Sunday, 3 April 2022

काल झालेल्या पेपर विषयी

नेहमीप्रमाणे कालचा ग्रुप C चा पेपर One Liner आणि Factual होता.

Difficulty level म्हणाल तर जास्त सोपा पण नाही आणि जास्त अवघड पण नाही.

👉म्हणजेच Easy to Moderate level चा म्हणता येईल.

👉 पेपर मध्ये Polity, History, Geography आणि Economy तुलनेने सोपे म्हणता येतील म्हणजेच या विषयांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येऊ शकत होते.

👉 जसे Polity नेहमीप्रमाणेच विचारले होते. महाराष्ट्र भूगोलाचे प्रश्न त्याच दर्जाचे होते. Economy मध्ये 3-4 प्रश्न संकल्पनात्मक होते ज्याला वेळ देणे आवश्यक होते. बाकी इतिहासाचा ट्रेंड आयोगाने 2020 पासून सोपा ठेवलेला आहे त्याच level चे प्रश्न होते..

👉 पण विज्ञान, Current आणि गणित- बुद्धिमत्ता मात्र नेहमीप्रमाणे Cut off deciding ठरतील.. म्हणजेच या तीन विषयात जे लोक स्कोर करतील ते नक्कीच लीड घेतील.. गणित- बुद्धिमत्ता खूप scoring होत. विज्ञान नेहमीप्रमाणे out of box आणि हातात न सापडणारे प्रश्न होते पण तरीपण 7-8 प्रश्न आपल्या अभ्यासाच्या आणि logic च्या जोरावर सुटू शकणारे होते..

👉 Current मात्र अति Factual आणि non Conventional म्हणता येईल. जगाचे तसेच भारताचे न वाचलेल्या भागावर प्रश्न विचारले होते. So current मध्ये 6-7 पण स्कोर राहायला पाहिजेत.

So अश्या प्रकारे Combine गट क मध्ये आयोगाने पाठीमागचाच ट्रेंड Continue केला अस म्हणता येईल.

कोणताही पेपर झाल्या झाल्या सोपाच वाटत असतो पण answer key आल्यावर खऱ्या अर्थाने आपण परफॉर्मन्स सांगू शकतो.

त्यामुळे पुढचे 1-2 दिवस निवांत राहा आणि पुढच्या परीक्षांच्या दृष्टीकोनातून नियोजन करा.

सर्वांना शुभेच्छा 💐💐

एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा मध्ये विचारलेले प्रश्न

प्र.1) भारताच्या गगनयान मोहिमे विषयी अयोग्य विधाने शोधा :

a) गगनयान साठी भारतीय हवाई सेनेच्या चार वैमानिकांची निवड अंतराळवीर प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.

b) त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गागरीन कॉस्मोनेट सेंटर येथे होणार आहे.

c) या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014 मध्ये केली होती.

d) याचे नियोजन 2022 साठी पाच सदस्यांचे चमू एक महिन्याचे अंतराळातील वास्तव्या यासाठी करण्यात आले आहे.

वरीलपैकी अयोग्य विधान निवडा...

पर्याय उत्तर :
1) (a), (b), (c), (d)
2) (b), (c), (d) ✔️✔️
3) (c), (d)
4) (b), (c)

Q : 'राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019' साठी बालक अभिनयाकरीता श्रीनिवास पोकळे याला 'नाळ' या मराठी सिनेमासाठी गौरवण्यात आले. खालीलपैकी या सिनेमाचे दिग्दर्शन कोणी केले आहे ?
1) अंकुश चौधरी
2) नागराज मंजुळे
3) सुधाकर रेड्डी एक्कंती✔️✔️
4) गार्गी कुलकर्णी

Q :  पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा.

A) 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 देण्यात आले.
B) हे पुरस्कार चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाहीत.
C) मराठी लेखिका अनुराधा पाटील यांना त्यांच्या लघुकथा लेखनासाठी पुरस्कार 2019 मध्ये मिळाला.
D) इंग्रजी मध्ये श्री. शशी थरुर यांच्या पुस्तकास 2019 मध्ये पुरस्कार मिळाला.

