११ एप्रिल २०२२

म्हणी व अर्थ

मराठी व्याकरण व लेखन:
🌷म्हणी व अर्थ🌷
🌷कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?------
ज्याला रक्षण करायला ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करुन चोरी केल्यावर कोणालाच सांगता येत नाही

🌷कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच------
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो

🌷कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटाची तट्टानी------
अतिशय थोर माणूस व अति क्षुद्र माणूस यांची बरोबरी होत नाही

🌷कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं------
लाजलज्जा पार सोडून देणे

🌷कठीण समय येता कोण कामास येतो?------
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही

🌷कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच------
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही

🌷कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी------
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते

🌷कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी------
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही

🌷कर नाही त्याला डर कशाला?------
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही

🌷करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?------
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

🌷करणी कसायची, बोलणी मानभावची------
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर

🌷करायला गेले गणपती अन् झाला मारुती------
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे, नाहीतर त्यातून भलतेच घडते

________________________

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷काप गेले नि भोके राहिली------
वैभव गेले नि त्याच्या खुणा राहिल्या / श्रीमंतीचे दिवस गेले, फक्त आठवणी राहिल्या

🌷काम नाही कवडीचं अन् रिकामपण नाही घडीचं------
काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो

🌷कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी------
काम साधण्यापुरते गोड बोलणे

🌷काळ आला होता पण वेळ आली नव्हती------
नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात निभावले

🌷काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची------
सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे

🌷कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही------
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

🌷कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते------
पूर्वग्रहदूषिच व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात

🌷काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली------
सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही

🌷शब्दसमूहाबद्दल एक शब्द🌷
   
🌷फार कमी बोलणारा - अबोल

🌷 आधी जन्म घेतलेला - अग्रज

🌷 देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा -   अनुष्ठान

🌷 सीमा नाही असे - असीम

🌷 घरी पाहुणा म्हणून आलेला - अतिथी

🌷 धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

🌷 ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे - अनुपम

🌷थोडक्यात समाधान मानणारा - अल्पसंतुष्ट

🌷 विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य - अतिक्रमण

🌷पायात काहीही न घालणारा - अनवाणी

🌷 कधीही नाश न पावणारे - अविनाशी

🌷 देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म - अवतार

🌷 जाणून घेण्यास अशक्य असे - अज्ञेय

🌷 वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख - अग्रलेख

🌷अनेक चांगल्या गुणांनी युक्त - अष्टपैलू

तुका म्हणे /म्हणी व अर्थ

मराठी व्याकरण व लेखन:
🌷तुका म्हणे🌷

ओले मुळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्य सिद्धी ।। नव्हे ऐसे काही नाही अवघड । नाही कईवाड तोची वरी ।। दोरे चिरा कापे पडिलां कांचणी ।
अभ्यासे सेवनी विष पडे ।। तुका म्हने कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकांएकी ।।

🌷तुकाराम महाराज म्हणतात,जमिनीतील झाडाच्या मुळा अत्यंत नाजूक आणि ओलसर राहतात,परंतु त्याच मुळा कठीण अशा खडकाला भेदून जातात. अभ्यासा अंती,प्रयत्नाअंती कोणतेही कार्य यशस्वी होते,शेवटास जाते.

🌷या जगात कोणतेही काम अवघड असे नाहीच.छोटा दोर किंवा दोरा सतत घासून घासून दगडाला सुद्धा कापू शकतो, जर नेहमी रोज रोज थोडे थोडे करून विष जरी घेतले तर त्याचा सराव होऊन विष सुद्धा पचवण्याची ताकत निर्माण होते.

🌷आईच्या उदरात बाळास वाढण्यास जागा नसते परंतु हळूहळू ते बसण्यासाठी,वाढण्यासाठी जागा निर्माण करतेच. थोडक्यात या अभंगातून तुकारामांनी दैवावर विसंबून न राहता माणसाने प्रयत्नवादी बनले पाहिजे असा उपदेश केला आहे.

