Tuesday, 5 April 2022

महत्त्वाची माहिती

◾️ विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ

◾️ शहर   -  मुंबई

◾️स्थापना - 18 जुलै 1857

◾️  विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◾️शहर - नागपूर

◾️स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

◾️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◾️शहर - गडचिरोली

◾️ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

◾️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◾️शहर - मुंबई

◾️स्थापना  - 1916

◾️  विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◾️ शहर - पुणे

◾️स्थापना - 1949

◾️  विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◾️ शहर - औरंगाबाद

◾️स्थापना - 23 ऑगस्ट 1958

◾️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◾️ शहर - कोल्हापूर

◾️ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

◾️  विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◾️शहर - अमरावती

◾️स्थापना - 1 मे 1983

◾️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◾️शहर  - नाशिक

◾️स्थापना - जुलै 1989

◾️  विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◾️ शहर - जळगाव

◾️स्थापना - 15 ऑगस्ट 1989

◾️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◾️शहर - नांदेड

◾️स्थापना - 17 सप्टेंबर 1994

◾️  विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◾️शहर - सोलापूर

◾️ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आणि वाचा :- महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना
-----------------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना
------------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.
------------------------------------------------------

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे
-------------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम
-----------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर.

♻️ महत्त्वाचे आहे नक्की वाचा

🔸१) पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ....
- १४,९६,००,००० कि. मी.

🔹२) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग ....
- २,९९,७९२ कि. मी.

🔸३) सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह
- बुध

🔹४) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला .... हा ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे.
- गुरु

🔸५) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्यागुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या .... इतके आहे.
- ३१८ पट



♻️ वाचा :- महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

वाचा :- मराठी व्याकरण समानार्थी शब्द

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
◆ छडा - तपास, शोध, माग
 
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
◆ जबडा - तोंड, दाढ
 
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
 
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

◆ चढण - चढ, चढाव, चढाई
 
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
◆ चवड - ढीग, रास, चळत
 
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल काही व्यक्तींनी काढलेले उद्गार

🏹 महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल काही व्यक्तींनी काढलेले उद्गार 🏹

"जर  *शिवाजी महाराज* हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
           *-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.*

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे,  शिवाजी महाराज न प्रमाणे लढा !
                *-- नेताजी सुभाषचंद्र बोस.*

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
                   *-- अॅडॉल्फ हिटलर.*

*"शिवाजी महाराज* हे फक्त नाव नाही, तर  *शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे;* जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
                 *-- स्वामी विवेकानंद.*

"जर  शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास *‘सूर्य‘* संबोधले असते !"
              *-- बराक ओबामा, अमेरिका.*

"जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
                  *-- ईंग्रज गव्हर्नर.*

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला  शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! *दुश्मन दिया भी तो कौण दिया?  शिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
              *-- औरंगजेब* (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *शिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. *मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता !"*
               *-- शाहीस्तेखान,* संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *शिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
               *-- बडी बेगम अलि आदिलशाह.*

१७ व्या शतकात युरोप खंडात *"लंडन गॅझेट"* नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा *Shivaji, The King of India* असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि *त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला,* तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी *शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही.* असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या *३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकी एक ही मावळा गमावला नाही..*    
          🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🙏

वडियार घराणे :: म्हैसूर


◾️राजधानी :- म्हैसूर, श्रीरंगपट्टण

◾️राष्ट्रप्रमुख:- पहिला राजा: यदुराय
(इ.स. १३९९-१४२३)

◾️अंतिम राजा: जयचामराज वडियार
(इ.स. १९४०-४७)

◾️सद्याचे  म्हैसूर शहराजवळ  इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले

◾️ सुरुवातीस विजयनगरच्या अध्यापत्याखाली होते

◾️पराक्रमी राजे:- पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार, यदुराय, जयचामराज

◾️1565 मध्ये विजयगनर साम्राज्य संपल्यावर म्हैसुर सार्वभौम झाले

◾️18 व्या शतकाच्या मध्यात म्हैसुरचा वारस लहान असल्याचा फायदा सेनापती हैदर अलीने घेतला

◾️हैदर ने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली

◾️संस्थानाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हैदर इंग्रजांबरोबर 2 युद्ध लढले

◾️हैदर नंतर टिपू सुलतान ही 2 युद्ध लढला

◾️ मात्र 1799 च्या वेलस्ली बरोबरच्या 4थ्या युद्धात पराभव झाला, टिपू मारला गेला

🔺 चौथ्या श्रीरंगपट्टणमच्या युध्दाने म्हैसुर घराणे मुळ राजा वडीयार यांना परत केले

संसर्गाच्या प्रसारावर देखरेख ठेवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नवे तंत्रज्ञान ‘मॉडेल'. आणि तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील

⚡️ भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेची सज्जता आणि इतर उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल’ उपक्रम राबवत आहे.

