Thursday, 7 April 2022

सुर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न

🪐 सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
👉 शक्र

🪐 जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
👉 पथ्वी

🪐 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
👉 पथ्वी

🪐 पथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 पथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिवलन

🪐 पथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिभ्रमण

🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
👉 फोबोज आणि डीमोज

🪐 कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 मगळ

🪐 गरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
👉 1397 पटीने

🪐 कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
👉 टायटन

🪐 सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
👉 शनि

🪐 यरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 परजापती व वासव

🪐 गरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 बहस्पति

🪐 नपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 वरून व हर्षल

🪐 नपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
👉 41 वर्ष

🪐 सर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
👉 पथ्वी      - 01
👉 मगळ     - 02
👉 गरु        - 79
👉 शनि.     - 82
👉 यरेनस   - 27
👉 नपच्यून - 14

🪐 सर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
👉 बध व शुक्र

🪐  सर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
👉 आठ

🪐 सर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 14 कोटी 96 लाख Km

🪐 चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 3 लाख 84 हजार Km

🪐 सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
👉 8 min 20 Sec

🪐 चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
👉 1.3 सेकंद

🪐 सर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
👉 6000⁰ C

🪐 चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
👉 शक्र

🪐 चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
👉 50 मिनिटे

🪐 गरहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?
👉 सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

🪐 सर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?
👉 बध

🪐 पथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
👉 59 %

🪐 पथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

🪐 पथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

🪐 पथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
👉 धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

🪐 पथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
👉 एरॅटोस्थेनिस

🪐 यरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 विल्यम हर्षल

🪐 नपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 जॉन गेल

🪐 सर्य माले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
👉 पार्सेक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर--नाशिक💐✅

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
उत्तर----सातपुडा💐✅

महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर--यवतमाळ💐✅

महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
उत्तर---national highway 6 💐✅

स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
उत्तर--नांदेड💐✅

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅

महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
उत्तर--अमरावती💐✅

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर--जुन्नर💐✅

पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
उत्तर---भीमा💐✅

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅

महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---
>>>36💐✅

महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
उत्तर ---- गोदावरी💐✅

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर---गोदावरी💐✅

महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
उत्तर---अहमदनगर💐✅

संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर---अमरावती💐✅

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर
--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
उत्तर---प्रीतिसंगम💐✅

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
उत्तर--कोयना प्रकल्प💐✅

महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅

महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? 
उत्तर--औरंगाबाद💐✅

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर---बुलढाणा💐✅

__________________________________

जगाविषयी सामान्य ज्ञान


🔹जगाविषयी सामान्य ज्ञान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.

💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.

💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.

💠 भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.

💠 श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.

💠 नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.

💠 जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.

💠 येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.

💠जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

💠 अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.

💠 फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.

💠 व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.

💠बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.

💠 इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.

💠लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.

💠 नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.

💠 चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.

💠 स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.

💠 केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.

💠 जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.

💠रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.

💠 नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.

💠 चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.

💠 स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.

💠 दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.

💠टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.

💠 नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.

💠तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.

💠 हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.

💠 अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.

💠अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.

💠 लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.

💠 दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.

💠मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.

💠 दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.

💠 फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)

💠 बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.

💠 शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.

💠 फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.

💠 ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.

💠 बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.

💠 मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.

💠 पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.

💠 लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.

💠चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.

💠बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.

💠 चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.

💠 कॅनडा सर्वात लांब रस्ते.

💠 जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.

💠 चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.

💠 कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.

💠 ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.

💠 भारत चहा उत्पादनात प्रथम.

💠 बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.

💠 घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.

💠 अमेरिका मका उत्पादनात प्रथम.

💠सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.

💠क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.

💠 चिली तांबे उत्पादनात प्रथम.

💠 मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.

💠 कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.

💠अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.

💠 कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.

💠 अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम

💠 ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.

💠अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.

💠 इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.

💠चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.

💠इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.

💠जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.

💠ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.

💠 ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.

💠दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.

💠इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.

💠 रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा

💠 अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट

💠चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली

💠 भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस

💠 व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.

💠 ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.

💠 मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.

💠 हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.

💠 केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.

💠ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.

💠 मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.

💠अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.

💠नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.

💠आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.

💠 रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.

💠 थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.

💠मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.

💠 जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.