___________________

🌷म्हणी व अर्थ🌷
🌷करायला गेलो एक अन् झाले एक------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷करावे तसे भरावे------
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे

🌷करीन ती पूर्व दिशा------
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे

🌷करू गेले काय अन् उलटे झाले काय------
करायचे एक आणि झाले भलतेच

🌷कवडी कवडी माया जोडी------
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते

🌷कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड------
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते

🌷कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले------
करणे थोडे पण गवगवाच फार

🌷कसायाला गाय धार्जिणी------
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात

🌷का गं बाई उभी, घरात दोघीतिघी------
घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो

🌷काकडीची चोरी, फाशीची शिक्षा------
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी

🌷काखेत कळसा अन् गावाला वळसा------
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे

संत तुकोबांचा उपदेश

🌷संत तुकोबांचा उपदेश🌷

तो चि लटिक्यामाजी भला ।
म्हणे देव म्यां देखिला ।।१।।
ऐशियाच्या उपदेशें ।
भवबंधन कैसें नासे ?।
बुडवी आपणासरिसे ।
अभिमानें आणिकांस ।।ध्रु.।।
आणिक नाहीं जोडा ।
देव म्हणवितां या मूढा ।।२।।
आणिकांचे न मनी साचें ।
तुका म्हणे या श्रेष्ठांचें ।।३।।

🌷अर्थ व चिंतन🌷
देव ही काही पहायची वस्तू नाही. देव दिसतही नाही आणि दिसणारही नाही. देव हा विषय नंतरचा; पण देवत्व पाहता येते. रंजल्या-गांजल्यांची सेवा करणाऱ्यात देवत्व असते. देव दगडात नाही तर माणसात असतो. तुका सांगे मूढजना । देही देव का पाहणा? ।। देवाची व्याख्या समजून न घेता वाट्टेल तिथं डोकं टेकवणाऱ्या 'मूढ' म्हणजेच मूर्ख लोकांना तुकोबा 'देहात देव का पाहत नाहीत?' असा प्रश्न करून देवाचं मुख्य ठिकाण हे आपलं शरीर म्हणजेच माणूस असल्याचं  सांगतात.

प्रत्येक जीवात शिव आहे. म्हणून जात, धर्म, वर्ण, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन प्रत्येकाने प्रत्येक जीवात शिवाला पाहायला पाहिजे. म्हणजे एकमेकांविषयीच्या द्वेषाचे वातावरण निवळू शकेल.

ईश्वराचं स्वरूप तुकोबांइतके आणखी कुणाला नक्की सांगता येईल? म्हणून या अभंगात ते याविषयी अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडतात. त्यांना कुणीतरी 'मी देव पहिला' असं म्हणणारा आणि कुणीतरी 'मीच देव आहे' असं म्हणणाराही नक्कीच भेटला असणार. आजतर अशा लोकांचा प्रचंड भरणा पाहायला मिळतो.

अपप्रचाराला बळी पडणारी आपण आंधळी माणसं. पण संत डोळस असतात. ते नेमकं पाहत असतात. तुकोबा म्हणतात, "तोच लबाडातला 'महालबाड' आहे; जो म्हणतो, मी देव पहिला."

मी देव पहिला म्हणणाऱ्याच्या पुढं डोकं टेकायला रांगा लावणाऱ्यांमध्ये संत कधीच नसतात. तुकोबांनातर या विषयावर बोलण्याचा अधिकारच आहे. म्हणून ते 'मी देव पहिला म्हणणारा नुसता लबाड नाही, तर महालबाड' असल्याचं स्पष्टपणे सांगतात. आणि पुढे म्हणतात, "अशा महालबाड लोकांच्या उपदेशाने सामान्य माणसांची दुःखं कशी दूर होणार? यांची बंधने कधी संपणार?"

"ही महालबाड माणसे आपल्याच अहंकारात इतरांनाही स्वतःसारखी बुडवून टाकणार." हे अहंकारी असतात. ते आपलं तर नुकसान करतातच पण इतरांचंही नुकसान करून ठेवतात.

देवाच्या स्वरूपाचं आकलन सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. सामान्य माणूस देवाला दगडात पाहतो, तर असामान्य माणसे देवाला प्रत्येक सजीवाच्या जीवात पाहतात.