⚡️सरकार संसर्ग क्षमता आणि जीवितहानीवर बारीक लक्ष ठेवून आहे, परंतु रोगावरील देखरेख वाढवण्यासाठी तसेच प्रसाराचा अंदाज वर्तवण्यासाठी एक मजबूत पूर्वसूचना प्रणाली तयार करणे अत्यावश्यक आहे. कोविड-19 संबंधी अंदाज आणि देखरेखीसाठी  असंख्य गणितीय मॉडेलची DST-SERB (विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ) आणि अन्य संस्थांद्वारे प्रायोजित विश्लेषकांकडून चाचपणी केली जात आहे.

☄ ठळक बाबी.. ☄

⚡️ हवामानविषयक घटनांच्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी गणितीय मॉडेल्सचा वापर भारत पूर्वीपासून करीत आहे. त्यातून प्रेरणा घेत विभागाने या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे, जो पुरावा-आधारित अंदाजासाठी आवश्यक





तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील 🛩

👉 कोयंबटूर (तामिळनाडू) या शहराजवळ भारतीय हवाई दलाच्या (IAF) सुलूर हवाई तळावर ‘तेजस एमके-1’ या विमानांचा भारताच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यामध्ये 27 मे 2020 रोजी समावेश करण्यात आला. अशा पद्धतीच्या लढाऊ विमानांचा समावेश ताफ्यामध्ये करणारे भारतीय हवाई दलाचे हे पहिले स्क्वाड्रन आहे.

👉 सुलूर हवाई तळामधल्या ‘फ्लाईंग बुलेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘नंबर 18 स्क्वाड्रन’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

👉 तेजसच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाने परिचालन क्षमता वृद्धीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. तेजस एमके-1 मुळे देशाच्या स्वदेशी लढावू विमान बांधणी कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही प्रोत्साहन मिळणार आहे.

👉 ‘तेजस एमके-1 FOC’ हे चौथ्या पिढीचे ‘तेजस’ विमान आहे. यामध्ये एकच इंजिन आहे. तसेच ते वजनानी हलके, अतिशय चपळाईने कार्यरत राहू शकते. तसेच सर्वप्रकारच्या हवामान परिस्थितीत बहुविध भूमिका पार पाडणारे हे लढाऊ विमान आहे. तेजसमध्ये हवेतल्या हवेमध्येच इंधन भरण्याची सुविधा-क्षमता आहे.

महाराष्ट्रातील पंचायत राज

🎯- महत्त्वपूर्ण माहिती 🎯

🅾आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
🅾 स्थानिक स्वराज्य संस्था

2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
🅾 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
🅾16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
🅾 वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
🅾27 जून 1960

6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
🅾महसूल मंत्री

🔘
7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
🅾226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
🅾 जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
🅾तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
🅾 1 मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
🅾महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
🅾 7 ते 17

13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
🅾जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
🅾 जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
🅾 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
🅾 पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
🅾 तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
🅾 विभागीय आयुक्त

🅾19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
🅾दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
🅾 तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
🅾 ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
🅾जिल्हा परिषदेचा

30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
🅾जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
🅾ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
🅾शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
🅾 राज्यशासनाला

34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
🅾 विस्तार अधिकारी

35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
🅾 ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
🅾जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
🅾जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
🅾दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
🅾 स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
🅾वसंतराव नाईक

वाचा :- महत्त्वाच्या चालू घडामोडी

▪ कोरोना व्हायरस संक्रमित सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश

▪ देशांतर्गत विमान सेवेतील प्रवाशांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शिका जारी; प्रवाशांना 14 दिवस घरीच राहणे बंधनकारक

▪ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये मधली सीट ही रिकामी ठेवण्यात यावी; सुप्रीम कोर्टाचे आदेश

▪ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हिमाचल प्रदेश सरकारने दोन जिल्ह्यांतील कर्फ्यू 30 जूनपर्यंत वाढवला

▪ राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले

▪ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप नेते नारायण राणे यांची राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे मागणी

▪ सरकार राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे विचाराधीन; निर्जंतुकीकरण, सुरक्षिततेच्या पर्यायांची घेणार काळजी

▪ श्रीलंकेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शेहान मदुशनकाला हेरॉइन हा मादक पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले

▪ रिअलमीचा अँड्रॉइड स्मार्ट टिव्ही बाजरात लॉन्च; किंमत फक्त 12,999 रुपयांपासून सुरु

▪ बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जौहर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटूंब क्वारंटाईन





♦️ देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

♦️देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

♦️देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

♦️देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

♦️देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

♦️देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

♦️देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

♦️देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

♦️देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

♦️देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

♦️देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

♦️देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

♦️देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

♦️देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

♦️देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

♦️देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

♦️देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

♦️देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

♦️देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

♦️देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

♦️देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

♦️देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

♦️देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

♦️देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

♦️देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

♦️देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

♦️देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी