• गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, • गंगाखेड, नांदेड
• कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
• भिमा : पंढरपुर
• मुळा–मुठा : पुणे
• इंद्रायणी : आळंदी, देहु
• प्रवरा : नेवासे, संगमनेर
• पाझरा : धुळे
• कयाधु : हिंगोली
• पंचगंगा : कोल्हापुर
• धाम : पवनार
• नाग : नागपुर
• गिरणा : भडगांव
• वशिष्ठ : चिपळूण
• वर्धा : पुलगाव
• सिंधफणा : माजलगांव
• वेण्णा : हिंगणघाट
• कऱ्हा : जेजूरी
• सीना : अहमदनगर
• बोरी : अंमळनेर
• ईरई : चंद्रपूर
• मिठी : मुंबई
Friday, 25 March 2022
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे
मोजकेच पण महत्त्वाचे
🔹उत्तर भारतीय ( गंगेच्या ) मैदानाला विविध नावे व त्यांचा क्रम ( ट्रिक )🔹
🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे मैदानांचा क्रम
1) भाबर
2) तराई
3) भांगर
4) खादर
वरील संकल्पनांचा अर्थ
1) भाबर - शिवालिक टेकड्यांच्या दक्षिण पायथ्याशी " दगड,गोटे,वाळू यांच्या संचयाने तयार झालेले मैदान."
2) तराई चे मैदान - भाबर च्या दक्षिणेकडील "बारीक गाळामुळे निर्माण झालेले दलदलीचे मैदान".
- हा प्रदेश उत्तरप्रदेश व बिहार राज्यांत विस्तारला आहे.
- हिमालयातून वाहत येणारी नदी भाबर मध्ये लुप्त होते व तराईमध्ये पुन्हा प्रकट होते.
3) भांगर - तराईच्या दक्षिणेस गंगेच्या उर्ध्व मैदानातील " जुन्या गाळाचे मैदान " .
4) खादर - भांगरच्या दक्षिणेस गंगेच्या उर्ध्व मैदानातील " नवीन गाळाचे मैदान."
वरील घटकावर विविध प्रकारे आतापर्यंत राज्यसेवा पूर्व - मुख्य ,तसेच ग्रुप b/c
तसेच इतर exam मध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत..
अजूनही येतच आहेत..
कधी
तराई म्हणजे काय?,जोड्या लावा,क्रम लावा.....आदी
==========================
ट्रिक ट्रिक ट्रिक
म्हणून वरून घेतलेला सार
भाबर - दगड,गोटे,वाळू यांच्यापासून झालेले मैदान
तराई - गाळामुळे झालेले दलदलीचे मैदान
भांगर - जुन्या गाळाचे मैदान
खादर - नवीन गाळाचे मैदान
क्रम लक्षात ठेवण्याची ट्रिक
( भात भांग खा )
भा - भाबर
त - तराई
भांग - भांगर
खा - खादर
महाराष्ट्र खनिज संपत्ती
▪️बॉक्सईट:-21% उत्पादन
▪️क्रोमाईट:-10% साठा
▪️चुनखडी:-9% साठा
▪️मॅगनिज:-40% साठा
▪️कायनाईट:-15% साठा
▪️डोलोमाईट:-1% साठा
▪️लोहखनिज:-20% साठा
भारतातली जागतिक वारसा स्थळे
🔰 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली.
🔰ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.
👉 आता भारतात एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 32 (तेलंगणा आणि गुजरात सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि 1 मिश्रित ठिकाण आहे.
👉 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.
🏰💒🛕⛪️सांस्कृतिक🕌⛩🛤🏞
1) आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश
2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र
3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार
4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)
5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान,
गुजरात
6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट
8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई,
महाराष्ट्र
9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र
10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक
13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले
16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर
17) हमायूनची कबर, दिल्ली
18) खजुराहो, मध्यप्रदेश
19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
21) कतुब मिनार, दिल्ली
22) राणी की वाव, पटना, गुजरात
24) लाल किल्ला, दिल्ली
25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड
29) जतर मंतर, जयपूर
30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट
डेको एन्सेम्बल ही इमारत
31) काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर,
तेलंगणा
32) धोलावीरा हडप्पाकालीन शहर, गुजरात
🏞🌅🎑 नैसर्गिक ⛰🗻🏔
1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश
2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)
🟥🟧 मिश्र 🟨🟩
1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम
✅ UNESCO :-
👉 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.
👉 स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.
👉 या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली.
👉 भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.
यूएनएससी’तील युक्रेनसंबंधी ठरावावर भारत तटस्थ
🔵युक्रेनमधील मानवी संकटाबाबत रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) गुरुवारी मांडलेल्या ठरावावर तटस्थ राहून, आपण रशियाच्या बाजूने नसल्याचे संकेत भारताने दिले.
🔵या ठरावात युक्रेनवर टीका करण्यात आली होती. ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली समर्थनाची ९ मते न मिळाल्याने हा ठराव संमत होऊ शकला नाही.
🔵रशिया पुरस्कृत ठरावावर भारताने तटस्थ राहण्याचा प्रसंग प्रथमच घडला आहे.
🔵यापूर्वी युक्रेनमधील युद्धावर झालेल्या मतदानात, रशियाच्या कृतीवर टीका करणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांनी पुरस्कृत केलेल्या ठरावांवर भारत तटस्थ राहिला होता.
🔵या ताज्या घडामोडीतील, आपली तटस्थता दर्शवण्याचा भारताचा प्रयत्न प्रतििबबित झाला आहे.