संतांची शिकवण सामान्य माणसांना तर आहेच. सोबतच ते 'महालबाड आणि महामुर्ख' असणाऱ्यांना सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण भक्तांनी त्यांना इतकं डोक्यावर घेतलेलं असतं की ते संतांच्या शब्दालासुद्धा किंमत देत नाहीत. म्हणून या अभंगात शेवटी तुकोबा म्हणतात, "हे महालबाड आणि महामुर्ख माणसे, यांच्यापेक्षा इतर श्रेष्ठ लोकांनी सांगितलेल्या खऱ्या गोष्टी मानतच नाहीत."

काही महत्वाची पुस्तके व त्यांचे लेखक


 🌷काही महत्वाची पुस्तके व त्यांचे लेखक🌷

🌷प्लेईंग टू विन ------ सायना नेहवाल

🌷हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला ------ डॉ. भालचंद्र नेमाडे

🌷टू द लास्ट बुलेट ------ विनिता कामटे/ देशमुख

🌷हाफ गर्लफ्रेंड------ चेतन भगत

🌷प्लेईंग इट माय वे ----- सचिन तेंडूलकर

🌷ड्रिम्स फ्रॉम माय फादर ------ बराक ओबामा

🌷इंडिया डिव्हायडेड ------ राजेन्द्र प्रसाद

🌷सनी डेज ------ सुनिल गावस्कर

🌷द टेस्ट ऑफ माय लाईफ ------ युवराज सिंग

🌷झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, ------ विश्‍वास पाटील

🌷छावा, लढत, युगंधर ------ शिवाजी सावंत

🌷वाट तुडविताना ------ उत्तम कांबळे

🌷अक्करमाशी ------ शरणकुमार लिबाळे

🌷एकच प्याला ------ राम गणेश गडकरी

🌷यमुना पर्यटन ------ बाबा पद्मजी

🌷पण लक्षात कोण घेतो ------ ह.ना.आपटे

🌷सुदाम्याचे पोहे ------ श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

🌷गिताई ------ विनोबा भावे

🌷भिजकी वही ------ अरूण कोल्हटकर

🌷नटसम्राट ------ वि.वा.शिरवाडकर

🌷धग ------ उध्दव शेळके

🌷 अमृतवेल ----- वि.स.खांडेकर

🌷एक झाड दोन पक्षी ------ विश्‍वास बेडेकर

🌷गोतावळा, झोंबी ------ आनंद यादव

🌷जेव्हा माणूस जागा होतो ------ गोदावरी परूळेकर

🌷बलूतं ------ दया पवार

🌷बारोमास ------ सदानंद देशमुख

🌷आहे मनोहर तरी ------ सुनिता देशपांडे

🌷शाळा ------ मिलींद बोकील

🌷चित्रलिपी ------ वसंत आबाजी डहाके

🌷गोलपीठा ------ नामदेव ढसाळ

🌷मी कसा घडलो ------ आर.आर.पाटील

🌷सखाराम बाईंडर ------ विजय तेंडूलकर

🌷ओडिशी ऑफ माय लाईफ ------ शिवराज पाटील

🌷मुकुंदराज ------ विवेक सिंधू

🌷दासबोध, मनाचे श्‍लोक ------ समर्थ रामदास

🌷बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर ------सावित्रीबाई फुले

🌷गीतारहस्य ------ लोकमान्य टिळक

🌷 तीन पैशाचा तमाशा ------ पु.ल. देशपांडे

🌷 सनद, जाहिरनामा ------ नारायण सुर्वे

🌷रामायण ------ वाल्मीकी

🌷मेघदूत ------ कालीदास

🌷पंचतंत्र ------ विष्णू शर्मा

🌷मालगुडी डेज ------- आर.के.नारायण

🌷महाभारत ------ महर्षी व्यास

🌷अर्थशास्त्र ------ कौटील्य

🌷अन् हॅपी इंडीया  ------ लाला लजपतराय

🌷माय कंट्री माय लाईफ ------ लालकृष्ण अडवाणी

🌷रोमान्सिंग विथ लाईफ ------ देव आनंद

🌷प्रकाशवाटा ------ प्रकाश आमटे

🌷दास कॅपीटल ------ कार्ल मार्क्स

🌷गाईड ------ आर.के.नारायण

🌷हॅम्लेट ------ शेक्सपिअर

🌷कर्‍हेचे पाणी ------ आचार्य अत्रे

🌷कृष्णाकाठ ------ यशवंतराव चव्हाण

🌷ज्योतीपुंज ------ नरेंद्र मोदी

🌷शतपत्रे ------ भाऊ महाजन

🌷प्रिझन डायरी ------ जयप्रकाश नारायण

🌷माझे स्वर माझे जिवन ------ प.रविशंकर

🌷निबंधमाला ------ विष्णुशास्त्री चिपळूणकर

🌷स्पीड पोस्ट ------ शोभा डे

🌷पितृऋण ------ सुधा मूर्ती

🌷माझे गाव माझे तीर्थ ------ अण्णा हजारे

🌷एक गाव एक पानवटा ------ बाबा आढाव

🌷मंझील से ज्यादा सफर ------ व्ही.पी.सिंग

🌷कोसबाडच्या टेकडीवरून ------ अनुताई वाघ

🌷गोल्डन गर्ल ------ पी.टी.उषा

🌷राघव वेळ ------ नामदेव कांबळे

🌷आकाशासी जुळले नाते ------ जयंत नारळीकर

🌷गोईन ------ राणी बंग

मराठी व्याकरण व लेखन ,काही महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक

मराठी व्याकरण व लेखन:
:
🌷  स्वरांच्या र्‍हस्व व दीर्घ उच्चारानुसार       शब्दांचे वेगळे अर्थ 🌷