वरीलपैकी अयोग्य विधान निवडा...

पर्यायी उत्तर :
1) (a), (b), (c), (d)
2) (a), (b)
3) (b), (c) ✔️✔️
4) (a), (b), (c)

Q :  कोणत्या भारतीय गोलंदाजांनी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट-ट्रिक प्राप्त केली ?
A) कुलदिप यादव
B) मोहम्मद शमी
C) जसप्रीत बुमराह✔️✔️
D) रविंद्र जडेजा

Q : टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने 'टाईम पर्सन ऑफ द इयर 2019' साठी खालीलपैकी कोणाची निवड केली ?
अ) ग्रेटा थनबर्ग✔️✔️
ब) मलाला युसूफजाई
क) ऋषी जोशी
ड) केट विन्सलेट

Q :  खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात 2019 मध्ये कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला ?
अ) फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार.✔️✔️
ब) मतदानाचा अधिकार
क) कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार
ड) घटस्फोटाचा अधिकार

Q :  योग्य कथन/ ने ओळखा - (15 व्या वित्त आयोगा बाबत)

A) एन.के सिंग हे आयोगाचे अध्यक्ष आहेत.
B) अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत.
C) डॉ. अनुप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत.  पर्यायी उत्तर :

1) फक्त (a) ✔️✔️
2) फक्त (a) आणि (b)
3) फक्त (b) आणि (c)
4) फक्त (c)

Q : पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
- नवीन कुमार सिंग.
- अनिल कुमार सिंग.
- नंद किशोर सिंह.✔️✔️
- नरेंद्र किशोर सिंह.

Q :  अमेझॉन जंगल विषयी योग्य विधान शोधा.

A) हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहे.
B) या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे.
C) या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापला आहे.
D) ह्या जंगलात मकाऊ, ट्युकन् स आणि ब्लॅकस्कीमर्स आहेत. 

पर्यायी उत्तर :
1) (a), (b), (c), (d)
2) (a), (b), (c)
3) (a), (d)
4) (a), (b), (d)✔️✔️

चालू घडामोडींचे प्रश्न भारत किंवा जगात घडणार्‍या ताज्या घटनेशी संबंधित आहेत. हे प्रश्न सामान्यत: एमपीएससी, यूपीएससी, एसएससी परीक्षा इ. मध्ये विचारले

CURRENT AFFAIRS -MPSC Group-C- 2021

नमस्कार मित्रांनो,

आज झालेल्या एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेल वरील जसाच्या तसे चालू घडामोडी 3 प्रश्न आले आहेत. (वरील 3 ही प्रश्न आपल्या वेबसाईटवर (https://aimsstudycenter.blogspot.com/) उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण नियमित साईटला भेट द्या.

विश्वास बसत नसेल तर चेक करू शकता मी खाली टेलिग्राम लिंक देत आहे.

[Forwarded from Aims Study Center™]
[ Poll : Q : टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सात पदक जिंकत एम्मा मॅककॉनने नवा विक्रम केलाय, ही महिला खेळाडू कोणत्या देशाची आहेत? ]
- (अ) चीन
- (ब) जपान
- (क) ऑस्ट्रेलिया✅✅
- (ड) न्यूझीलंड

Check link: -  https://t.me/aimsstudycenter/31742

---------------------------------------------------------

Q : इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021)
- (A) अमेरिका
- (B) ऑस्ट्रेलिया✅✅
- (C) जर्मनी
- (D) इंग्लंड

---------------------------------------------------------

[Forwarded from Aims Study Center™]
[ Poll : Q : ऑकस या गटात ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि _________ या तिन देशांचा समावेश असेल? ]
- (अ) चीन
- (ब) अमेरिका✅✅
- (क) रशिया
- (ड) जपान

Check Link:-  https://t.me/aimsstudycenter/31747

---------------------------------------------------------

Q : इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?(गट-क पूर्व परीक्षा 2021) ] ]
- (A) ऑकुस✅✅
- (B) इन्डपॅक
- (C) युसा
- (D) यांपैकी नाही

