या IT कंपनीने संगणकाचे उत्पादन बंद केले आहे?
उत्तर IBM

Q.14 कोणत्या घटनेमुळे वाळवंटातील वाळू पाण्यासारखी दिसते?
उत्तर मारिचिका

Q.15 खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट नाही?
उत्तर कोणार्क मंदिर, आग्रा किल्ला, हवा महाल, एलिफंटा लेणी

प्रश्न 16. कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण अनिवार्य आहे?
उत्तर 6 ते 14 वर्षे

Q. 17 डिसेंबर 2020 पर्यंत T20 क्रिकेटमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर होता?
उत्तर इंग्लंड

Q.18 “FORTRAN” चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर सूत्र भाषांतर

प्र. 19 काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथमच "राष्ट्रगीत" गायले गेले?
उत्तर कोलकाता

प्र. २० “F7 की” MS Word मध्ये वापरली जाते –
उत्तर शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका तपासण्यासाठी

प्र.२२ "कॉफी आणि चहा" ही कोणत्या प्रकारची शेती आहे?
उत्तर नगदी पिक

Q.23 "एडीस डास" चावल्यामुळे कोणता रोग होतो?
उत्तर डेंग्यू

Q.24 कोणती संस्था भारतात "विमा" नियंत्रित करते?
उत्तर IRDA (IRDA)

Q.25 "भटियाली लोकगीत" कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर पश्चिम बंगाल

महाराष्ट्र संबंधित महत्वाचे वन लाइनर


1) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
👉 9.7 टक्के .
2) महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?
👉 मध्ये प्रदेश .
3) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
👉 रत्नागिरी.
4) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?
👉 गोंदिया.
5) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?
👉 रत्नागिरी.
6) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता?
👉 सिंधुदुर्ग.
7) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?
👉 नाशिक.
8) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
👉 अंबोली (सिंधुदुर्ग).
9) महाराष्ट्रात वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
👉 ठाणे जिल्ह्यात.
10) विदर्भातील नंदनवन कोणते?
👉 चिखलदरा.
11) संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे?
👉 शेगाव जिल्हा बुलढाणा .
12) महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
👉 नाशिक

13) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
👉 नाशिक.
14) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
👉 सातपुडा.
15) महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
👉 यवतमाळ.
16) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
👉 NH 6 .
17)cस्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
👉 भगुर (नाशिक ).
18) महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
👉 नांदेड.
19) महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?
👉 सोलापूर.
20) छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
👉 कोल्हापूर येथे 1895 ला.
21) महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
👉 अमरावती.
22) पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
👉 जुन्नर.
23) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
👉 भीमा.
24) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
👉 प्रवरानगर(जी अहमदनगर ). 
25) महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
👉 गोदावरी.
26) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
👉 गोदावरी.
27) महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
👉 अहमदनगर.
28) संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
👉 अमरावती.
29) यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
👉 प्रीतिसंगम
30) भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य  कोठे स्थापन करण्यात आले?
👉 कर्नाळा जिल्हा रायगड.
31) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
👉 मोझरी (अमरावती)
32) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
👉 कोयना प्रकल्प.
33) महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
👉 गंगापूर (नाशिक)
34) महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
👉 औरंगाबाद.
35) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 बुलढाणा

म्हणी व अर्थ

मराठी व्याकरण व लेखन:
🌷म्हणी व अर्थ🌷
🌷कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?------
ज्याला रक्षण करायला ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करुन चोरी केल्यावर कोणालाच सांगता येत नाही

🌷कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच------
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो

🌷कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटाची तट्टानी------
अतिशय थोर माणूस व अति क्षुद्र माणूस यांची बरोबरी होत नाही

🌷कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं------
लाजलज्जा पार सोडून देणे

🌷कठीण समय येता कोण कामास येतो?------
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही

🌷कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच------
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही

🌷कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी------
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते

🌷कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी------
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही

🌷कर नाही त्याला डर कशाला?------
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही

🌷करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?------
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

🌷करणी कसायची, बोलणी मानभावची------
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर

🌷करायला गेले गणपती अन् झाला मारुती------
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे, नाहीतर त्यातून भलतेच घडते

