Thursday, 10 March 2022

महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

121) मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर : 52

122) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?
उत्तर : 37° सेल्सियस

123) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत

124) मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात

125) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा

126) पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था

127) चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती

128) महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.

129) महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर

130) भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

आंतरराष्ट्रीय विमान सेवेला आकाश मोकळे ; २७ मार्चपासून सेवा पूर्ववत.

🧨करोनाकाळातील दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला आकाश मोकळे झाले आह़े  २७ मार्चपासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केल़े करोना प्रादुर्भावामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा २३ मार्च २०२० रोजी स्थगित केली होती़  मात्र, जुलै २०२० पासून ३७ देशांशी कराराद्वारे भारताने विशेष विमानसेवा सुरू ठेवली होती़ 

🧨आता करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, असे हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितल़े  या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला़ जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण वाढले आह़े  या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़.

🧨या सेवेसाठी आरोग्य मंत्रालयाने  प्रसृत केलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे हवाई वाहतूक मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केल़े हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील स्थगिती २६ मार्चपर्यंत राहील़  त्यानंतर  २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल.

साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले.


♻️साताऱ्यातील सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी मागील ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले झाले आहेत. सैनिक स्कूलमध्ये ६११ विद्यार्थिनींमधून पहिल्यांदाच दहा मुली प्रवेश प्रक्रिया पार पाडून दाखल झाल्या आहेत.

♻️ देशातील पहिल्या  सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरू झाले आहे.

♻️जागतिक महिला दिनानिमित्त सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या १० मुलींशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने २३ जून १९६१ रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरू झाली. या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण दिले जाते. ६४० विद्यार्थी येथे शिकतात. पैकी १० मुलींना यावर्षी प्रथमच प्रवेश मिळाला आहे.

♻️निवासी शाळेत शिकणारी ही मुलींची पहिलीच बॅच आहे.

♻️सैनिक स्कूलचे उपप्राचार्य िवग कमांडर बी लक्ष्मीकांत यांनी  सांगितले की आत्तापर्यंत या शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जात होता.

♻️राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी शासनाने घेतला. त्यामुळे  सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी गेल्या ६१ वर्षांत  खुले झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

♻️ यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वरित सात विद्यार्थिनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.

जर्मन खुली बॅडिमटन स्पर्धा - सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी.

♒️दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या भारतीय खेळाडूंनी जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) विजयी सलामी दिली.

♒️सातव्या मानांकित सिंधूने मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानला २१-८, २१-७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या बुसाननवरील सिंधूचा हा १५वा विजय ठरला. तिचा पुढील फेरीत स्पेनची बिएट्रीझ कोरालेस आणि चीनच्या झांग यी मान यांच्यातील विजेतीशी सामना होईल.

♒️पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आठव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेर्डेझवर २१-१०, १३-२१, २१-७ अशी मात केली. श्रीकांतचा हा लेव्हेर्डेझवरील सलग चौथा विजय ठरला. दुसऱ्या फेरीत श्रीकांत चीनच्या लू गुआंग झू याच्याविरुद्ध खेळेल.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...