---------------------------------------------------------

[Forwarded from Aims Study Center™]
[ Poll : #2741  :पुढीलपैकी कोणत्या देशाने आपले प्रथम आर्क्टिक-पाळत ठेवणारा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे?
- (अ) रशिया✅✅
- (ब) जपान
- (क) चीन
- (ड) बांगलादेश

Check link : -  https://t.me/aimsstudycenter/31752
---------------------------------------------------------
Q : कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका-एम. प्रक्षेपित केला आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021) 
- (A) रशिया✅✅
- (B) जपान
- (C) चीन
- (D) जर्मनी
---------------------------------------------------------

Q : भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021) ]
(A) इंग्लंड
(B) कॅनडा✅✅
(C) अमेरिका
(D) फ्रान्स

Q : खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021) ]
(A) इटली
(B) फ्रान्स
(C) ऑस्ट्रेलिया✅✅
(D) स्पेन

Q : कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या माझ्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?(गट-क पूर्व परीक्षा 2021) ]
(A) आसाम
(B) सिक्किम✅✅
(C) ओडीशा
(D) मणिपूर

Q : 'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?(गट-क पूर्व परीक्षा 2021) ]
(A) संतोष यादव
(B) कुलप्रित यादव✅✅
(C) नेहा सिंग
(D) विजय दहीया

Q : इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021)
(A) अमेरिका
(B) ऑस्ट्रेलिया✅✅
(C) जर्मनी
(D) इंग्लंड

Q : कोविड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021)
(A) अरुंधती रॉय
(B) अमर्त्य सेन
(C) जयती घोष✅✅
(D) रघुराम राजन

Q  : 'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021)
(A) गुजरात
(B) तामिळनाडू
(C) त्रिपुरा✅✅
(D) उत्तर प्रदेश

Q : ए. के. 47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले युलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?(गट-क पूर्व परीक्षा 2021)
(A) बिपीन रावत
(B) वेदप्रकाश मलीक
(C) अनुप मिश्रा✅✅

Q : ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब-स्पीड ट्रॅक येथे आहे.(गट-क पूर्व परीक्षा 2021) ]
(A) पुणे
(B) इंदौर✅✅
(C) मुंबई
(D) चेन्नई

Q : इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?(गट-क पूर्व परीक्षा 2021) ]
(A) ऑकुस✅✅
(B) इन्डपॅक
(C) युसा
(D) यांपैकी नाही


खनिजे जिल्हे आणि अंदमान-निकोबार बेटे –

🎲लोहखनिज - चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग

🎲बॉक्साईट - सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड

🎲चनखडक - गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर

🎲करोमाईट - भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी

🎲डोलोमाईट - यवतमाळ, रन्नागिरी(जास्त),

🎲सिलिका - सिंधुदूर्ग

🎲तांबे - चंद्रपूर

🎲अभ्रक - नागपूर, चंद्रपूर

अंदमान-निकोबार बेटे –

1) या द्विपसमुहात 572 बेटे आहेत.

2) त्यापैकी 38 बेटावर मानवी वस्ती आहेत.

3) बॅरन हा मध्य अंदमान मधील जागृत ज्वालामुखी आहे.

4) उत्तर अंदमान मधील सॅडल हे सर्वात उंच शिखर आहे.

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्न सराव


1.गुरुत्वाकर्षणासबंधी विश्वव्यापी नियम कोणी मांडला?
1)केप्लर

2)गॅलिलिओ

3)न्यूटन ✔✔✔

4)कोपर्निकस

2.वस्तूचा वेग दुप्पट केला तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा -------होईल

1)दुप्पट

2)अर्धी

3)चौपट✔✔✔

4)यापैकी नाही

3. सूक्ष्मजीव  असतात.