💠 शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.

💠 इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.

💠जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.

💠 इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.

💠 भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ
जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आकाशगंगा


🔹आकाशगंगा :

निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला ‘आकाशगंगा’ म्हणतात. आकाशगंगेला ‘दूधगंगा’असेही म्हणतात. स्वर्गावर चढण्याची शिडी, वामनावतारी विष्णू तिसरे पाऊल टाकीत असता ते एका अंड्याला लागले व ते फुटून आकाशगंगेचा प्रवाह निघाला इ. कल्पना प्रचलित आहेत. स्वर्गातील अमरावतीला आकाशगंगेने वेढलेले आहे, असाही उल्लेख भागवतात आढळतो.

आकाशगंगेचा पट्टा उत्तर ध्रुवाच्या ३०० जवळून जातो. याची जास्तीत जास्त रुंदी अंदाजे ४५० तर कमीत कमी रुंदी अंदाजे ५० आहे. साधारणपणे खगोलाच्या उत्तर गोलार्धात हा पट्टा शृंगाश्व (मोनोसेरॉस), मिथुन (जेमिनी), वृषभ (टॉरस), सारथी (ऑरिगा), ययाती (पर्सियस), शर्मिष्ठा (कॅसिओपिया), सरठ (लॅसर्टा), हंस (सिग्नस), जंबुक (व्हल्पेक्युला), शर (सॅजिट्टा) व गरूड (अ‍ॅक्विला) या तारकासमूहांतून जातो आणि दक्षिण गोलार्धात धनू (सॅजिटॅरियस), रेखाटणी (नॉर्मा), पीठ (ऑरा), नरतुरंग (सेंटॉरस), त्रिशंकू (क्रक्स), नौका (कॅरिना) व नौकाशीर्ष (व्हेला) या तारकासमूहांतून जातो. आर्द्रा व ब्रह्महृदय हे मोठे तारे आकाशगंगेच्या काठावर असून हंस, श्रवण, मित्र व मित्रक हे मोठे तारे व त्रिशंकू हा तारकासमूह आकाशगंगेच्या पट्ट्यात दिसतात.

आकाशगंगा धनू व वृषभ या समूहांत क्रातिवृत्ताला (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीच्या मार्गाला) ६०० त छेदते आणि खगोलीय विषुववृत्ताला गरूड आणि शृंगाश्व या समूहांत सु. ६२० त छेदते. आकाशगंगेच्या दक्षिण भागात जास्त तारे आहेत. हंस या समूहापाशी ती दुभंगते. शौरी, सारंगी व भुजंगधारी यांना स्पर्श करून उत्तर फाटा जातो व दक्षिण फाटा जंबुक व श्रवण यांच्यामधून जातो. पुन्हा दोन्ही फाटे एकत्र होतात.

पृथ्वी ही सूर्यकुलाचा एक घटक आहे. अनेक ग्रह-उपग्रह मिळून सूर्यकुल बनलेले आहे. सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा समूह म्हणजेच आकाशगंगा होय. असे अनेक समूह अवकाशात आहेत. त्यांना ⇨दीर्घिका म्हणतात आणि सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आपण आकाशगंगेत असल्याने आपल्याभोवती जेवढे म्हणून लहानमोठे तारे नुसत्या डोळ्यांनी रात्री दिसतात, ते सर्व आकाशगंगेतच आहेत. परंतु पट्टा ज्या ज्या ठिकाणी दिसतो त्या त्या बाजूस ताऱ्यांची दाटी असल्याने पट्टा हे तिचे आपल्या दृष्टीने दृश्य स्वरूप आहे. नुसत्या डोळ्यांनी सु. ५,००० तारे दिसू शकतात. परंतु त्यांच्याशिवाय दुर्बिणीतून दिसणारे व न दिसणारे, सूर्यापेक्षा लहान तसेच सूर्यापेक्षा अतिशय मोठे, तेजस्वी असे कोट्यवधी तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. आकाशगंगेत सु. १०० अब्ज तारे असावेत असे शास्त्रज्ञ म्हणतात. या ताऱ्यांखेरीज आकाशगंगेत अभ्रिका, रूपविकारी तारे, तारकायुग्मे, तारकागुच्छ वगैरे निरनिराळ्या प्रकारचे घटक आहेत. आंतरतारकीय द्रव्य, उष्ण वायू, धूलिकण वगैरे इतस्ततः पसरलेले आहेत, ते वेगळेच. आकाशगंगेच्या पट्ट्यात या सर्वांची फार दाटी असल्याने त्या सर्वाच्या प्रकाशामुळे एक दुधाळ रंगाचा पट्टा दिसतो. मोठ्या दुर्बिणीतून यातील ताऱ्यांचा अलगपणा दृष्टोत्पत्तीस येतो. आकाशगंगेतील ११८ गोलाकार तारकागुच्छांपैकी ३० धनू राशीच्या बाजूला म्हणजे गंगेच्या मध्याकडे आहेत आणि तिकडेच पट्टा जास्त दाट दिसतो.