🔵न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव मांडला जात असताना आणि भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले असताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला तेथे होते.
🔵रशिया व चीनने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर भारतासह यूएनएससीचे उर्वरित १२ सदस्य तटस्थ राहिले.
रेल्वेचे खासगीकरण होणार नाही ! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही.
🟤रेल्वेची सामाजिक बांधिलकी सर्वाधिक महत्त्वाची असल्याने रेल्वे क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी राज्यसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भातील चर्चेच्या उत्तरात दिली.
🟤रेल्वे क्षेत्रात २००९-१४ या काळात २ लाख ४२ हजार ७०९ रोजगार देण्यात आले. त्या तुलनेत २०१४ पासून आत्तापर्यंत ३ लाख ४४ हजार ६४६ नोकऱ्या दिल्या गेल्या. १ लाख ४० हजार ७१३ पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत, अशी माहिती देत रेल्वे मंत्रालयाने भरती थांबवल्याचा विरोधकांचा आरोप वैष्णव यांनी फेटाळला.
🟤काँग्रेसच्या काळात रेल्वे क्षेत्रातील विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले पण, त्यामध्ये दूरदृष्टी नव्हती. कुठे स्टेशन उभे करायचे आहे, कुठे रेल्वे सुरू करायची आहे, ही माहिती म्हणजे व्हिजन नव्हे. रेल्वे क्षेत्राचे अत्याधुनिकीकरण होत असून विशिष्ट ध्येय ठरवून कामे पूर्ण केली जात आहेत.
🟤२०१४-१९ मध्ये दरवर्षी ३,४४० किमी विद्युतीकरण केले गेले, ५० हजार कमीचे विद्युतीकरण झाले आहे. आगामी ३०-४० वर्षांचा आढावा घेतला जाणार आहे, असे वैष्णव म्हणाले.
९ मे पर्यंत युद्ध संपवा; रशियन सैन्याला आदेश .
🔥रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण असताना लवकरच हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या लष्करानेच असा दावा केला आहे.
🔥 युक्रेन लष्कराच्या दाव्यानुसार, ९ मे रोजी रशिया हे युद्ध संपवू इच्छित आहे. Kyiv Independent च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याला युद्ध ९ मे पर्यंत संपलं पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे.
🔥९ मे हा दिवस रशियामधील नाझी जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो. दरम्ान रशिया आपल्या हजारो नागरिकांना त्यांच्या देशात घेऊन जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.
🔥 या नागरिकांना ओलीस ठेवत आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा कट असल्याचाही त्यांचा दावा आहे.
🔥असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार, युक्रेनचे लोकपाल डेनिसोवा यांनी चार लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या इच्छेविरोधात रशियात नेण्यात आलं असून त्यामध्ये ८४ हजार लहान मुलं असल्याचा दावा केला आहे.
🔥 दुसरीकडे रशियानेही जवळपास हीच संख्या दिली असून या लोकांना रशियाला जायचे होते असा प्रतिदावा केला आहे.
🔥दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पाश्चिमात्य देशांनी नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून युक्रेनला माणुसकीच्या आधारावर मदत करण्याचं वचन दिलं.
🔥 पण युक्रेनच्या राष्टाध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मागितलेल्या मदतीच्या तुलनेत लष्करी सहाय्य कमी मिळत आहे.
देश ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त! ; केंद्र सरकारचा निर्णय - मुखपट्टी, अंतरनियम पालन मात्र आवश्यक
🌼देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आह़े करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केल़े
🌼देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वप्रथम २४ मार्च २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या होत्या़ करोना रुग्णआलेखातील चढ-उतारानुसार त्यात वेळोवेळी बदल करण्यात आल़े आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने जोखीम-मूल्यांकनाधारित धोरणाचा अवलंब करण्याची सूचना करताना केंद्राने बुधवारी सार्वजनिक कार्यक्रम आणि आर्थिक व्यवहार पूर्ववत करण्याची गरज व्यक्त केली़
🌼याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आह़े रुग्ण निदान, देखरेख, रुग्णशोध, उपचार, लसीकरणावर भर देत रुग्णालयांतील पायाभूत सुविधांच्या क्षमतवाढीवर गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले आह़े तसेच करोनाबाबत सर्वसामान्य जनतेतही मोठी जागरूकता आली आहे, असे भल्ला यांनी या पत्रात म्हटले आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सुमारे २० हजार असून, करोनाचा दैनंदिन संसर्गदरही ०.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, देशात लशींच्या एकूण १८१.५६ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत, हेही उल्लेखनीय असल्याचे भल्ला यांनी नमूद केले.
🌼या सर्व बाबी विचारात घेऊन, करोनाला आळा घालण्याच्या उपाययोजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदी यापुढे लागू करण्याची गरज नाही, असा निर्णय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच ; त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला.
🟤राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी)चे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल बुधवारी मंत्रिमंडळाने स्वीकारला.
🟤मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय अहवालात एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजणे आणि महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सरकारच्या विभागामार्फत करणे ही मागणी मान्य करणे कायद्यातील तरतुदीनुसार तसेच प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबी विचार घेता शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
🟤एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्यानंतरही विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी सुरूच ठेवला आहे.
🟤विलीनीकरणाबाबत नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला.
🟤आज हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडून तो स्वीकारण्यात आला. यासंदर्भात १ एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल असे ५ एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.
🟤तसेच संपाबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी कालच विधानसभेत स्पष्ट केले होते.