1)एकपेशी✔✔✔

3)बहुपेशी

4)अतिसूक्ष्म
विविध आकारांचे

4.सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1)प्रकाश प्रारणांच्या

2)विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✔✔✔

3)अल्फा प्रारणांच्या

4)गामा प्रारणांच्या

5.अहरित वनस्पती __ असतात.
1)स्वयंपोषी

2)परपोषी✔✔

3)मांसाहारी

4)अभक्षी

6.किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1)ऑक्सिश्वसन

2)विनॉक्सिश्वसन✔✔✔

3)प्रकाशसंश्लेषण

4)ज्वलन

7.__________ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.

1)प्लटिहेल्मिन्थस

2)पोरीफेरा

3)आर्थ्रोपोडा✔✔

4)ईकायनोडर्माटा

8._____________ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.

1)पेशी✔✔✔

2)उती

3)अवयव

4)अणु

9.___________ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.

1)पेशी – भित्तिका✔✔

2)प्रद्रव्य पटल

3)पेशीद्रव्य

4)केंद्रक

10.ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.

1)पोषण✔✔

2)स्वयंपोषण

3)परपोषण

4)अंत:पोषण

11.___________ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1)हरितद्रव्यामुळे✔✔

2)झथोफिलमुळे

3)कॅरोटीनमुळे

4)मग्नेशिंअममुळे

MPSC प्रश्नसंच

🔳 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत कोलकाता येथे ‘डिजिटल मॅपिंग इनोव्हेशन्स इन मेक इंडिया इनिशिएटिव्ह्ज’ संकल्पनेखाली 40 वी INCA आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणारी संस्था – नॅशनल अॅटलास अँड थीमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन (NATMO). 

🔳 तंत्रज्ञान माहिती, भविष्यवाणी आणि मूल्यांकन परिषद (TIFAC) याचे दोन नवीन उपक्रम – ‘सक्षम’ (श्रमिक शक्ती मंच) जॉब पोर्टल आणि सीवीड अभियान.

🔳 11 फेब्रुवारी 2021 पर्यंत, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागाने सांगितलेल्या नागरी स्वराज्य संस्था सुधारणा पूर्ण करणारे सहा राज्य - (अनुक्रमे) आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, मणीपूर, राजस्थान, तेलंगणा आणि गोवा.

🔳 अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोसायटी ऑफ इंडिया (AMSI) यांच्यावतीने ____ शहरात नॅशनल सेंटर फॉर अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (NCAM) उभारले जाणार - हैदराबाद.

🔳 देशातील प्रथम नगरपालिका जी वीजनिर्मिती प्रकल्प (वैतरणा धरणावर) उभारणार आहे - बृहन्मुंबई महानगरपालिका.

🔳 NIC प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल स्वाक्षरीद्वारे दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा देणारे देशातील पहिले राज्य - ओडिशा.

डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला : जागतिक व्यापार संघटना (WTO) याची पहिली महिला प्रमुख.

✅✅ डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला : जागतिक व्यापार संघटना (WTO) याची पहिली महिला प्रमुख. ✅✅
#Appointment #VyaktiVishesh

🔰 जागतिक व्यापार संघटनेचे नवे महानिदेशक म्हणून नायजेरियाच्या अर्थशास्त्री डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला यांची निवड झाली आहे.

🔰 त्या WTO संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या प्रथम महिला तसेच आफ्रिका खंडाची पहिली व्यक्ती ठरल्या आहेत.

🔰 डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला ऑगस्ट 2020 मध्ये पदभार सोडणाऱ्या रॉबर्टो अझेवेदो यांच्याकडून संघटनेचे नेतृत्व स्वीकारणार.

🌐 जागतिक व्यापार संघटना (WTO) विषयी :-
#WTO

🔰 ही एक आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 

🏢 मुख्यालय :- जिनेव्हा (स्वित्झर्लंड)

♻️ सदस्य :-  164 देश

🔰 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून

🔰 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.

🔰 WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच

🔰 सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.