गॅलिलीओ यांनी १६१० मध्ये प्रथम दुर्बिणीतून आकाशगंगेचे निरीक्षण केले व त्यावरून आकाशगंगेचा दुधाळ रंग तिच्यातील जवळजवळ असलेल्या असंख्य ताऱ्यांमुळे दिसतो असे त्यांना आढळून आले. विल्यम हर्शेल यांनी १८ व्या शतकाच्या शेवटी व त्यानंतर त्यांचे पुत्र जॉन हर्शेल यांनी १८३४-३८ या काळात आकाशगंगेच्या विविध भागांतील ताऱ्यांच्या संख्यांची नोंद केली. १९००-२० या काळात कापटाइन व त्यांच्या सहकाऱ्यांनी छायाचित्रण करणाऱ्या दुर्बिणीच्या साहाय्याने काही विशिष्ठ भागातील ताऱ्यांच्या संख्यांची नोंद केली. त्यानंतर १९१६-१९ या काळात शॅप्ली यांनी आकाशगंगेच्या मध्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या अनेक गोलाकार तारकागुच्छांचे अंतर काढले व आकाशगंगेचे स्वरूप अधिक स्पष्टपणे मांडले. आकाशगंगेच्या बाहेरून तिच्या पातळीतील एखाद्या बिंदूतून तिच्या कडेच्या बाजूने पाहिल्यास ती मध्ये जाड व कडेला चपटी अशी साधारणपणे बहिर्गोल भिंगाकार दिसेल. यातील सर्वांत तेजस्वी भागात अति उष्ण व अति-तेजस्वी तारे आणि आंतरतारकीय वायूंचे मेघ व धूळ असून हा भाग अतिशय चपट्या तबकडीसारखा आहे. याच भागात साधारणपणे मध्यापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर सूर्यकुल आहे. या तबडकीच्या भोवती बऱ्याच कमी घनतेचे तेजोमंडल आहे. आकाशगंगेचा व्यास सु. ३०,०००पार्सेक (एकपार्सेक = ३·२६ प्रकाशवर्ष) इतका प्रचंड असून मध्यभागी जाडी सु. ५०००पार्सेक आहे. सूर्य तिच्या मध्यापासून सु. ८,३०००पार्सेक दूर असून या ठिकाणी जाडी सु. १,०००पार्सेक आहे.


आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या व मध्यातून जाणाऱ्या प्रतलास ‘गांगीय प

्रतल’म्हणतात. या प्रतलाच्या अगदी जवळ उत्तर बाजूस फक्त ५० प्रकाशवर्षे (सु. २५ पार्सेक) अंतरावर सूर्य आहे. सूर्यकुलाच्या दृष्टीने आकाशगंगेचा मध्य पूर्वाषाढा व उत्तराषाढा या नक्षत्रांच्या दिशेला आहे व सूर्यकुल जवळजवळ गांगेय प्रतलातच आहे.