🌷 पाणि --हात             पाणी --जल

🌷 दिन --दिवस             दीन --गरीब

🌷 शिर --डोके              शीर  --रक्त वाहिनी

🌷 पिक --कोकीळ         पीक --धान्य

🌷 सुत -- मुलगा              सूत --धागा

🌷 सुर --देव                   सूर --आवाज

🌷 सलिल -पाणी             सलील -लीलेने

🌷चाटु - संतोष देणारे       चाटू -लाकडी पळी

🌷 मिलन --भेट               मीलन --मिटणे

_____________________________________

🌷काही महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक🌷
 

🌷 ययाती------ वि. स. खांडेकर
🌷 वळीव ------शंकर पाटील
🌷 एक होता कार्वर------ वीणा गवाणकर
🌷 शिक्षण------ जे. कृष्णमूर्ती
🌷 अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम------ शंकरराव खरात
🌷 शिवाजी कोण होता------गोविंद पानसरे
🌷 बनगरवाडी------ व्यंकटेश माडगुळकर
🌷 तो मी नव्हेच------ प्र. के. अत्रे.
🌷 आय डेअर------ किरण बेदी
🌷 तिमिरातुन तेजाकड़े------ डॉ. नरेंद्र दाभोलकर
🌷 मृत्युंजय------ शिवाजी सावंत
🌷 फकिरा ------अण्णाभाऊ साठे
🌷 अल्बर्ट एलिस------ अंजली जोशी
🌷 प्रश्न मनाचे------डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर
🌷 समता संगर------ डॉ. नरेंद्र दाभोलकर
🌷 निरामय कामजीवन------डॉ. विठ्ठल प्रभू
🌷 ठरलं डोळस व्हायचं------ डॉ. नरेंद्र दाभोलकर
🌷 मी जेव्हा जात चोरली------ बाबुराव बागुल
🌷 गोपाळ गणेश आगरकर------ ग. प्र. प्रधान
🌷कुमारांचे कर्मवीर ------डॉ. द. ता. भोसले
🌷 सत्याचे प्रयोग------ मो. क. गांधी
🌷 अग्निपंख------ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
🌷 लज्जा------ तसलीमा नसरीन
🌷 रणांगण------ विश्राम बेडेकर
🌷 बटाट्याची चाळ------ पु.ल.देशपांडे
🌷 श्यामची आई------ साने गुरुजी
🌷 माझे विद्यापीठ ( कविता )------ नारायण सुर्वे
🌷 बि-हाड------ अशोक पवार
🌷 व्यक्ति आणि वल्ली------पु.ल.देशपांडे
🌷 माणदेशी माणसं------ व्यंकटेश माडगुळकर
🌷 उचल्या------ लक्ष्मण गायकवाड
🌷नटसम्राट------ वि.वा.शिरवाडकर
🌷 क्रोंचवध------ वि.स.खांडेकर
🌷 झोंबी -------आनंद यादव
🌷 इल्लम------ शंकर पाटील
🌷 ऊन------ शंकर पाटील
🌷 नाझी भस्मासुराचा उदयास्त------ वि.ग. कानिटकर
🌷 बाबा आमटे------ ग.भ.बापट
🌷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर------ शंकरराव खरात
🌷 बहाद्दुर थापा------ संतोष पवार
🌷 सेकंड सेक्स------ सिमोन
🌷 आई------ मोकझिम गार्की
🌷 स्वामी------ रणजीत देसाई
🌷 वपुर्झा ( भाग १-२ )------ व. पु. काळे
🌷 युंगंधर------ शिवाजी सावंत
🌷 छावा------ शिवाजी सावंत
🌷 श्रीमान योगी------ रणजीत देसाई
🌷 जागर खंड – १------ प्रा. शिवाजीराव भोसले
🌷 जागर खंड – २------ प्रा. शिवाजीराव भोसले
🌷 वावटळ------ व्यंकटेश माडगुळकर
🌷 ग्रेटभेट------ निखिल वागळे
🌷 गोष्टी माणसांच्या------ सुधा मूर्ती
🌷 उपेक्षितांचे अंतरंग------ श्रीपाद महादेव माटे
🌷 माणुसकीचा गहिवर------ श्रीपाद महादेव माटे
🌷 यश तुमच्या हातात------ शिव खेरा
🌷 आमचा बाप अन आम्ही------ डॉ. नरेंद्र जाधव
🌷 कोसला------ भालचंद्र नेमाडे
🌷 गांधीनंतरचा भारत------ रामचंद्र गुहा
🌷 महानायक------ विश्वास पाटील
🌷 आहे आणि नाही ------वि. वा. शिरवाडकर
🌷 ग्रामगीता------ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
🌷 कोल्हाटयाचं पोरं------ किशोर काळॆ
🌷 साता उत्तराची कहानी------- ग. प्र. प्रधान
🌷 तोत्तोचान ------तेत्सुको कुरोयानागी
🌷 समग्र महात्मा फुले------ राज्य सरकार
🌷 ओबामा------ संजय आवटे
🌷 एकेक पान गळावया------ गौरी देशपाडे
🌷आई समजुन घेताना------ उत्तम कांबळे
🌷छत्रपती शाहू महाराज ------- जयसिंगराव पवार                                     
🌷 बुद्ध आणि त्याचा धम्म------ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विरुद्ध अर्थी शब्द

"मराठी व्याकरण".:
🌷विरुद्ध अर्थी शब्द 🌷

🌷एकमत     x    दुमत
🌷उदय        x    अस्त
🌷आशीर्वाद  x    शाप
🌷अधिक      x    उणे
🌷धूर्त           x    भोळा
🌷थोर          x     सान
🌷अनुयायी   x     पुढारी
🌷दोषी         x     निर्दोषी
🌷अभिमानी  x     निराभिमानी
🌷देशभक्त     x     देशद्रोही
🌷कृत्रिम       x     नैसर्गिक
🌷सकर्मक    x     अकर्मक  
🌷लोभी       x      निर्लोभी
🌷लाजरा     x      धीट
🌷हिंसा        x     अहिंसा
🌷राजमार्ग    x    आडमार्ग
🌷श्वास         x     नि:श्वास
🌷सुर           x     असुर
🌷साक्षर       x     निरक्षर
🌷सुरस        x     निरस
🌷पूर्णांक      x    अपूर्णांक
🌷नि:शस्त्र    x     सशस्त्र
🌷सुजाण     x     अजाण
🌷गंभीर       x     अवखळ
🌷सुलक्षणी  x     कुलक्षणी
🌷चोर         x     साव
🌷सुज्ञ         x     अज्ञ
🌷सुकाळ    x     दुष्काळ
🌷सगुण      x      निर्गुण
🌷चपळ      x      मंद
🌷सुबोध     x      दुर्बोध
🌷दुष्ट         x      सुष्ट
🌷स्वातंत्र्य   x     पारतंत्र्य
🌷साकार     x     निराकार
🌷स्वर्ग        x      नरक
🌷दिन         x      रजनी
🌷अध्ययन   x     अध्यापन
🌷स्वकीय    x      परकीय
🌷मनोरंजक  x     कंटाळवाणे
🌷सौंदर्य       x     कुरूपता
🌷खंडन       x     मंडन
🌷उघड        x     गुप्त
🌷अवखळ   x     गंभीर
🌷उथळ       x     खोल
🌷रणशूर      x     रणभिरू
🌷माजी        x     आजी
🌷शाप         x      वर
🌷अवनत     x      उन्नत
🌷तीव्र          x      सौम्य
🌷अवधान     x     अनावधान
🌷प्रसन्न         x     अप्रसन्न
🌷मर्द            x     नामर्द
🌷शंका          x     खात्री
🌷कृपा           x    अवकृपा
🌷गमन           x    आगमन
🌷कल्याण      x     अकल्याण
🌷ज्ञात           x     अज्ञात
🌷सत्कर्म       x      दुष्कर्म
🌷खरे           x      खोटे
🌷भरती        x     ओहोटी
🌷सुसंबद्ध     x     असंबद्ध
🌷हर्ष            x     खेद
🌷विधायक    x     विघातक
🌷हानी          x     लाभ
🌷संघटन       x     विघटन
🌷सुंदर          x     कुरूप
🌷सार्थक       x     निरर्थक
🌷स्वस्थ        x     अस्वस्थ
🌷सुसंगत      x      विसंगत
🌷तप्त          x      थंड
🌷धर्म           x      अधर्म
🌷सनाथ       x      अनाथ
🌷सशक्त       x      अशक्त
🌷कीर्ती        x      अपकीर्ती
🌷ऐच्छिक     x     अनैच्छिक
🌷गुण          x      अवगुण
🌷अनुकूल    x      प्रतिकूल
🌷उत्तीर्ण      x      अनुत्तीर्ण
🌷यश          x      अपयश
🌷आरंभ      x      अखेर
🌷रसिक      x      अरसिक
🌷उंच          x      सखल
🌷आवक     x      जावक
🌷कमाल     x      किमान
🌷उच्च        x      नीच
🌷आस्तिक  x     नास्तिक
🌷अल्पायुषी x    दीर्घायुषी
🌷अर्वाचीन  x     प्राचीन
🌷उगवती    x     मावळती
🌷अपराधी  x     निरपराधी
🌷उपद्रवी   x      निरुपद्रवी
🌷कृतज्ञ     x     कृतघ्न
🌷खरेदी     x     विक्री
🌷उपयोगी  x     निरुपयोगी
🌷उत्कर्ष    x     अपकर्ष
🌷उचित    x     अनुचित
🌷जहाल   x     मवाळ
🌷जमा     x     खर्च
🌷चढ      x     उतार
🌷कर्णमधुर x  कर्णकर्कश
🌷गोड      x    कडू
🌷कच्चा   x    पक्का
🌷चंचल   x    स्थिर
🌷चढाई   x    माघार
🌷जलद   x   सावकाश
🌷तीक्ष्ण   x   बोथट
🌷दृश्य     x   अदृश्य
🌷समता  x    विषमता
🌷सफल  x    निष्फल
🌷शोक   x    आनंद
🌷पौर्वात्य x   पाश्चिमात्य
🌷विधवा  x   सधवा
🌷अज्ञान  x   सज्ञान
🌷पोक्त    x   अल्लड
🌷लायक  x   नालायक
🌷सजातीय x विजातीय
🌷सजीव    x  निर्जीव
🌷सगुण     x  निर्गुण
🌷साक्षर    x   निरक्षर
🌷प्रकट     x   अप्रकट
🌷नफा      x   तोटा
🌷सुशिक्षित x  अशिक्षित
🌷सुलभ     x   दुर्लभ
🌷सदाचरण x  दुराचरण
🌷सह्य        x  असह्य
🌷सधन      x   निर्धन
🌷बंडखोर   x  शांत
🌷संकुचित  x  व्यापक
🌷सुधारक   x  सनातनी
🌷सुदिन      x  दुर्दिन
🌷ऋणको    x धनको
🌷क्षणभंगुर   x चिरकालीन
🌷अबोल      x वाचाळ
🌷आसक्त     x अनासक्त
🌷उत्तर        x  प्रत्युत्तर
🌷उपकार    x  अपकार
🌷घाऊक    x  किरकोळ
🌷अवजड   x  हलके
🌷उदार       x अनुदार
🌷उतरण     x  चढण
🌷तारक      x  मारक
🌷दयाळू     x  निर्दय
🌷नाशवंत   x अविनाशी
🌷धिटाई     x  भित्रेपणा
🌷पराभव   x  विजय
🌷राव         x रंक
🌷रेलचेल    x  टंचाई
🌷सरळ      x  वक्र
🌷सधन      x  निर्धन
🌷वियोग     x  संयोग
🌷राकट      x नाजुक
🌷लवचिक   x ताठर
🌷वैयक्तिक   x सामुदायिक
🌷सुकीर्ती     x  दुष्कीर्ती
🌷रुचकर      x  बेचव
🌷प्रामाणिक  x अप्रामाणिक
🌷विवेकी      x  अविवेकी