प्राण्यांची राहण्याची ठिकाणे

⛔️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ⛔️

🌷मधमाश्यांचे : पोळे

🌷घुबडाची : ढोली

🌷वाघाची : जाळी

🌷उंदराचे : बीळ

🌷कुत्र्याचे : घर

🌷गाईचा : गोठा

🌷घोड्याचा : तबेला, पागा

🌷हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

🌷कोळ्यांचे : जाळे

🌷सिंहाची : गुहा

🌷सापाचे : वारूळ, बीळ

🌷चिमणीचे : घरटे

🌷पोपटाची : ढोली

🌷सुगरणीचा : खोपा

🌷कोंबडीचे : खुराडे

🌷कावळ्याचे : घरटे

🌷मुंग्यांचे : वारूळ

 

आजचे प्रश्नसंच

1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी



📚आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना📚

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे आणि महाराष्ट्र नैसर्गिक सीमा

🛑 महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे 🛑

▪️ अकलोली ठाणे

▪️ उनकेश्वर

▪️ उनपदेव

▪️ उन्हेरे

▪️ गणेशपुरी

▪️ खेड (रत्नागिरी)

▪️ तुरळ

🛑 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🛑

वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

ईशान्य:- दरकेसा टेकड्या

पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

पश्चिम:- अरबी समुद्र

▪️ देवनवरी

▪️ राजवाडी

▪️ राजापूर

▪️ वज्रेश्वरी

▪️ सव

▪️ सातिवली

▪️ सुनपदेव

▪️ पाली.
=========================

कंपनी सरकारची न्याय व्यवस्था

०१. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० च्या चार्टर अॅक्टनुसार करण्यात आली. या अॅक्टनुसार कंपनीला कायदे व नियम तयार करणे, अध्यादेश काढणे इ. अधिकार देण्यात आले होते. हे अधिकार कंपनीच्या ताब्यातील प्रदेश व तिचे प्रशासन या संदर्भात दिले होते.

०२. कंपनीच्या कायद्यानुसार दिवाणी व फौजदारी खटल्यांचा निकाल दिला जात नसे. १६६९ च्या कायद्यानुसार कंपनीच्या ताब्यात मुंबई देण्यात आली. तसेच या प्रदेशा संदर्भात कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. १७८३-१७८६ च्या कायद्यानुसार व्यापारी व नाविक दलासंबंधी न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला.

०३. १७२६ मध्ये मुंबई, मद्रास, फ़ोर्ट विल्यम (कलकत्ता) येथे मेयर कोर्ट स्थापण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली. प्रत्येक कोर्टमध्ये १ मेयर व ९ मदतनीस असत. ९ पैकी ७ जण ब्रिटनमध्ये जन्मलेले व ब्रिटिश नागरिक असावेत असे बंधन होते. या कोर्टनी आपल्या क्षेत्रातील दिवाणी खटल्यांचा निकाल देणे, त्याच्या विरोधात सरकारच्या कोर्टात अपील करणे अशी त्यांची कार्ये होती.

०४. सरकारी कोर्टचे सदस्य त्या प्रांताचे गव्हर्नर व कौन्सिलचे तीन सदस्य असत. खटल्याचा अंतिम निकाल ब्रिटिश कायद्यानुसार दिला जात असे. ही न्यायालय व्यवस्था १७७२ पर्यत सूरू होती. त्यानंतर त्यात बदल होत गेले.

०५. कंपनीच्या न्यायव्यवस्थेबरोबरच स्थानिक न्यायालये होती. नबाबाला दिवाणी व फौजदारी अधिकार होते. त्याच्या कोर्टातील फौजदारी खटल्यासाठी मुसलमानी कायदा तर दिवाणी खटल्यासाठी हिंदू व मुसलमान अशा दोन्ही कायद्यांचा आधार घेतला जात असे नबाब हा त्याच्या प्रांताचा प्रमुख न्यायाधीश असे.

लॉर्ड कर्झन (1899 - 1905).

●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय....

●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.

●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.

●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.

●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.

●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली.

●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.

●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.

●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.

●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला.

●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली.

●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली.

●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.

●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.

●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.

●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते.

●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.

●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.

●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.