आकाशगंगेतील घटकांचा स्थाननिर्देश करताना काही निर्देशक लागतात. भोग आणि शर हे क्रांतिवृत्तास धरून किंवा विषुवांश आणि क्रांती हे विषुववृत्ताला धरून किंवा दिगंश आणि उन्नतांश हे क्षितिजाला धरून सहनिर्देशक मानले जातात [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. तशी गांगेय निर्देशकांचीही एक सहनिर्देशक पद्धती वापरण्यात येते. गांगेय प्रतल हे ज्या ठिकाणी खगोलास छेदील ते गांगेय विषुववृत्त होय. या विषुववृत्त-प्रतलाला गांगेय मध्येपासून काढलेल्या लंब रेषेत दोन गांगेय ध्रुव असतात. उत्तर गांगेय ध्रुव अरुंधती केश या समूहात (होरा १२ ता. ४० मि.;क्रांती +२८०) व दक्षिण गांगेव ध्रुव शिल्पागार (स्कल्प्टर) या समूहात (होरा ० ता. ४० मि.; क्रांती -२८० ) असतो. विशिष्ट ताऱ्यापासून गांगेय विषुववृत्तावर टाकलेले बृहद्‍वृत्तीय लंबांतर म्हणजे गांगेय शर आणि गांगेय विषुववृत्त व खगोलीय विषुववृत्त ज्या ठिकाणी ६२० कोन करून छेदतात त्या बिंदूपासून (होरा १८ ता. ४० मि.) विषुवांश ज्या बाजूस मोजतात, त्याच बाजूकडे गांगेय विषुववृत्तावर मोजलेले अंतर म्हणजे गांगेय भोग, असे सहनिर्देशक पूर्वी मोजीत. परंतु आता आंतरराष्ट्रीय ठरावानुसार गांगेय विषुवांश आकाशगंगेच्या केंद्रदिशेपासून मोजतात.

आकाशगंगेसारखेच स्वरूप असलेल्या आपल्या जवळपास असलेल्या इतर दीर्घिकांशी तुलना करता आकाशगंगा ही एक सर्पिल (मळसूत्राकार) प्रकारची दीर्घिका आहे असे दिसते. ह्या बाह्य दीर्घिकांच्या चक्रभुजांत उष्ण व दीप्तिमान तारे तसेच वायुमेघ आणि धूळ आढळते व अशाच प्रकारची लक्षणे आकाशगंगेतही आढळतात. आकाशगंगेच्या मध्यातून काढलेल्या लंब अक्षाभोवतो ती फिरत आहे. परंतु इतर दीर्घिकांप्रमाणे ती अपसव्य (घड्याळातील काट्याच्या हालचालीच्या विरुद्ध) दिशेने फिरत नसून सव्य दिशेने तिचे परिभ्रमण होते. एखाद्या भरीव चाकाप्रमाणे हे परिभ्रमण एकसंधी नसून त्याचा वेग निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा आहे. ज्या ठिकाणी सूर्य आहे त्या ठिकाणी वेग दर सेकंदास २५० किमी. असून सूर्य हंसपुंजाकडे जात आहे असे दिसते, तर जवळच्या घटकांशी तुलना करता तो वेग दर सेकंदास २० किमी. असून या गतीचा रोख शौरीपुंजाकडे आहे असे दिसते. दर सेकंदास २५० किमी.या वेगाने सूर्याला आकाशगंगेची एक फेरी करावयास सु. २५ कोटी वर्षे लागतात. आकाशगंगेच्या तीन चक्रभुजांसंबंधी १९५१ मध्ये मॉर्गन व त्यांच्या सहाध्यायांनी महत्त्वाचे वेध घेतले. त्यानंतर व्हान डी हूल्स्ट, म्यूलर, ऊर्ट, कार इ. शास्त्रज्ञांनी आकाशगंगेच्या चक्रभुजांतील उदासीन (निर्विद्युत्) हायड्रोजनाच्या २१ सेंमी. तरंगलांबीच्या रेडिओ-कंप्रता (दर सेकंदास होणारी कंपनसंख्या) उत्सर्जनांचे निरीक्षण करून आकाशगंगेच्या सर्पिल स्वरूपाचा सिद्धांत अधिक बळकट केला. या रेडिओ निरीक्षणांच्या आधारे आकाशगंगेच्या चक्रभुजांचा एक नकाशाही तयार करण्यात आलेला आहे. या सर्व पुराव्यावरून आकाशगंगा ही हबल यांच्या वर्गीकरणानुसार Sb या प्रकारची सर्पिल दीर्घिका आहे असे दिसून येते [→ दीर्घिका].


अलीकडील मापनांनुसार आकाशगंगेतील द्रव्यांचे वस्तुमान ३×१०४४ ग्रॅ. म्हणजे सूर्याच्या१६ × १०१० पट आहे आणि आंतरतारकीय द्रव्य व इतर घटकांसह तिची सरासरी घनता दर घ.सेंमी. ला ७×१०-२४ ग्रॅ. आहे. आकाशगंगेसारखेच स्वरूप असलेली दुसरी एक दीर्घिका एम ३१ (होरा ० ता. ४० मि.; क्रांती +४१०) ही देवयानी (अँड्रोमेडा) समूहात अंधाऱ्या रात्री निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकते.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...