मराठी साहीत्यातील महत्वाच्या कादंबऱ्या ,जोतीराव गोविंदराव फुले

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
🌷मराठी साहीत्यातील महत्वाच्या कादंबऱ्या🌷

🌷ययाती------ वि.स.खांडेकर
🌷गारंबीचा बापू------श्री ना पेंडसे
🌷रथचक्र------श्री ना पेंडसे
🌷शितू------ गो.नी.दांडेकर
🌷बनगरवाडी------ व्यंकटेश मांडगूळकर
🌷फकिरा------अण्णाभाऊ साठे
🌷स्वांमी ------रणजित देसाई
🌷श्रीमान योगी------रणजित देसाई
🌷कोसला------भालचंद्र नेमाडे
🌷 कोंडूरा------शिवाजीराव सावंत
🌷झुंज------ना.स.इनामदार
🌷माहीमची खाडी------मधु
मंगेश कर्णिक
🌷गोतावळा------आनंद य़ादव
🌷पाचोळा------रा.रं.बोराडे
🌷मुंबई दिनांक------अरुण साधु
🌷 सिंहासन------अरुण साधु
🌷 गांधारी------ना.धो.महानोर
🌷थँक यू मिस्टर ग्लाड------अनिल बर्वे
🌷 वस्ती------ महादेव मोरे
🌷पवनाकाठचा धोंडी ------गो.नी.दांडेकर
🌷 सावित्री------ पु.शी.रेगे
🌷बॅरिस्टर------------ जयवंत दळवी
🌷श्यामची आई------सानेगुरुजी
🌷 आकाशाची फळे------ग.दि.मांडगूळकर
🌷काळेपाणी------वि.दा.सावरकर
🌷मृण्मयी-------गो.नी.दांडेकर
🌷पडघवली------गो.नी.दांडेकर
🌷अमृतवेल------वि.स.खांडेकर.

__________________________

जोतीराव गोविंदराव फुले
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी: सावित्रीबाई फुले
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली.
आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.
  
बालपण आणि शिक्षण
जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.
१८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
सामाजिक कार्य
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

       “ विद्येविना मती गेली।
         मतिविना नीती गेली।
         नीतिविना गती गेली।
         गतिविना वित्त गेले।
         वित्ताविना शूद्र खचले।
         इतके अनर्थ एका
          अविद्येने केले।।”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत.

समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते.
त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

        साहित्य आणि लेखन
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले.
त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते

*महामानव क्रांतीबा ज्योतिबा फुले याना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम*💐💐💐💐

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...