________________________

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷काप गेले नि भोके राहिली------
वैभव गेले नि त्याच्या खुणा राहिल्या / श्रीमंतीचे दिवस गेले, फक्त आठवणी राहिल्या

🌷काम नाही कवडीचं अन् रिकामपण नाही घडीचं------
काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो

🌷कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी------
काम साधण्यापुरते गोड बोलणे

🌷काळ आला होता पण वेळ आली नव्हती------
नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात निभावले

🌷काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची------
सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे

🌷कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही------
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

🌷कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते------
पूर्वग्रहदूषिच व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात

🌷काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली------
सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही

🌷शब्दसमूहाबद्दल एक शब्द🌷
   
🌷फार कमी बोलणारा - अबोल

🌷 आधी जन्म घेतलेला - अग्रज

🌷 देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा -   अनुष्ठान

🌷 सीमा नाही असे - असीम

🌷 घरी पाहुणा म्हणून आलेला - अतिथी

🌷 धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

🌷 ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे - अनुपम

🌷थोडक्यात समाधान मानणारा - अल्पसंतुष्ट

🌷 विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य - अतिक्रमण

🌷पायात काहीही न घालणारा - अनवाणी

🌷 कधीही नाश न पावणारे - अविनाशी

🌷 देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म - अवतार

🌷 जाणून घेण्यास अशक्य असे - अज्ञेय

🌷 वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख - अग्रलेख

🌷अनेक चांगल्या गुणांनी युक्त - अष्टपैलू

तुका म्हणे /म्हणी व अर्थ

मराठी व्याकरण व लेखन:
🌷तुका म्हणे🌷

ओले मुळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्य सिद्धी ।। नव्हे ऐसे काही नाही अवघड । नाही कईवाड तोची वरी ।। दोरे चिरा कापे पडिलां कांचणी ।
अभ्यासे सेवनी विष पडे ।। तुका म्हने कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकांएकी ।।

🌷तुकाराम महाराज म्हणतात,जमिनीतील झाडाच्या मुळा अत्यंत नाजूक आणि ओलसर राहतात,परंतु त्याच मुळा कठीण अशा खडकाला भेदून जातात. अभ्यासा अंती,प्रयत्नाअंती कोणतेही कार्य यशस्वी होते,शेवटास जाते.

🌷या जगात कोणतेही काम अवघड असे नाहीच.छोटा दोर किंवा दोरा सतत घासून घासून दगडाला सुद्धा कापू शकतो, जर नेहमी रोज रोज थोडे थोडे करून विष जरी घेतले तर त्याचा सराव होऊन विष सुद्धा पचवण्याची ताकत निर्माण होते.

🌷आईच्या उदरात बाळास वाढण्यास जागा नसते परंतु हळूहळू ते बसण्यासाठी,वाढण्यासाठी जागा निर्माण करतेच. थोडक्यात या अभंगातून तुकारामांनी दैवावर विसंबून न राहता माणसाने प्रयत्नवादी बनले पाहिजे असा उपदेश केला आहे.

___________________

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷करायला गेलो एक अन् झाले एक------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷करावे तसे भरावे------
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे

🌷करीन ती पूर्व दिशा------
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे

🌷करू गेले काय अन् उलटे झाले काय------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷कवडी कवडी माया जोडी------
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते

🌷कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड------
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते

🌷कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले------
करणे थोडे पण गवगवाच फार

🌷कसायाला गाय धार्जिणी------
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात

🌷का गं बाई उभी, घरात दोघीतिघी------
घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो

🌷काकडीची चोरी, फाशीची शिक्षा------
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी

🌷काखेत कळसा अन् गावाला वळसा------
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे

संत तुकोबांचा उपदेश

🌷संत तुकोबांचा उपदेश🌷

तो चि लटिक्यामाजी भला ।
म्हणे देव म्यां देखिला ।।१।।
ऐशियाच्या उपदेशें ।
भवबंधन कैसें नासे ?।
बुडवी आपणासरिसे ।
अभिमानें आणिकांस ।।ध्रु.।।
आणिक नाहीं जोडा ।
देव म्हणवितां या मूढा ।।२।।
आणिकांचे न मनी साचें ।
तुका म्हणे या श्रेष्ठांचें ।।३।।

🌷अर्थ व चिंतन🌷
देव ही काही पहायची वस्तू नाही. देव दिसतही नाही आणि दिसणारही नाही. देव हा विषय नंतरचा; पण देवत्व पाहता येते. रंजल्या-गांजल्यांची सेवा करणाऱ्यात देवत्व असते. देव दगडात नाही तर माणसात असतो. तुका सांगे मूढजना । देही देव का पाहणा? ।। देवाची व्याख्या समजून न घेता वाट्टेल तिथं डोकं टेकवणाऱ्या 'मूढ' म्हणजेच मूर्ख लोकांना तुकोबा 'देहात देव का पाहत नाहीत?' असा प्रश्न करून देवाचं मुख्य ठिकाण हे आपलं शरीर म्हणजेच माणूस असल्याचं  सांगतात.

प्रत्येक जीवात शिव आहे. म्हणून जात, धर्म, वर्ण, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन प्रत्येकाने प्रत्येक जीवात शिवाला पाहायला पाहिजे. म्हणजे एकमेकांविषयीच्या द्वेषाचे वातावरण निवळू शकेल.

ईश्वराचं स्वरूप तुकोबांइतके आणखी कुणाला नक्की सांगता येईल? म्हणून या अभंगात ते याविषयी अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडतात. त्यांना कुणीतरी 'मी देव पहिला' असं म्हणणारा आणि कुणीतरी 'मीच देव आहे' असं म्हणणाराही नक्कीच भेटला असणार. आजतर अशा लोकांचा प्रचंड भरणा पाहायला मिळतो.

अपप्रचाराला बळी पडणारी आपण आंधळी माणसं. पण संत डोळस असतात. ते नेमकं पाहत असतात. तुकोबा म्हणतात, "तोच लबाडातला 'महालबाड' आहे; जो म्हणतो, मी देव पहिला."

मी देव पहिला म्हणणाऱ्याच्या पुढं डोकं टेकायला रांगा लावणाऱ्यांमध्ये संत कधीच नसतात. तुकोबांनातर या विषयावर बोलण्याचा अधिकारच आहे. म्हणून ते 'मी देव पहिला म्हणणारा नुसता लबाड नाही, तर महालबाड' असल्याचं स्पष्टपणे सांगतात. आणि पुढे म्हणतात, "अशा महालबाड लोकांच्या उपदेशाने सामान्य माणसांची दुःखं कशी दूर होणार? यांची बंधने कधी संपणार?"

"ही महालबाड माणसे आपल्याच अहंकारात इतरांनाही स्वतःसारखी बुडवून टाकणार." हे अहंकारी असतात. ते आपलं तर नुकसान करतातच पण इतरांचंही नुकसान करून ठेवतात.

देवाच्या स्वरूपाचं आकलन सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. सामान्य माणूस देवाला दगडात पाहतो, तर असामान्य माणसे देवाला प्रत्येक सजीवाच्या जीवात पाहतात.

संतांची शिकवण सामान्य माणसांना तर आहेच. सोबतच ते 'महालबाड आणि महामुर्ख' असणाऱ्यांना सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण भक्तांनी त्यांना इतकं डोक्यावर घेतलेलं असतं की ते संतांच्या शब्दालासुद्धा किंमत देत नाहीत. म्हणून या अभंगात शेवटी तुकोबा म्हणतात, "हे महालबाड आणि महामुर्ख माणसे, यांच्यापेक्षा इतर श्रेष्ठ लोकांनी सांगितलेल्या खऱ्या गोष्टी मानतच नाहीत."

काही महत्वाची पुस्तके व त्यांचे लेखक


 🌷काही महत्वाची पुस्तके व त्यांचे लेखक🌷

🌷प्लेईंग टू विन ------ सायना नेहवाल

🌷हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला ------ डॉ. भालचंद्र नेमाडे

🌷टू द लास्ट बुलेट ------ विनिता कामटे/ देशमुख

🌷हाफ गर्लफ्रेंड------ चेतन भगत

🌷प्लेईंग इट माय वे ----- सचिन तेंडूलकर

🌷ड्रिम्स फ्रॉम माय फादर ------ बराक ओबामा

🌷इंडिया डिव्हायडेड ------ राजेन्द्र प्रसाद

🌷सनी डेज ------ सुनिल गावस्कर

🌷द टेस्ट ऑफ माय लाईफ ------ युवराज सिंग

🌷झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, ------ विश्‍वास पाटील

🌷छावा, लढत, युगंधर ------ शिवाजी सावंत

🌷वाट तुडविताना ------ उत्तम कांबळे

🌷अक्करमाशी ------ शरणकुमार लिबाळे

🌷एकच प्याला ------ राम गणेश गडकरी

🌷यमुना पर्यटन ------ बाबा पद्मजी

🌷पण लक्षात कोण घेतो ------ ह.ना.आपटे

🌷सुदाम्याचे पोहे ------ श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

🌷गिताई ------ विनोबा भावे

🌷भिजकी वही ------ अरूण कोल्हटकर

🌷नटसम्राट ------ वि.वा.शिरवाडकर

🌷धग ------ उध्दव शेळके

🌷 अमृतवेल ----- वि.स.खांडेकर

🌷एक झाड दोन पक्षी ------ विश्‍वास बेडेकर

🌷गोतावळा, झोंबी ------ आनंद यादव

🌷जेव्हा माणूस जागा होतो ------ गोदावरी परूळेकर

🌷बलूतं ------ दया पवार

🌷बारोमास ------ सदानंद देशमुख

🌷आहे मनोहर तरी ------ सुनिता देशपांडे

🌷शाळा ------ मिलींद बोकील

🌷चित्रलिपी ------ वसंत आबाजी डहाके

🌷गोलपीठा ------ नामदेव ढसाळ

🌷मी कसा घडलो ------ आर.आर.पाटील

🌷सखाराम बाईंडर ------ विजय तेंडूलकर

🌷ओडिशी ऑफ माय लाईफ ------ शिवराज पाटील

🌷मुकुंदराज ------ विवेक सिंधू

🌷दासबोध, मनाचे श्‍लोक ------ समर्थ रामदास

🌷बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर ------सावित्रीबाई फुले

🌷गीतारहस्य ------ लोकमान्य टिळक

🌷 तीन पैशाचा तमाशा ------ पु.ल. देशपांडे

🌷 सनद, जाहिरनामा ------ नारायण सुर्वे

🌷रामायण ------ वाल्मीकी

🌷मेघदूत ------ कालीदास

🌷पंचतंत्र ------ विष्णू शर्मा

🌷मालगुडी डेज ------- आर.के.नारायण

🌷महाभारत ------ महर्षी व्यास

🌷अर्थशास्त्र ------ कौटील्य

🌷अन् हॅपी इंडीया  ------ लाला लजपतराय

🌷माय कंट्री माय लाईफ ------ लालकृष्ण अडवाणी

🌷रोमान्सिंग विथ लाईफ ------ देव आनंद

🌷प्रकाशवाटा ------ प्रकाश आमटे

🌷दास कॅपीटल ------ कार्ल मार्क्स

🌷गाईड ------ आर.के.नारायण

🌷हॅम्लेट ------ शेक्सपिअर

🌷कर्‍हेचे पाणी ------ आचार्य अत्रे

🌷कृष्णाकाठ ------ यशवंतराव चव्हाण

🌷ज्योतीपुंज ------ नरेंद्र मोदी

🌷शतपत्रे ------ भाऊ महाजन

🌷प्रिझन डायरी ------ जयप्रकाश नारायण

🌷माझे स्वर माझे जिवन ------ प.रविशंकर

🌷निबंधमाला ------ विष्णुशास्त्री चिपळूणकर

🌷स्पीड पोस्ट ------ शोभा डे

🌷पितृऋण ------ सुधा मूर्ती

🌷माझे गाव माझे तीर्थ ------ अण्णा हजारे

🌷एक गाव एक पानवटा ------ बाबा आढाव

🌷मंझील से ज्यादा सफर ------ व्ही.पी.सिंग

🌷कोसबाडच्या टेकडीवरून ------ अनुताई वाघ

🌷गोल्डन गर्ल ------ पी.टी.उषा

🌷राघव वेळ ------ नामदेव कांबळे

🌷आकाशासी जुळले नाते ------ जयंत नारळीकर

🌷गोईन ------ राणी बंग